5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट
रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. गीता आर्ट्स याप्रॉडक्शन हाउसने हा चित्रपट 5 भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. 7 नोव्हेंबर रोजी ‘द गर्लफ्रेंड’ हा चित्रपट रश्मिकाच्या चाहत्यांना चित्रपटगृहात जात पाहता येणार आहे.
तेलगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीजर सादर करण्यात आला असून यात रोमँटिक कहाणीची झलक दिसून येते. टीझरमध्ये रश्मिकाला सह-कलाकार सोबत एका रेस्टॉरंटमध्ये दाखविण्यात आले आहे. ‘द गर्लफ्रेंड’ चित्रपटाची कहाणी आणि दिग्दर्शनाची जबाबदारी राहुल रविंद्रन यांनी पेलली आहे. रश्मिका मंदाना आणि दीक्षित शेट्टी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत कौशिक महाता, रोहिणी आणि राव रमेश यासारखे कलाकारही दिसून येणार आहेत. चित्रपटाला हेशम अब्दुल वहाब यांनी संगीत दिले आहे. रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा झाला असल्याची चर्चा सध्या सुरू असून ते फेब्रुवारी महिन्यात विवाहबद्ध होणार असल्याचे बोलले जात आहे.









