21-09-2022 27.9.2022
राहू द्या ना !!!!!!
(राहू काळ, गुलिक काळ, यमघंट काळ)
हॅलो!!! तुम्ही फेसबुक वरती आहात का? व्हाट्सअप वापरता? झी ते किंवा फोन पे मधून पेमेंट केले आहे का? निदान पब्जी तरी खेळला असाल. तुम्ही म्हणाल की हे कसले प्रश्न आज मी विचारतोय! पण नाही. या सगळय़ाचा संबंध लेखाशी आहे. वास्तविकता आणि आभासी वास्तविकता यातील संबंध म्हणजे राहू!!! आज्जी तुम्ही फेसबुक वापरता, तुम्हाला काय वाटतं की आणि पाच दहा वर्षांनी ते तसेच असेल? नाही. अजिबात नाही. तुम्ही मेटावर्सची संकल्पना ऐकली असेल. या आभासी जगामध्ये तुमचा स्वतःचा एक अवतार असेल!! त्याचे दिसणे वागणे बोलणे हे तुम्ही निश्चित कराल. त्या आभासी जगतात तुमच्या अवताराला जे अनुभव येतील किंवा त्याच्या माध्यमातून तुम्ही जे अनुभव घ्याल ते वास्तविक जगतातल्या अनुभवाइतकेच खरे किंवा रिअल असतील. आज क्रिप्टो करन्सी हे जागतिक चलन झाले आहे. ज्यांनी दहा वर्षापूर्वी क्रिप्टो करन्सी दहा रुपयाला घेतली ते आज करोडपती आहेत आणि गंमत म्हणजे ही क्रिप्टो करन्सी कुणाच्याही पाकिटात नाही! ती व्हर्च्युअल आहे म्हणजे आभासी आहे आणि आभास म्हटला की राहू आला. आता मला सांगा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सगळय़ात जास्त महत्त्व असलेला ग्रह दुसरा कोणता असू शकेल का? आजचे जग हे राहूचे आहे. मायाजालाचे आहे. भ्रमाचे आहे आणि या सगळय़ाचा कारक ग्रह जो आहे तो राहू आहे. म्हणून आजचा हा लेख हा राहुकाल यमघंट काल आणि गुलिक काल यावरती आहे. हा लेख लिहीत असताना चंद्र मंगळाच्या धनि÷ा नक्षत्रात आहे आणि राहु मंगळाच्या मेषेत आहे. म्हणजे या लेखावरसुद्धा राहूचाच अंमल असणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. राहूच्या आर्द्रा, स्वाती आणि शततारका नक्षत्रात घेतलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू ही नेहमी खराब होते. आता राहुकाल म्हणजे काय हे सांगतो. आजकाल प्रत्येक जण राहू कालाचे टाईम टेबल घेऊन फिरतो. राहु काल म्हणजे कुठलीही नवीन गोष्ट सुरू न करण्याची वेळ. राहूची एक खासियत म्हणजे हा कुठल्याही गोष्टीला खंडित करतो. म्हणजे तोडतो. म्हणून राहू कालामध्ये नवीन गोष्ट सुरू करू नये. त्यावेळी पूर्वी सुरू केलेली गोष्ट तुम्ही निश्चितच पुढे घेऊन जाऊ शकता. त्याला काहीही फरक पडत नाही. ‘ज्यांचा चांगला असेल राहू तोच म्हणेल याs s हू.’ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जर वेळेचे आठ भाग केले तर त्यातला एक भाग म्हणजे राहू काळ. प्रत्येक दिवशी तो वेगवेगळय़ा वेळी असतो. याला लक्षात ठेवण्याची ट्रिक म्हणजे सोमवारी 7.30ला शशीकपूरने शूजमध्ये बूट गुरफटून मंटा रचवला’. यातील पहिले अक्षर वाराचे प्रतीक आहे. सो म्हणजे सोमवार, श म्हणजे शनिवार, शु म्हणजे शुक्रवार. म्हणजेच सोमवारी सकाळी 07.30 ते 9.00, शनिवारी 09 ते 10.30, बुधवारी 10.30 ते 12 याप्रमाणे दीड तास वाढवत जायचा! सोपे करून सांगितले ना? गुलिक काळ हा शुभही असू शकतो आणि अशुभसुद्धा असू शकतो. या काळामध्ये केलेली गोष्ट पुनः पुन्हा घडते. म्हणून या काळात शुभ कार्ये करावीत. श्राद्ध, नोटिसीला उत्तर देणे, दावा दाखल करणे असली कामे टाळावीत. यमघंट हा राहू काळासारखाच आहे. यामध्ये प्रवास करणे यासारख्या गोष्टी करू नयेत. सोबत दिलेल्या टेबलप्रमाणे प्रत्येक दिवसाचे नियोजन आता तुमचे तुम्ही करू शकता.
