राज्याच्या राजकारण तापवणाऱ्या तसेच सौदी आरेबियाशी राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी कारण बनलेला रत्नागिरी तालुक्यातील बारसु प्रकल्पाबाबत नवी बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियाचे राजपुत्र यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर बारसूमधील प्रकल्पाच्या समर्थकांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरीतील बारसू प्रकल्प हा अनेक कारणांनी चर्चेत राहीला आहे. या प्रकल्पाच्य़ा घोषणेपासूनच त्याच्यावर विरोधकांकडून टिकेचा सूर उमटला होता. तसेच या प्रकल्पाविरोधात स्थानिक लोकांनी अनेकदा आंदोलन उभारले होते.
दरम्याने, देशात सुरु असलेल्या जी- 20 परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्यात सोमवारी द्विपक्षीय व्यापार आणि संरक्षण कराराला चालना देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या चर्चेमध्ये बारसू रिफायनरी प्रकल्प महत्वाचा विषय होता. रत्नागिरी- बारसू रिफायनरी प्रकल्पावरिल या चर्चेनंतर लगेच कामाला वेग आला. या बातमीनंतर रिफायनरी समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
यावेळी रिफायनरी समर्थकांकडून रत्नागिरीमध्ये पेढे वाटून या भेटीचे स्वागत केले. चार लाख कोटींच्या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी एक समिती स्थापन होणार असून यावर दोघां नेत्यांमध्ये सहमती, अरामको आणि संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय कंपन्यांसोबत रिफायनरी उभारली जाणार आहे. रिफायनरीच्या कामाला गती देण्यासाठी देखरेख समितीही स्थापन होणार आहे.









