प्रतिनिधी,कोल्हापूर
दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्रयात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी 6 रोजी पारंपरिक पद्धतीने करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव साजरा केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने रथोत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. रथोत्सवासाठी सागवानी लाकडात बनवलेल्या रथाचे वापर केला जाणार आहे. रात्री साडे आठ-नऊच्या सुमारास अंबाबाई मंदिराच्या महाद्वाराजवळ उभा केल्या जाणाऱ्या रथामध्ये अंबाबाईची उत्सवमूर्ती विराजमान केली जाईल. यानंतर साडेनऊ वाजता अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजावळ तोफीची सलामी दिल्यानंतर रथ नगरप्रदक्षिणेसाठी प्रस्थान करणार आहे.
सालाबादप्रमाणे यंदाच्या रथोत्सवातही घोडे, बॅण्ड, मानकरी, देवस्थान समितीचे पदाधिकारी व कर्मचारी व हजारो भाविक असा मोठा लवाजमा पहायला मिळणार आहे. याचबरोबर गुरूवारी दुपारी तीन वाजल्यापासून महाद्वार रोड, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, बालगोपाल तालीम, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड या रथोत्सवाच्या पारंपरिक मार्गावर भाविकांकडून रांगोळ्यांचे रेखाटन करण्याबरोबरच फुले व रांगोळ्याचा गालीचा तयार करण्यात व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे दुपारी 2 दोननंतर महाद्वार रोडसह नगरप्रदक्षिणा मार्गावर भाविकांना नो-एंट्री असणार आहे. मध्यरात्री रथ नगरप्रदक्षिणा मार्गावरून फिरून पुन्हा मंदिराच्या महाद्वाराजवळ आल्यानंतर रथातील उत्सवमूर्ती सोन्याच्या पालखीत विराजमान केली जाईल. यानंतर मंदिराला पालखीने प्रदक्षिणाही घालून रथोत्सवाची सांगता केली जाईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









