मुंबई : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि काही महिन्यापुर्वी शिवसेना पक्षात प्रवेश कलेल्या दिपाली सय्यद यांनी पक्षाच्या फुटीनंतर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. संजय राउत यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळाले असे वक्तव्य हि त्ंयांनी केल असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील ती जबाबदारी पार पाडण्यास तयार असल्याचं दिपाली सय्यद म्हणाल्या. त्या आज मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या,”शिंदे साहेबांनी मला शिवसेनेत आणलं त्यामुळे त्यांच्यासोबत मला उभे राहणे गरजेचे आहे. माझा शिंदे गाटत पक्षप्रवेश नक्की असून मी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील ती जबाबदारी स्विकारण्यास तयार आहे.”
ठाकरे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, “मुंबई महानगरपालिकेतील ‘खोके’ येणं बंद झाल्याची खंत रश्मी ठाकरे यांना आहे. सुषमा अंधारे, निलम गोऱ्हे ह्या चिल्लर आहेत. खऱ्या सुत्रधार रश्मी ठाकरे आहेत.” असा हल्लाबोल त्यांनी केला. खोक्यांचे राजकारण काय आहे हे सर्वांना कळले पहिजे अशीही टिप्पणी त्यांनी केली.
Previous Articleसंजय राऊतांची अटक बेकायदेशीर ; न्यायालयाने ईडीला फटकारले
Next Article कोल्हापूर शहराच्या सीमेवर गव्यांची एंट्री!








