सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांच्याकडून गणेश चतुर्थी निमित्त विठ्ठल मंदिर ,सावंतवाडी येथे गरजूंना तसेच शेकडो अंधबांधवांना शिधावाटप करण्यात आले . यावेळी तेल, तुरडाळ, साखर, गुळ, वाटाणे व अगरबत्ती वितरित करण्यात आली. श्री तळवणेकर यांनी 1989 मध्ये शिवसेनेचा विभाग प्रमुख असल्यापासून कारिवडे गावातून दरवर्षी शिधावाटप करण्यास सुरुवात केली होती. यावेळी कारिवडे गावचे पुरोहीत समीर भिडे , राष्ट्रीय दृष्टीहीन संघ कोकण विभाग अध्यक्ष बाबुराव गावडे, सेक्रेटरी महेश आळवे आदी उपस्थित होते . शिधावाटपासाठी विठ्ठल मंदिराची जागा विनामूल्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष अॅड.दिलीप नार्वेकर यांचे आभार मानण्यात आले.









