खजाना : – 25-10-2023
नोव्हेंबर महिन्यातील लौकिक मुहूर्त आणि इतर माहिती
क्र. विशेष तारीख
1 शुभ दिवस 1,2,3,4 दु. 12 नं, 5,6,10,11,12,14,15,16,17 स 11 नं, 18, 20 दु. 4 नं, 21, 22, 23 स 10 प, 24 स 9 प, 25, 26 दु.2 प, 27 दु.2 नं, 28, 29, 30 दु.2.14 नं
2 अशुभ दिवस 7, 8, 9, 13, 19
3 सण/ उत्सव/ विशेष तिथी 1- संकष्टी(चंद्रोदय रात्रौ 08.57), 9- रमा एकादशी, वसू बारस, 10- गुरू द्वादशी व धनत्रयोदशी, 11- शिवरात्र, 12- नरक चतुर्दशी-अभ्यंगस्नान, 13- दर्श अमावस्या, 14- बलीप्रतिपदा-दिवाळी पाडवा-वही पूजन, 15- भाऊबीज, 16- विनायक चतुर्थी (महालय समाप्ती), 23-प्रबोधनी एकादशी, 24- तुळशी विवाहारंभ, 26- वैकुंठ चतुर्दशी- त्रिपुरारी पौर्णिमा, 27- कार्तिक स्नान समाप्ती-गुरू नानक जयंती, 30- संकष्टी (चंद्रोदय रात्रौ 08.36)
4 अमावस्या/ पौर्णिमा अमावस्या :12-11-2023 दुपारी 02.44 ते 13-11-2023 दुपारी 02.56 पर्यंत/ त्रिपुरारी पौर्णिमा 26-11-2023 दुपारी 03.53 ते 27-11-2023 दुपारी 02.45 पर्यंत ( कार्तिकस्वामी दर्शन 26-11-2023 सायं 07.54.48 ते 27-11-2023 दुपारी 1.34.26 पर्यंत),
5 साखरपुड्याचे मुहूर्त 1, 6 दु. 1 नं, 9 सायं 5 नं, 14, 16, 18, 25 दु. 3 प, 27 दु. 2 नं, 28, 29 दु.2 प
6 बारसे (नाव ठेवण्या चे) मुहूर्त 4 दु. 12 नं, 9 सायं 5 नं, 14, 25 दु. 3 प, 27 दु. 2 नं, 29 दु.2 प
7 जावळाचे मुहूर्त 1, 3, 5 स 10 प, 14, 24 स. 9 प, 29 दु. 2 प
8 भूमिपुजनाचे/ पायाभरणीचे मुहूर्त 16 दु.12 .34 प, 17 दु 12.23 ते 4 प, 18 स 7.15 ते 4 प, 22 दु.2.45 प, 25 12.55 ते 4 प, 27 दु.1.35 ते 4 प, 29 दु. 1.58 प
9 गृहप्रवेशाचे मुहूर्त (व्यवहारीक मुहूर्त) 3, 5 स 10 प, 10 दु. 1 प, 14, 16 दु.1 प, 18, 25 दु. 3 प, 29 दु.2 प
10 वास्तूशांतीचे मुहूर्त(व्यवहारीक) 18 स 08.15 ते सायं 4 प, 24 स 09.04 प, 27 दु. 1.35 ते सायं 4 प, 29दु.1.58 प
11 व्यापार सुरु करण्याचे मुहूर्त 1, 3, 4
12 वाहन खरेदी चे मुहूर्त 3, 10, 20, 27
13 शेत जमीन/जागा/ प्रॉपर्टी/ फ्लॅट खरेदी साठीचे मुहूर्त 3, 7, 8, 13, 14, 17, 22
14 शेतीच्या कामांसाठी उपयुक्त दिवस 1, 2, 4, 8, 10, 15, 16, 18, 20दु. 4.30 नं, 22, 23, 24,25 दु. 2.30 प, 26, 29, 30
15 डोहाळे मुहूर्त 1, 14, 16, 28 दु.2 नं, 29 दु.2 प, 30 दु.3 नं
16 पंचक सोमवार 20-11-2023 सकाळी 10.07 ते शुक्रवार 24-11-2023 दुपारी 04.01 पर्यंत
मेष
गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या खर्चामुळे येणाऱ्या काळामध्ये पैसे बचत करण्याकडे प्रयत्न असेल. तब्येतीचा पाया म्हणावा तितका बळकट नाही. त्यामुळे सांभाळून राहिलेले बरे. धनप्राप्ती करता काही लोकांची मदत घ्यावी लागू शकते आणि त्याचबरोबर प्रवासही करावा लागू शकतो. गुंतवणूक करण्याकरता चांगली वेळ आहे.
उपाय पक्षांना बाजरीचे दाणे घाला.
वृषभ
संसर्गिक रोगांच्या साथीमध्ये सांभाळून राहिलात तर, तब्येतीला काही धोका नाही. पण काळजी घेतलेली बरी. आर्थिक दृष्ट्या उत्तम काळ आहे. जुन्या मित्राला दिलेले पैसे आकस्मिकरित्या परत मिळतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल, अशी काही घटना घडू शकते. प्रॉपर्टीच्या दृष्टीने उत्तम काळ आहे.
