वेंगुर्ले तालुका धान्यदुकानदार संघटनेची तहसिलदारांकडे मागणी
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले तालुक्यातील धान्य विक्रेते (धान्य दुकानदार) दर महिन्याच्या १ ते ४ तारीख पर्यंत वेळीच धान्य खरेदी करतो. असे असताना आपल्या शासकीय गोदामातून महिन्याच्या सुमारे २५ तारीख होवून गेली तरी धान्य येत नाही. तसेच वीजेचा लपंडाव, सर्वर नसल्यामुळे ई पॉस मशिन नेट न मिळणे, वयस्कर व्यक्तींचे थम न लागणे आदींमुळे धान्यदुकानदारांना धान्य वितरणांत वेळ लागतो. मात्र तहसिलदार पुरवठा विभागाच्या व्हॉटस ग्रुपवर धान्य दुकानदारांच्या कामाबाबत मॅसेज पाठवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या धान्यदुकानदारांना दोष दिला जातो. त्यामुळे धान्यदुकानदारांच्या मागणी प्रमाणे धान्य मिळावे अशी मागणी वेंगुर्ले तालुका धान्य दुकानदार संघटनेतर्फे तालुका पुरवठा विभागाकडे करण्यात आली आहे.
वेंगुर्ले तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक श्री. पवार यांना सादर केलेल्या लेखी निवेदनात, आम्ही वेंगुर्ले तालुक्यातील धान्य विक्रेते (धान्य दुकानदार) दर महिन्याच्या ४ तारीख पर्यंत वेळीच धान्य खरेदी करतो असे असताना आपल्या शासकीय गोदामातून महिन्याची २५ तारीख होऊन गेली तरी धान्य येत नाही. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना धान्य देताना आम्हा धान्य दुकानदारांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यात ई पॉस मशीनला वारंवार सर्वर नसल्यामुळे नेट मिळत नाही. वीज गेली तरी त्यामुळे कामात व्यत्यय येतो. त्यामुळे आमच्या मागण्या लक्षात घेऊन त्याची पुर्तता करा. यासंदर्भातील लेखी निवेदन तालुका पुरवठा विभागाचे निरीक्षक विजय पवार यांच्याकडे संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये यांच्या हस्ते लेखी निवेदन सादर करण्यात आले. सदरचे लेखी निवेदन तालुका पुरवठा निरीक्षक विजय पवार यांना लेखी निवेदन सादर करताना उपस्थित धान्य दुकानदारांत वेंगुर्ले तालुका धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये, रवींद्र पेडणेकर, गुरुनाथ मार्गी, अर्जुन सामंत, सुरेश गडेकर, सत्यवान कोळंबकर, बाबु घोगळे, जयवंत राऊत, श्यामसुंदर मुणनकर, राजन गावडे, किसन हंजनकर, सुहास नाईक, सौ. प्रिती परब, शेखर गावडे, पुजा केळुसकर, अनंत गावडे, सौ. शमिका परब, बाळाजी नाईक, सिध्देश सोन्सुरकर, राजन मोचेमाडकर आदी पदाधिकारी यांचेसह धान्यदुकानदार यांचा समावेश होता.









