वाळू उत्खननामुळे बहिरवली खाडी चर्चेत प्रयत्न केला होता.
प्रतिनिधी
तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील तुंबाड-भोईवाडी येथील राजाराम जाधव या मच्छीमार व्यावसायिकाची बोट बुडवण्याचा प्रयत्न झालेला असतानाच वाळूने भरलेला ट्रॉलर खाडीत उलटल्याची बाब समोर आली आहे. यात तिघेजण बालंबाल बचावले आहेत. बेकायदेशीरपणे राजरोसपणे सुरू असलेल्या वाळू उत्खननामुळे बहिरवली खाडी चर्चेचा विषय ठरली आहे. सक्शन पंपाद्वारे
बहिरवली खाडीत वाळू उत्खनन सुरू असतानाही वाळू व्यावसायिकांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तालुक्यात बहिरवली, सवणस, दाभोळ खाडीत सक्शन पंपाच्या सहाय्याने वाळू व्यावसायिकांचा धुडगूसच सुरू आहे.









