1300 ग्रॅम चांदीचाही समावेशच; मुंबईतील व्यापारी खून प्रकरण
रत्नागिरी प्रतिनिधी
मुंबई येथील सराफ व्यापारी किर्तीकुमार अजय राज कोठारी यांच्याकडे खूनाच्या दिवशी असलेला ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आह़े यामध्ये 5 तोळे साने (51 ग्रॅम), 1 लाख 45 हजार रूपयांची रोकड व 1 हजार 300 ग्रॅम चांदीचा समावेश आह़े कोठारी यांच्याकडे मोठा ऐवज असल्याचे मानून त्यांच्या खूनाचा प्लॅन करण्यात आला होत़ा प्रत्यक्षात पोलिसांच्या तपासात फार मोठे घबाड संशयितांच्या हाती लागले नव्हते, असे आता स्पष्ट होत आह़े.
आपल्या व्यावसायिक कामासाठी कोठारी 19 सप्टेंबर राजी रत्नागिरीत आले होत़े रत्नागिरीत येताना कोठारी यांनी स्वत:जवळ सोने, चांदी व रोकड ठेवली होत़ी. याच मुद्देमालावर संशयित आरोपी डोळा ठेवून होते, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आह़े. खूनाच्या दिवशी कोठारी यांच्याकडे एक बॅग होती. यामध्ये असलेले सोने, चांदी व रोकड पोलिसांच्या हाती लागली आह़े खूनाचा हेतू स्पष्ट करण्यासाठी हा मुद्देमाल जप्त करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मानले जात आह़े.
किर्तीकुमार कोठारी 19 सप्टेंबर रोजी रत्नागिरीमधून अचानक बेपत्ता झाले होत़े. यानंतर त्यांचा मुलगा करण याने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी. पोलीस तपासात गोखले नाका येथील त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण खेडेकर याने आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने कोठारी यांचा खून केल्याचे समोर आल़े. या प्रकरणी पोलिसांनी भूषण सुभाष खेडेकर (42, खालची आळी रत्नागिरी), रिक्षा चालक महेश मंगलपसाद चौगुले (39, मांडवी सदानंदवाडी रत्नागिरी) व फरीद महामूद होडेकर (36, भाट्ये खोतवाडी) यांना अटक केली आह़े.
पोलीस तपासात भूषण खेडेकर कर्जबाजारी होत़ा. तो किर्तीकुमार कोठारी यांचे पैसेही देणे होत़ा किर्तीकुमार कोठारी ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी व मोठे व्यापारी होते. गेल्या 10 वर्षापासून ते रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी येत असत़. त्यामुळे यावेळी कोठारी मोठी रक्कम आपल्यासोबत घेवून आल्याचा कयास भूषण याने बांधला होत़ा. भूषण खेडेकरने उधारीचे पैसे देण्याच्या बहाण्याने कोठारींना आपल्या दुकानात बोलावून घेतल़े. यावेळी दुकानात महेश चौगुले व फरीद होडेकर पहिल्यापासूनच हजर होत़े. कोठारी त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात दाखल होताच भूषणने दुकानाचे शटर खाली केले व संधी साधून भूषणने दोरीच्या सहाय्याने गळा आवळून कोठारींचा खून केल़ा. त्यानंतर मृतदेह रिक्षातून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील पऱ्यामध्ये टाकून दिल़ा.
कोठारी यांच्या खूनानंतर त्यांच्याजवळील सोने, चांदी व रोख रक्कम नेमकी कोठे गेली, याबाबत पश्न उपस्थित करण्यात येत होत़ा पोलीस तपासात कोठारी मुंबईतून घेवून आलेले सोने, चांदी व रोख रक्कम आता पोलिसांच्या हाती लागली आह़े कोठारी नेमके किती सोने, चांदी व रोकड घेवून आले होत़े त्यांनी ते रत्नागिरीत कुणाकुणाला दिले, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आह़े.









