वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधणीचे कंत्राट रतन टाटा यांच्या टाटा समूहाला प्राप्त झाले आहे. टाटा समूहाची कंपनी पायाभूत सुविधा व बांधकाम करणारी टाटा प्रोजेक्टस यांना हे कंत्राट मिळाले आहे. सदरच्या विमानतळाच्या कंत्राटासाठी इतरांनीही बोली लावली होती, असे कळते. या स्पर्धेमध्ये इतर कंपन्यांना टाटाने मागे टाकत अखेर हे कंत्राट जिंकले आहे. या स्पर्धेमध्ये लार्सन अँड ट्रूब्रो आणि सायरस मिस्त्रांrच्या मालकीच्या शापूरजी पालनजी ग्रुप यांनीही भाग घेतला होता.
मिळालेल्या माहितीनुसार यमुना आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेड यांनी टाटा प्रोजेक्टची निवड केली आहे. नोएडा विमानतळ 2024 मध्ये सुरू होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. खासगी आणि सार्वजनिक भागिदारीतून सदरच्या विमानतळाची बांधणी केली जाणार आहे.
सर्वात मोठे विमानतळ
उत्तर प्रदेशमधील नोएडातील जेवार येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. एकदा का विमानतळाचे काम बांधून पूर्ण झाले की भारतातील सर्वात मोठे विमानतळ म्हणून या विमानतळाची ख्याती होणार आहे.
कोणती कामे होणार
हे आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माणाचे कंत्राट टाटा ग्रुपला मिळाले असून याअंतर्गत रनवे, टर्मिनल, पायाभूत सुविधांची उभारणी, रस्ते व इतर इमारतींचे काम केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.









