रत्नागिरी प्रतिनिधी
शहरालगतच्या जून्या नर्मदा सिमेंट कंपनी लगतच्या एमएसईबी कार्यालयाजवळ सोमवारी दोन कारमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील दोघेजण जखमी झाले. संजय नामदेव कामेरकर (52, रा. घाटीवडे ता. संगमेश्वर) व रोहन राजेंद्र कामेरकर (29, रा. भांडूप मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी रोहन याने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी कारचालक विलास नारायण निकाळजे (34, रा.पनवेल रायगड) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहनहे 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास आपली कार (एमएच 03 सीएस 4344) घेवून साळवी स्टॉप ते परटवणे असे जात होते. यावेळी समोरून येणारी विलास याच्या ताब्यातील कार (एमएच 06 बी एम 3805) हिने रोहन याच्या कारला जोराची धडक दिली. अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विलासविरूद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.