चिपळूण प्रतिनिधी
विमा पॉलीसी सरेंडर करुन बँके खात्यात पैसे जमा करतो असे सांगून बँक खात्यामधून 2 लाख 97 हजार 999 रुपये काढून ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना 4 जुलै रोजी घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 जुलै रोजी सायंकाळी रात्री 8.15 च्या सुमारास मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी टोल फ्री व मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या वेबसाईट वरुन एका अज्ञाताने फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर संपर्क करुन पॉलीसी सरेंडर करुन फिर्यादी यांच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यात पैसे डिपॉझिट करतो असे सांगून त्याच्या बँके खात्यामधून एकूण 2 लाख 97 हजार 999 रुपये परस्पर संमत्तीशिवाय काढून ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चिपळूण पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.