अभिनेता विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना हे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटात काम करणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘छावा’ असून याची निर्मिती दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्सकडून करण्यात येणार आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट पुढील वर्षी 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे.
विक्की कौशलने यापूर्वी लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत ‘जरा हटके, जरा बचके’ या चित्रपटात काम केले आहे, या चित्रपटात सारा अली खान मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट यशस्वी ठरला होता. छावा चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण प्रामुख्याने मुंबईतच पार पडणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी विक्की कौशलने 4 महिन्यांपर्यंत तलवारबाजी अन् घोडेस्वारीचे ऑस्ट्रेलियात विशेष प्रशिक्षण घेतले आहे. तसेच या चित्रपटासाठी त्याने स्वत:चे वजन 10-12 किलोने वाढविले आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण 100 दिवसांहून अधिक काळापर्यंत चालणार आहे.









