वृत्तसंस्था / नवी दिल्ली
झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अष्टपैलु रशिदखानचे अफगाण संघात पुनरागमन झाले आहे. ही मालिका झिम्बाब्वेमध्ये खेळविली जाणार आहे.
2021 च्या मार्चनंतर रशिद खानने एकही कसोटी खेळलेली नाही. पण या आगमी मालिकेसाठी अफगाणच्या निवड समितीने 26 वर्षीय रशिद खानला संधी दिली आहे. या मालिकेसाठी 18 जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. उभय संघातील पहिली कसोटी बुलावायो येथे 26 ते 30 डिसेंबर दरम्यान तर दुसरी कसोटी 2 ते 6 जानेवारी दरम्यान बुलावायोमध्ये खेळविली जाणार आहे.
अफगाण संघ: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रेहमतशहा (उपकर्णधार), इक्रम अलिखली, अफसर झेझाई, रियाज हसन, एस. अटल, अब्दुल मलिक, बहीरशहा मेहबुब, इस्मत आलम, ओमरझाई, झहीर खान, झिया ऊर रेहमान अकबर, जाहीर शेहजाद, रशिद खान, यामीन अहम्मदझाई, बशीरअहम्मद अफगाण, नावेद झेद्रान, फरिद अहम्मद मलिक.