उपाय लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये प्रसाद दाखवावा.
मिथुन
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला तब्येतीचा त्रास काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. आरोग्य सुधारते, म्हणून प्रयत्न कराल. पैशाचा ओघ चांगला असेल. व्यावसायिकांना चांगल्या संधी मिळतील. प्रवासाचे योग आहेत. प्रॉपर्टीसंदर्भात कोणताही व्यवहार करत असताना सावध राहणे शहाणपणाचे ठरेल.
उपाय टेरेसवर रिकामे साखरेचे पोते ठेवा
कर्क
तुमच्या आत्मविश्वासात वाढ झाल्यामुळे कठीण कामेही लिया पूर्ण कराल. त्याचबरोबर दुसऱ्यांबरोबर असलेली नाती सुधारण्याचा प्रयत्नही कराल. घरात आनंदाचे वातावरण असेल, पण एखाद्या सदस्याचे वागणे मनाला लागू शकते. पैशांच्या बाबतीत भाग्यवान असाल. नोकरदारांना चांगली अर्ध प्राप्ती होईल. व्यावसायिकांचा फायदा असेल.
उपाय गुळ दान द्या
सिंह
तब्येतीच्या बाबतीत थोडे सांभाळून राहिलेले बरे. बाकी चिंता करण्याचे खास असे काही कारण नाही. कुटुंबामध्ये थोडी वादावादी होऊ शकते. अशा वेळी पडती बाजू घेणे योग्य ठरेल. पैशांकरता काही टेन्शनना सामोरे जाण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीकरता चांगला काळ आहे. नोकरदार वर्गाला काम जास्त लागेल.
उपाय गाईला गोड चपाती घाला
कन्या
काळजी न घेतल्यास, तब्येतीची गंभीर समस्या उद्भवू शकते. पथ्य पाणी व्यवस्थित पाळा. मंगल कार्यामध्ये घरातील सदस्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो. प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये व्यवहार करणाऱ्यांकरता चांगला काळ आहे. शेअर बाजारासारख्या धोक्याच्या गुंतवणुकीपासून दूर राहा. नोकरदार वर्गाला इक्रिमेंट मिळेल.
उपाय छाया दान करावी
तूळ
तब्येत नाजूक असेल. कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये, याची काळजी घ्यावी लागेल. मनातील गुप्त गोष्टी इतरांसमोर प्रकट करण्याआधी विचार करा. प्रवासाचा प्लॅन कराल. तिथे योग्य मानसन्मान मिळेल. घराकरता जास्त खर्च करावा लागू शकतो. छोट्या मोठ्या गुंतवणुकीतून फायद्याचे संकेत आहेत.
उपाय तुमच्या मिळकतीतला काही भाग गरिबांना दान द्या.
वृश्चिक
घरातील काही सदस्य तब्येतीच्या तक्रारीपासून मुक्त झाल्याने मनाला आनंद होईल. उत्साहामध्ये वाढ होईल. नवीन काहीतरी करावे असे वाटेल. काही संधींकरता उपलब्ध साधने कमी पडू शकतात. पैशांची आवक चांगली असेल, पण खर्चही वाढेल. प्रवास शक्यतो टाळावा. कागदोपत्री व्यवहार जपून करा. टेन्शन न घेता काम करा.
उपाय मनगटावर लाल स्वस्तिक काढावे.
धनु
आपण बरे की, आपले काम बरे, असे आपले वागणे कामाच्या ठिकाणी ठेवल्यास मानसिक क्लेशापासून मुक्तता होईल. तब्येत चांगली असेल. पैशांच्या बाबतीत काहीसे टेन्शनचे वातावरण दिसते. कागदोपत्री व्यवहारात चांगले यश मिळेल. प्रॉपर्टीचे व्यवहार जपून करा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून त्रास होणार.
उपाय अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ घालावे
मकर
कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या तब्येतीला सांभाळावे लागेल. छोट्या मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास नंतर जास्त त्रास होऊ शकतो, हे ध्यानात ठेवा. आर्थिकदृष्ट्या समाधानकारक वातावरण असेल. कुटुंबातील सदस्यांची चांगली साथ प्राप्त होईल. घरात एक छोटेखानी फंक्शन होऊ शकते. प्रेम संबंधांमध्ये दुरावा येईल.
उपाय तुळशीला दूध मिश्रित पाणी घालावे
कुंभ
तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे न वागल्याने मानसिक त्रास होऊ शकतो. म्हणून जास्त अपेक्षा ठेवू नका. तब्येत चांगली असेल. कामे वेळेवर पूर्ण होतील. एखाद्या कागदोपत्री व्यवहारांमध्ये विलंब होऊ शकतो. पण त्याचे कारण तिसरी एखादी व्यक्ती असेल. घरातील वातावरण सणासुदीला वादावादीचे असेल.
उपाय काळ्या रंगाचा वापर टाळावा
मीन
आजूबाजूच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊन तुम्हाला कष्ट होऊ शकतात. जमेल आणि झेपेल इतकेच कामे करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीमध्ये सावध राहणे गरजेचे आहे. लहान भावंडांकडून म्हणावी तशी साथ मिळणार नाही. प्रॉपर्टीच्या कामात यश मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे.
उपाय :कपाळावर गोपीचंदन लावावे.