उस्ताद भगत सिंह चित्रपटात भूमिका
पवन कल्याणचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘उस्ताद भगत सिंह’मध्ये श्रीलीला मुख्य नायिका म्हणून दिसून येणार आहे. परंतु आता श्रीलीलासोबत आणखी एका अभिनेत्रीची यात वर्णी लागली आहे. पवन कल्याण यांच्या या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या जोरदार सुरू आहे.
राशि खन्ना आता दुसरी मुख्य नायिका म्हणून या चित्रपटात दिसून येणार आहे. राशिने यापूर्वी साई धर्म तेज आणि वरुण तेजसोबत तेलगू चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. तर पवन कल्याण यांच्या या चित्रपटात आशुतोष राणा, गौतमी, नागा महेश, टेम्पर वामसी आणि केजीएफ फेम अविनाश देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
या चित्रपटाची निर्मिती मैथरी मूव्ही मेकर्स करत आहेत. तर या चित्रपटाला देवी श्री प्रसाद यांचे संगीत लाभणार आहे. या चित्रपटाबरोबर पवन कल्याण हे ‘हरि हर वीर मल्लु’मध्ये दिसून येणार आहेत. हा एक ऐतिहासिक अॅक्शन अॅडव्हेंचर चित्रपट असेल. या चित्रपटाला कृष्ण जगरलामुदी आणि ए.एम. ज्योति कृष्णा यांनी दिग्दर्शित केले आहे. यात बॉबी देओल, निधी अग्रवाल, नोरा फतेही आणि विक्रमजीत विर्क यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.









