खेड प्रतिनिधी
तालुक्यातील संगलट येथील शाळेत करण्यात आलेल्या तपासणीत 5 गोवरचे संशयित विद्यार्थी आढळले असून आंबवली येथेही एकजण गोवरचा संशयित आढळला आहे. या 6 जणांचे नमुने तपासणीसाठी मुंबई येथे पाठवण्यात येणार असून त्यानंतरच नेमका उलगडा होणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डाŸ. किशोर जाधव यांनी सांगितले.
गोवरच्या संशयित रूग्णांमुळे आरोग्य यंत्रणा सतर्प झाली असून तालुका आरोग्य विभागामार्पत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या 5 विद्यार्थ्यांमध्ये ताप व अंगावरती पुरळ अशा पकारची लक्षणे आढळली आहेत. या सर्व रूग्णांचे नुमने घेण्यात आले असून मुंबईतील हापकीन इन्स्टिट्यूट येथे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.