तुमचे ग्रह तुमचाच अंदाज ( भाग 5)
खरा ज्योतिषी जर कुठल्या ग्रहाला घाबरतो तो ग्रह म्हणजे बुध! नावावरूनच, बुद्धीचा कारक असलेला हा बुध, ‘जैसी संगत वैसी रंगत’ या म्हणीवर तंतोतंत उतरतो. मी म्हणालो की, बाकीच्या ग्रहांपेक्षा बुधाबद्दल घाबरायचे कारण असे की, रवीपासून केतूपर्यंत सगळ्या ग्रहांचे वागणे, त्यांचे असणे, त्यांच्या अवस्था, त्यांचे परिणाम हे प्रेडिक्टेबल आहे म्हणजे, सांगता येते की, कोणता ग्रह कोणत्या परिस्थितीत कसा वागेल पण बुधाच्या बाबतीत हे सांगणे महाकठीण काम आहे. तो ज्या ग्रहाबरोबर बसला आहे त्याचे सगळे गुण आत्मसात करतो. नवग्रहांच्या मंत्रिमंडळामध्ये बुधाला राजकुमार अशी संज्ञा आहे.
लहान मुल ज्याप्रमाणे मोठ्यांप्रमाणे वागायचा प्रयत्न करते, त्याचप्रमाणे हा बुध ज्या ग्रहाबरोबर बसतो त्या ग्रहाप्रमाणे वागतो. चांगल्या ग्रहाबरोबर बसला असेल तर चांगले फळ देईल आणि वाईट ग्रहाबरोबर बसला असेल तर वाईट फळ देईल. म्हणून हे महाकठीण काम आहे. बुधाला वाणीचा म्हणजे, वाचेचा कारक मानले गेलेले आहे. बुध बुद्धीदाता आहे. बुधामुळे तर्कशक्ती कशी आहे हे कळू शकते. गुऊ जर ग्लोबल इकॉनॉमीचा कारक असेल तर बुध हा लोकल इकॉनॉमीचा कारक आहे. तुम्ही करता तो व्यापार बुधाच्या अधिपत्याखाली येतो. तुमचे बोलणे कसे असेल हे बुध ग्रह ठरवतो. तुमची त्वचा कशी आहे हे कळण्याकरता बुधाकडेच पहावे लागते. एखाद्या व्यवहारांमध्ये तुम्ही किती तर्कशुद्ध पद्धतीने समोरच्याला कन्व्हीन्स करता याचे मूळ बुधाकडेच आहे. अकाऊंटिंगचा कारक ग्रह बुध. चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी मजबूत ग्रह लागतो तो सुद्धा बुधच. देवाण घेवाण, खाते वही, हिशोब हे सगळे बुधाचे डिपार्टमेंट. तुमचे प्रेझेंटेशन कसे आहे, तुम्ही बोलता कसे, तुमचा लिखित व्यवहार कसा आहे हे दाखवण्याचे कामसुद्धा बुधच करतो.
बुध खराब होण्याची लक्षणे सांगतो म्हणजे, तुम्हाला तुमचा बुध कसा आहे हे आपोआप कळेल. जर दात आणि नखे खराब होत असतील तर कुठे ना कुठे बुधाचे बळ कमी पडत आहे हे नक्की. जर वाचेमध्ये दोष असेल (तोतरेपणा, एखादा शब्द उच्चारण्यास कठीण जाणे.) ते सुद्धा खराब बुधाचे लक्षण आहे. हिशोबात तारतम्य ठेवता येत नसेल, गणित हा विषय अति अवघड वाटत असेल किंवा गणिताविषयी एक प्रकारची चीड असेल तरीही बुध खराब आहे, असे म्हणता येईल. आपल्या क्षमतेवर विश्वास नसणे, एखादे काम वारंवार करावे लागत असणे, कायम संभ्रमावस्थेत असणे, हे करू की, ते करू? अशी मन:स्थिती असणे, प्रवासात वारंवार अडचणी येणे, लेखी व्यवहार करत असताना योग्य शब्द न सापडणे, कोणत्याही परिस्थितीत बावचळून जाणे, त्वचारोग जसे की, सोरायसिस, डाग पडणे हे खराब बुधाचे लक्षण आहे.
