भारताचा विकास दर 6.3 टक्के राहणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेकडून भारतावर 25 टक्के शुल्क आकारण्याच्या भूमिकेनंतर रेटिंग एजन्सी फिच या संस्थेने भारताच्या विकास दराबाबत नव्याने अंदाज जाहीर केला आहे. आधीच्या तुलनेत विकासदरात कपातीचा अंदाज फिचने स्पष्ट केला आहे.
चालू आर्थिक वर्षाकरीता भारताचा जीडीपी दर 6.3 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज फिचने वर्तवला आहे. यासोबत अमेरिकेकडून लागू केलेल्या 25 टक्के शुल्काचा परिणाम भारतीय कंपन्यांवर नकारात्मक दिसणार असल्याचेही म्हटले आहे. गेल्या एप्रिलमध्ये फिचने आपला अंदाज जाहीर करताना 2025-26 करीता भारताचा जीडीपी दर 6.4 टक्के इतका राहणार असल्याचे म्हटले होते. फिचने म्हटले आहे की सुधारीत अंदाजानुसार भारताचा विकास दर आर्थिक वर्षात 6.3 टक्के इतका राहू शकतो. सिमेंट, निर्मिती साहित्य, ऊर्जा, पेट्रोलियम पदार्थ, पोलाद आणि अभियांत्रिकी व निर्मिती कंपन्यांना चांगली मागणी राहण्याची शक्यताही फिचने बोलून दाखवली आहे. पायाभूत सुविधांवरही खर्च चांगला केला जाणार आहे.









