कारवाई झालेले उमेदवार पराभूत, दापोली नगर पंचायतीचे एकही पद रिक्त नाही
मौजेदापोली वार्ताहर
नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर विहित कालावधीत निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्या दापोली नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या ६ उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
दापोली नगर पंचायतीच्या निवडणूक निकालानंतर महिन्याच्या आत उमेदवाराने निवडणुकीचा खर्च व शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करावयचे होते. मात्र इस्माईल काझी, जहीर तळघरकर, किरण घोरपडे, विशाखा पवार, मृणाली सोंडकर, वृषाली कदम या उमेदवारांनी ते सादर केले नाही. त्यानंतर या उमेदवारांना त्याबाबतचा खुलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस देवून सुनावणीही आयोजित केली होती. नोटीस मिळूनही उमेदवारांनी खर्च सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली. हे उमेदवार पराभूत झाल्याने नगरपंचायतीमधील एकही पद रिक्त होणार नाही.









