भारताच्या तरुणाईची क्रश म्हणून घराघरात पोहोचलेली रश्मिका सध्या बरीच चर्चेत आहे. तिच्या पुष्पा २ या सिनेमाने नुकताच १५०० कोटींचा बिझनेस पार केला आहे. तिचा सलमान खान सोबत सिकंदर हा सिनेमा लवकरच येणार आहे. दाक्षिणात्य सिनेमांसोबत रश्मिका बॉलीवूड मध्येही चांगलं नाव कमवक आहे. तर दुसरीकडे विजय देवरकोंडा सिनेसृष्टीमध्ये चांगलाच जम बसवत आहे.

या दोघांना नुकतेच एअर पोर्टवर एकत्र पाहिले गेले. त्यानंतर हे दोघे ख्रिसमस आणि न्यू ईअर व्हेकेशनसाठी एकत्र गेल्याची चर्चा सुरु आहे. तर या दोघांचा एअर पोर्टवरील एकत्र फोटो चांगलाच व्हायरल झालेला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा हे दोन्ही सेलिब्रिटी परदेशात निघून गेल्याचे सांगितले जात आहे. हे दोघेही वेगवेगळ्या वेळी विमानतळावर पोहोचले आहेत. दोघेही सुट्ट्यांसाठी एकत्र गेल्याचीही चर्चा रंगली आहे.









