शाहुवाडी प्रतिनिधी
शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात घेतलेली अन्यायी भूमिका तसेच राजकीय आकासापोटी तालुक्यातील मंजूर विविध विकास कामांना दिलेली स्थगिती याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर येथे कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर सुमारे दोन तास रस्ता रोको केला. दोन तासानंतर अखेर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंदोलन स्थळी बोलताना माजी आमदार सत्यजित पाटील यांनी शिंदे सरकारवर चांगलाच टिकेचा निशाणा साधला. राजकीय आक्सापोटी विकास निधी रोखने हे एकच काम या मिंदे सरकारने केल आहे. विद्यमान आमदार विनय कोरे यांचे नाव न घेता. त्यांनी त्यांना चांगलाच टोला लागवला . विकास कामाचे नारळ जरूर तुम्ही फोडा .पण किमान खाजगीत तरी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार माना कारण त्यांनीच त्यांच्या कार्यकाळात शाहूवाडी तालुक्यातील विकास कामांना निधी मंजूर केला आहे. आठ वर्ष तुम्ही आमदार म्हणून काम करत आहात. या तालुक्यात तुम्ही तुमच्या कामाचा काय उजेड पाडला असा उपरोधीक टोलाही त्यांनी लगावला. अशी आक्रमक भूमिका ही त्यांनी यावेळी घेतली.
रणवीर सिंग गायकवाड म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलेल्या प्रोत्साहन पर अनुदानात दुजाभाव करून काही शेतकऱ्यावर अन्याय केला जात आहे. अशी भूमिका शासनाने बदलावी आणि खोकेबाज सरकारने शेतकऱ्यांच्या जनतेच्या विकासाची भूमिका घ्यावी. राजकीय अक्षापोटी विकास कामाला विरोध करण्याची वृत्ती या गद्दार सरकारने अवलंबली आहे. या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे, महादेवराव पाटील, पंडित शेळके, दिलीप पाटील, पांडुरंग पाटील, नामदेव पाटील, प्रकाश पाटील, विनायक कुंभार, स्नेहा जाधव , सुरेश पारळे, अमर पाटील, योगेश कुलकर्णी ,अलका भालेकर ‘पुनम भोसले राजू भोपळे आदींच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









