प्रतिनिधी/रत्नागिरी
शहरालगतच्या जे. के. फाईल्स येथे दुचाकीवर बसून जुगार खेळणाऱ्यावर ग्रामीण पोलिसांकडून कारवाई करण्यात आल़ी या पकरणी तिघा संशयितांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी असा ६९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लहु रामचंद्र पडवळ (६२, रा. जे. के. फाईल्स, रत्नागिरी), सुनील दत्तात्रय लाड (५२, रा. नाचणे, रत्नागिरी) आणि दीपक संभाजी पाटील (रा. मांडवी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित आरोपी हे बुधवारी सायंकाळी ज़े के. फाईल्स येथील एका दुकानासमोर दुचाकीवर बसून बेकायदेशीरपणे जुगार खेळत होते. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. संशयितांकडे रोख १८ हजार ४७० रुपये, मोबाईल व दुचाकी असा एकूण ६९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके, सहाय्यक पोलीस फौजदार महेश टेमकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक राजवैद्य यांनी केली. पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहन पाटील यांनी तक्रार दिली.
हे ही वाचा : रत्नागिरीत मद्यधुंद रिक्षाचालकाची कारला धडक