शिक्षणात वारंवार अडचणी येणे, शिक्षणात रस न राहणे, बिझनेस करता न येणे, बुद्धी न चालणे या सगळ्या गोष्टी बिघडलेल्या बुधामुळे होतात. अशी जर लक्षणे असतील तर खालील उपाय करण्यास काहीही हरकत नाही.
- बुध खराब असलेल्या व्यक्तींनी घराजवळ किंवा घरामध्ये जाड पाने असलेली झाडे कधीही लावू नये 2. पंचपल्लव म्हणजे पिंपळ, औदुंबर, अशोक, आंबा आणि वड यांच्या पानाचे तोरण लावण्यानेसुद्धा बुधाच्या दोषापासून मुक्तता मिळवता येते. 3. श्री गणेशाची आणि श्री विष्णूची आराधना बुधाच्या दोषांमध्ये रामबाण उपाय आहे. 4. एखाद्या गरजू पण उंचीने कमी असलेल्या व्यक्तीला मुगाचे दान देण्यानेसुद्धा बुधाच्या त्रासापासून मुक्तता मिळवता येते. 5. तृतीयपंथीयांचा आदर करणे, त्यांना शृंगाराच्या वस्तू हिरव्या कापडासोबत दान दिल्याने खराब बुध चांगला होऊ शकतो. 6. आपल्या मावशीशी, बहिणीच्या मुलीशी संबंध चांगले ठेवल्याने बुध चांगला राहतो. 7. तुरटीने दात घासल्याने बुधाच्या दोषांमध्ये कमतरता येते. जेवणाचे ताट मांडून झाल्यानंतर एक घास गाई करता, एक घास कावळ्या करता आणि एक खास कुत्र्याकरता काढून ठेवून त्यांना दिल्याने बुधाच्या सगळ्या दोषांपासून मुक्तता मिळू शकते 9. बुधाचे रत्न वापरत असताना अत्यंत सावध राहावे लागते. काही लोक नीलम रत्नाला भीतीदायक मानतात. पण बुध खराब असताना जर पन्ना धारण केला तर तो त्याहीपेक्षा डेंजर काम करतो. त्यामुळे रत्न वापरत असताना ऊर्जा संस्कार केलेले पन्ना किंवा मरकज हे अत्यंत विचारपूर्वक वापरावे.
मेष
मन अस्थिर होण्याची शक्यता आहे. कसली तरी हुरहूर मनाला लागून राहील. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असे होऊन जाईल. पण अशा चिंतेने तब्येतीची हेळसांड होईल, हेही लक्षात घ्या. आणि तब्येतीला सांभाळा.
उपाय : नामस्मरण करा.
वृषभ
जोडीदाराचे सुख छान मिळेल. स्वत:चा काही व्यवसाय असेल तर प्राप्ती चांगली होईल अथवा नोकरी असेल तर त्यात प्रगती होईल. काही किरकोळ खटके उडण्याची पण शक्मयता आहे. त्यामुळे शक्मयतो वादविवाद टाळा. चोरीस गेलेली एखादी वस्तू किंवा द्रव्य मिळण्याची शक्मयता आहे.
उपाय : गरजूंना मदत करा.
मिथुन
जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. लॉटरी किंवा गुप्त धन मिळण्याची शक्मयता आहे. एखाद्या लॉटरीचे तिकीट काढून नशीब आजमावून पहायला हरकत नाही. आपल्या कामामध्ये बुद्धीचातुर्य दाखविण्याची संधी मिळाली तर सोडू नका.
उपाय :तुळशीला रोज पाणी घाला.
