अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच अभिनेता धनुषसोबत एका चित्रपटात दिसून येणार आहे. धनुषच्या 51 व्या चित्रपटात रश्मिका नायिकेची भूमिका साकारणार आहे. सध्या या चित्रपटाला ‘डी51’ नाव देण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर कम्मुला करणार आहेत. रश्मिका आणि धनुष हे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाला अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केले जाणार आहे.

निर्मात्यांनी धनुषच्या जन्मदिनापूर्वी या चित्रपटाची संकल्पना दर्शविणारे पोस्टर जारी केले होते. या चित्रपटाच्या कहाणीसंबंधी सध्या अधिक माहिती समोर आलेली नाही. धनुष सध्या ‘कॅप्टन मिलर’ चित्रपटावरून चर्चेत आहे. हा चित्रपट चालू वर्षी प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर धनुष हा आनंद एल. राय यांच्या ‘तेरे इश्क’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. रश्मिका मंदाना लवकरच ‘अॅनिमल’ या हिंदी चित्रपटात दिसून येणार आहे. डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रणवीर कपूरसोबत तिची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याचबरोबर सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा’चा सीक्वेल ‘पुष्पा 2’मध्ये ती दिसून येणार आहे.









