मेष
मनाची अवस्था काहीशी अस्थिर अशी असेल. कामांमध्ये डेडिकेटेडली मन लागण्याचे अवघड आहे. जे करतो आहे ते आपण का करतो आहे अशी मनस्थिती होईल त्यामुळे ज्या प्रकारे रिझल्ट मिळायला हवे त्याप्रमाणे मिळणे अवघड आहे. पुढे येणाऱ्या खर्चाबद्दल चिंतेत असाल. गुरुवारी काही महत्त्वपूर्ण घटना घडू शकते.
मुंग्यांना साखर घालावी
वृषभ
वैवाहिक जीवनामध्ये किंवा इतर नात्यांमध्ये काहीसा तणाव जाणवत असेल तर दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा, समाधान मिळेल. आपल्या ध्येयाबद्दल चिंता करण्यापेक्षा त्याकडे जाण्याचा मार्ग शोधलेला बरा. जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तीशी भांडण होण्याची शक्मयता आहे. करिअरच्या बाबतीत काहीसे असमाधान असेल.
पांढरा गुरुमाल जवळ ठेवावा
मिथुन
एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिती होऊ देऊ नका. ऑफिसमध्ये वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत ऐकून काम केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या मतावर ठाम रहा आणि आपल्या कामाशी मतलब ठेवा. काही जुन्या गोष्टी रिपीट होऊ शकतात. पैशांच्या बाबतीत काळजी करण्याचे कारण नाही.
गरजूला चप्पल दान द्या
करायला गेलो एक आणि झाले भलतेच असे वाटण्याच्या परिस्थितीमध्ये असाल. कोणा करताही कितीही चांगले केले तरी त्याचा अनुभव कटू येण्याची शक्मयता आहे. परिवारातील सदस्यांमध्ये एकोपा राहावा यासाठी आपल्या मताला मुरड घालाल. काही सवयीन विषयी गांभीर्याने विचार करा. पुढे येणाऱ्या खर्चाला तयारी ठेवावी.
नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक सामान पश्चिमेला फेका
सिंह
तुमचा स्वभाव आणि आजूबाजूच्या लोकांशी तुमचे वागणे हे काहीसे विसंगत असण्याची शक्मयता आहे, त्यामुळे कोणाशीही बोलताना शब्दांचा वापर जपून करावा. कामाच्या ठिकाणी केलेल्या कामाला काही किंमत न मिळाल्यामुळे राग राग होईल. वैवाहिक जोडीदाराच्या अवास्तव मागण्यांना कंटाळून जाल. मित्राला मदत करावी लागेल.
गरजूला तांब्याची वस्तू भेट द्या
कन्या
घरातील सुख-समृद्धीसाठी मंगळवारी काही ना काही दान देणे गरजेचे असेल. या काळात तुमचे वागणे नम्रपणाने भरलेले ठेवल्यास अनेक कामे सहजपणे पूर्ण होतील. सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे दिवस आहेत. शुक्रवारी तब्येतीला सांभाळावे लागेल. ऑफिस मध्ये कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवू नका. कामाची प्रशंसा होईल.
नारळाच्या झाडाला पाणी घालावे
तूळ
या आठवड्यामध्ये काहीशी संमिश्र्र फळे मिळण्याची शक्मयता आहे. कामाच्या ठिकाणी काही समस्यांना तोंड द्यावे लागेल पण त्याचबरोबर घरच्यांच्या सहकार्यामुळे बऱ्याच समस्यांमध्ये समाधान मिळेल. अति भावनाशील राहाल तर आजूबाजूचे लोक तुमचा फायदा उचलू शकतात किंवा लहान सहान गोष्टींचे टेन्शन येऊ शकते.
केळीच्या झाडाखालील माती जवळ ठेवावी
वृश्चिक
धनप्राप्ती करता हा आठवडा महत्त्वाचा असेल. काही नवीन प्रोजेक्ट किंवा काही नवीन कामे मिळण्याची शक्मयता आहे. निगोसिएशन्स मध्ये सफलता मिळेल. ओळखीच्या एखाद्या माणसाच्या कामाकरता मध्ये पडावे लागेल. यामध्ये वेळ आणि पैसा खर्च होऊ शकतो पण पुढे जाऊन याचा फायदा होईल. स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्या.
वारुळाकडे पांढरे फुल आणि लाह्या ठेवाव्यात
धनु
इतरांना अनावश्यक कारणाकरता इम्प्रेस करायचा प्रयत्न करू नका, यामध्ये नुकसान होऊ शकते. या आठवड्यामध्ये तुमच्या इमेजला जपणे अत्यंत आवश्यक असेल. तुमच्या ओळखीचेच लोक तुमच्या बाबतीत काही अफवा पसरवू शकतात लक्ष असू द्या. एखादी समस्या भेडसावत असेल तर तज्ञ माणसाचा सल्ला कामी येईल.
अनाहूतपणे आलेल्या पाहुण्याला दूध साखर द्यावी
मकर
हा थोडा कित्येक बाबतीमध्ये लाभदायक ठरू शकतो. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. तब्येतीची थोडीफार कुरबुर असेल पण फार काळजी करण्याचे कारण नाही. कामाच्या ठिकाणी योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतल्यामुळे फायदा होईल. एखादी वस्तू खरेदी करण्याचा बराच काळ प्लॅन केलेला असेल तर तो आता पूर्ण होईल.
सूर्यास्तानंतर काळे तीळ दान द्या
कुंभ
कामाच्या ठिकाणी फोकस थोडा कमी होण्याची शक्मयता आहे, त्यामुळे वरिष्ठांकडून बोलणे खावे लागू शकते. या काळात मनामध्ये थोडीशी दुविधा असेल पण योग्य ते माहिती मिळेपर्यंत कुठलाही निर्णयापर्यंत येऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा आणि गरज लागल्यास इतरांचा सल्ला घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.
दिव्यांगाना आर्थिक मदत करावी
मीन
पुढील काळात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्मयता आहे, त्यामुळे कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बेपर्वाही करू नका. मनातील हेतू सगळ्यांना सांगणे योग्य नाही. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे पण त्याचबरोबर पैशाची आवक चांगली असेल. नवीन वस्तू घेण्याचा योग आहे. आहारावर नियंत्रण ठेवल्यास तब्येतीची तक्रार असणार नाही.
अन्नदान करा
टॅरो उपाय: काही लोकांच्या आयुष्यामध्ये संकटांची मालिका संपतच नाही आणि संकटेही अचानकपणे येतात. अचानक तब्येत तरी बिघडते , पैसे तरी जातात. अशा लोकांकरता उपाय आहे. शनिवारी 09.30 ते 10.30 या काळामध्ये एक सोललेला नारळ घेऊन सुनसान ठिकाणी जावे आपल्या डोक्यावरून सात वेळेला तो फिरवावा आणि जमिनीवर जोरात फोडावा. मागे वळून न बघता परत यावे.





