वृत्तसंस्था/ सिडनी
रविवारी येथे झालेल्या एनएसडब्ल्यू खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या रतिका सिलनला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कॅनडाच्या टॉप सिडेड इमान शाहिनने विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात इमान शहिनने 24 वर्षीय रतिकाचा 11-8, 11-3, 4-11, 10-12, 12-10 अशा गेम्समध्ये 61 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत विजेतेपद पटकाविले. तत्पूर्वी शनिवारी या स्पर्धेत भारताच्या रतिका सिलनने पीएसए टूरवरील चौथ्या स्क्वॅश स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. तिने यापूर्वीच्या सामन्यात न्यूझीलंडच्या सहाव्या मानांकित इमा मर्सनचा पराभव केला होता.
अमेरिकेतील स्प्रींगफिल्ड येथे यापूर्वी झालेल्या स्क्वॅश स्पर्धेत रतिकाने न्यूझीलंडच्या इमा मर्सचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले होते.









