मॉस्को / वृत्तसंस्था
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एका 15 मजली इमारतीमध्ये शुक्रवारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. तर 4 जण जखमी झाले आहेत. आग लागल्यानंतर सुमारे 200 लोकांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले, असे एका अधिकाऱयाने सांगितले. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे सांगण्यात आले. आगीमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासानुसार ही आग पहिल्या मजल्यावरील वसतिगृहात लागली. त्यानंतर ती वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. या दुर्घटनेचा अधिक तपास केला जात आहे.









