सोनाली कुलकर्णी देखील महत्त्वाच्या भूमिकेत
सध्या मराठीत विविध धाटणीचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता लवकरच एक कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शॉर्ट अँड स्वीट’ असे या चित्रपटाचे नाव असून याचा टीझर सादर करण्यात आला. हा चित्रपट एक वेगळ्या विषयावर आधारित असल्याचे समजते. या चित्रपटात एक मुलगा स्वत:च्या वडिलांना भेटण्यासाठी अत्यंत उत्सुक असल्याचे दाखविण्यात आले आहे. अनेक वर्षांनी घरी परतलेला संजू स्वत:च्या वडिलांना पाहून नाराज का होतो, संजूचे वडिल नक्की कोण?, संजूच्या आईने त्याच्यापासून ही गोष्ट का लपवली असे अनेक प्रश्न टीझर पाहून उपस्थित होतात. या प्रश्नांची उत्तरे चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वाटसर आणि रसिका सुनील हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 3 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून याचे दिग्दर्शन गणेश कदम यांनी केले आहे. रसिका सुनील अन् हर्षद अतकरी यांच्यासाठी हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याचबरोबर युट्यूबर तुषार खेर अन् कॉमेडी किंग ओमकार भोजने यात अतिथी कलाकाराच्या भूमिकेत असणार आहे.









