वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात अफगाण आणि श्रीलंका यांच्यात ऐतिहासिक पहिली कसोटी खेळविली जाणार आहे. मात्र अफगाणचा प्रमुख फिरकी गोलंदाज रशिद खानला दुखापतीमुळे या सामन्यात खेळता येणार नाही, अशी माहिती अफगाण क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली. या एकमेव कसोटीसाठी अफगाणचे नेतृत्त्व हसमतुल्ला शाहीदीकडे सोपविण्यात आले आहे.
25 वर्षीय रशिद खानच्या पाठ दुखापतीच्या समस्येवर अलीकडेच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने रशिद खानची या कसोटीसाठी निवड करण्यात आली नाही. अफगाण आणि लंका यांच्यातील ही एकमेव कसोटी 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान कोलंबोत खेळविली जाणार आहे. या कसोटीसाठी अफगाणचा संघ जाहिर करण्यात आला आहे.
अफगाणचा संघ लंकेच्या दौऱ्यात एकमेव कसोटी तसेच 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांच्या मालिका खेळणार आहे. रशिद खानच्या गैरहजेरीत अफगाणच्या कसोटी संघात फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू कयास अहमदचा समावेश करण्यात आला आहे.
अफगाण संघ – हसमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रेहमत शहा, ईक्रम अलिखिल, मोहम्मद ईसाक, इब्राहिम झद्रन, नूरअली झद्रन, अब्दुल मलिक, बशिर शहा, नासिर जमाल, कयास अहमद, झहिर खान, झीयाउर रेहमान अकबर, अहमदझाई, निजाद मसुद, मोहम्मद सलिम सफी आणि नावेद झद्रन.









