स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागची कारवाई; अन्य चोऱ्या ही उघडकीस येण्याची शक्यता
खेड प्रतिनिधी
कोकण रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डला मारणाऱ्या एका चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले आहे. सुखवीर उर्फ विजय हरदम सिंग (रा. बिलोरी-राजस्थान) असे चोरट्याचे नाव आहे. यामुळे रेल्वेत घडलेल्या अन्य चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.
कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशी झोपेत असल्याची संधी साधत त्यांच्या बॅगेतील सोन्याच्या दागिन्यांसह अन्य मौल्यवान वस्तू चोरण्याच्या घटना रेल्वेस्थानकाच्या हद्दीत घडल्या आहेत. या गुह्यांची नोंदही येथील पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. कोकण मार्गावर घडणाऱ्या चोरीच्या वाढत्या घटनांनी प्रवासी त्रस्त होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखालील विजय आंबेकर, सागर साळवी, योगेश नार्वेकर, दत्तात्रय कांबळे यांच्या पथकाने संशायिताच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली असता चिपळूण स्थानकाजवळ सुखवीर उर्फ विजय वजय हरदम सिंग सापळ्यात अडकला. येथील पोलीस स्थानकात आणल्यावर हिसका दाखवल्यावर त्याने चोरीच्या गुह्याची कबुली दिली. या बाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरीक्षक सुजित गडदे कत आहेत.









