वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये सुरू असलेल्या एनएसडब्ल्यू खुल्या आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत भारताची स्क्वॅशपटू रतिका सीलनने उपांत्य फेरीत प्रवेश केला. रतिकाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत करेन ब्लूमचा पराभव केला.
24 वर्षीय द्वितीय मानांकीत रतिका सिलेनने करेन ब्लूमचा 11-8, 11-7, 11-4 अशा सरळ गेम्समध्ये 22 मिनिटांत पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात पाचव्या मानांकीत वीर छोत्रानीने इजिप्तच्या मोहम्मद शराफचा 11-7, 10-12, 11-5, 11-8 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.