कर्क
हा आठवडा अतिशय आनंदात जाईल. वेळ सत्कारणी लावा. एखादी छान ट्रीप काढा. पण आनंद साजरा करतानाच दुसऱ्यांना पण आनंदी करा. त्यांचाही आशीर्वाद घ्या, म्हणजे तुमचा आनंद द्विगुणित होईल. दानधर्म करा. सत्संगाचा लाभ होण्याची शक्मयता आहे.
उपाय : गाईला खाऊ घाला.
सिंह
आपली तर ‘पाचो उंगलिया घी में’ अशी अवस्था दिसत आहे. पैसा व नावलौकिक दोन्ही आपल्याला मिळण्याची शक्मयता दिसत आहे. वरिष्ठ आपल्यावर खुश असतील. वडिलांचे योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळेल. हा आठवडा आनंदात जाईल.
उपाय : मुक्मया प्राण्यांना खाऊ घाला.
कन्या
वडील, भावंडाचे सहकार्य मिळेल. आपल्याला नोकरीमध्ये अथवा आपल्या व्यवसायामध्ये फायदा होण्याची शक्मयता दिसत आहे. समाजात आपल्याला मानमरातब प्रतिष्ठा मिळेल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आनंदात दिवस घालवाल. त्यांचेसुद्धा आपल्याला सहकार्य लाभेल.
उपाय : लक्ष्मीची आराधना करा.
तूळ
खर्चावर नियंत्रण ठेवा. खर्च करताना तो योग्य ठिकाणी खर्च होतो का याची शहानिशा करा. आपल्या वागण्यावर निर्बंध घाला. नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ देऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण असू द्या. क्षणिक आनंदासाठी आरोग्याशी खेळ कऊ नका.
उपाय : पक्ष्यांना पाणी द्या.
वृश्चिक
स्वभावाला मुरड घालावी लागेल. तुमचा मूळ तामसी स्वभाव उफाळून वर येण्याची शक्मयता आहे. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. मातेच्या आणि स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. आपल्या कामाशी प्रामाणिक रहा. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.
उपाय : हनुमान चालीसाचे पारायण करा.
धनु
कुटुंबासोबत हा आठवडा आनंदात घालवाल. आपल्या बोलण्याने समोरच्या माणसावर छाप पाडाल. परंपरेने आलेल्या संपत्तीचा व्यवस्थित विनियोग विचारपूर्वक करा. कुटुंबातील सदस्य सामंजस्याने राहतील आणि ते तसेच रहावेत यासाठी तुमचे प्रयत्न असतील.
उपाय : दत्ताची उपासना करा.
मकर
ऑफिसमध्ये आपल्या कामाची चांगली चुणूक दाखवाल. पण थोडे कष्ट करावे लागतील असे वाटते. भावंडांचे चांगले सहकार्य लाभेल. एखादा छोटा प्रवास घडण्याची शक्मयता आहे. आपली कर्तबगारी व बुद्धी यांची सांगड व्यवस्थित घालाल. एकंदरीत हा आठवडा सुखकारक जाईल.
उपाय: मुंग्यांना साखर घाला.
कुंभ
मातेच्या तब्येतीची काळजी घ्या. स्थावर इस्टेटीच्या संदर्भात कोणत्या तरी कटकटीतून तुम्ही जाण्याची शक्मयता आहे. वाहन जपून चालवा. वाहन पार्किंग करताना योग्य ठिकाणी करा. कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिक रहा.
उपाय : लक्ष्मीपूजन करा.
मीन
संततीची काळजी घ्या. त्यांच्या वागण्यात चंचलता, अस्थिरता येण्याची शक्मयता आहे, सांभाळा. बाकी त्यांच्या अभ्यासात प्रगती असेल. पण योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ल्यांची त्यांना गरज भासण्याची शक्मयता आहे. अचानक धनलाभाची शक्मयता आहे.
उपाय : गरिबाला खायला द्या





