वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सहा हजार अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या नॉर्थ कोस्ट खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या रतिका सीलनने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. तामिळनाडूच्या सातव्या मानांकित रतिका सीलनने उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत न्यूझीलंडच्या मेडेन कोईचा 9-11, 11-8, 11-8, 11-2 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. रतिकाला या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. रतिकाचा पुढील फेरीतील सामना हाँगकाँगच्या तृतीय मानांकित लॅम्ब बरोबर होईल.