दिवस राहू काळ गुलिक काळ यमघंट काळ
रविवार 04.30 pm ा 06.00 pm 03.00 pm- 04.30 pm 10.30 am ा 12.00 pm
सोमवार 07.30 am ा 09.00 am 01.30 pm – 03.00pm 12.00 pm ा 01.30 pm
मंगळवार 03.00 pm ा 04.30 pm 12.00 pm – 01.30 pm 09.00 pm ा 10.30 pm
बुधवार 10.30 am-12.00 pm 10.30 am – 12.00 pm 07.30 am ा 09.00pm pmpm-pm ampm am ampmpm pmpmpmpm am
गुरुवार 01.30 pm ा 03.00 pm 09.00 am – 10.30 am 06.00 am ा 07.30 am
शुक्रवार 12.00 pm- 01.30 pm 07.30 am ा 09.00 am 03.00 pm ा 04.30 pm
शनिवार 09.00 am ा 10.30 am 06.00 am ा 07.30 am 01.30 pm ा 03.00 pm
मेष
तुमच्या आवडत्या पदार्थांवर ताव माराल. धनप्राप्तीचे नवीन मार्ग मिळू शकतात. कुटुंबातील वातावरण पोषक असेल. तब्येतीची तक्रार होऊ शकते. निर्भीड वागण्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. प्रवासातून धनलाभ होऊ शकतो. वादविवादात जय मिळेल. इन्व्हेस्टमेंट करताना सांभाळून रहा. नोकरदार वर्गाने आपली इमेज सांभाळावी. वैवाहिक जीवनात ताणतणाव संभवतो.
उपाय ः लाल गायीची सेवा करावी
वृषभ
व्यक्तिमत्त्वाला झळाळी येईल. नवीन कामे करण्याकरता उत्साह वाढेल. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. पैशांच्याबाबतीत भाग्यवान असाल. नवीन दागिना खरेदी करायचे ठरवाल. आईच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. प्रेम प्रकरणात अपेक्षाभंग संभवतो. नोकरदार वर्गाने वरि÷ांची मर्जी राखावी. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तीर्थयात्रेचा योग संभवत आहे.
उपाय ः केळीच्या झाडाची पूजा करावी
मिथुन
निराशा दूर होईल. आशादायक वातावरण तयार होईल. तब्येतीची उत्तम साथ मिळेल. धन प्राप्तीचा आनंद घ्याल. एफडी किंवा गुंतवणूक करण्याकडे कल असेल. प्रवास शक्मयतो टाळावा. कागदोपत्री व्यवहारात सावध रहावे. मातृ चिंता वाटू शकते. जमिनीचे व्यवहार पुढे ढकलावेत. शेअर मार्केटसारखी धोकादायक गुंतवणूक करू नये. नोकरदार वर्गाला कष्टाचा परतावा मिळेल.
उपाय ः लहान मुलीला हिरव्या बांगडय़ा भेट द्याव्या
कर्क
येणारा काळ हा छोटय़ा गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळवून देणारा असेल. पण त्याकरता चिकाटी आणि अभ्यासाची गरज आहे. कलाकारांना आणि खेळाडूंना उत्तम दिवस असतील. नोकरदार वर्गाला अंतर्गत राजकारणापासून सावध रहावे लागेल. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे क्षण येतील. जवळची एखादी व्यक्ती कळत नकळत नाव खराब करू शकते.
उपाय ः गरजवंताला पांढरे वस्त्र दान द्यावे
सिंह
तब्येतीच्या बाबतीत तुम्ही जागरूक जरी असला तरीसुद्धा येणारे काही दिवस आरोग्याला सांभाळावे लागेल. सर्दी पडसे डोकेदुखी सारखे आजार त्रास देऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या हट्टामुळे वातावरण बिघडू शकते. कागदपत्रे गहाळ होणे किंवा कागदोपत्री व्यवहारात चूक होणे अशा घटना घडू शकतात. प्रेमप्रकरणात यश मिळेल. नोकरीत आपले काम चोख करावे.
उपायः घराच्या पूर्वेकडील हनुमानाचे दर्शन घ्यावे
कन्या
मनाविरुद्ध एखादी लहानशी जरी घटना घडली तरी नैराश्य येऊ शकते. अशावेळी निराश न होता सकारात्मक विचार करावा. धनप्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. घरातील सदस्यांमध्ये लहानसहान गोष्टींवरून भांडण होऊ शकते. प्रवास घडेल. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रेमसंबंधात मधुरता येईल. नोकरीत अप्रिय घटना घडू शकते. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात.
उपाय ः सरकारी शाळेत वह्या दान द्याव्या.
तूळ
आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. सांधेदुखी किंवा व्हायरल आजार त्रास देऊ शकतात. धनप्राप्ती उत्तम असेल. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे मोठे काम होईल. प्रवास टाळावा. सही करताना सावध राहावे. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. करमणुकीकडे दुर्लक्ष करून कष्टाकडे लक्ष देण्याची वेळ आहे.
उपाय ः पिंपळाला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात
वृश्चिक
आरोग्यम् धनसंपदा हे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. जिथे पैसे अडकले आहेत तिथून पैसे परत मिळवण्याकरता अतिरिक्त कष्ट करावे लागतील. कुटुंबात थोडी वादावादी होऊ शकते. कागदोपत्री व्यवहारांमध्ये यश मिळेल. कुटुंबातील ज्ये÷ स्त्रीच्या तब्येतीची काळजी वाटेल. धोकादायक गुंतवणूक टाळावी. नोकरदार वर्गाने कामात चूक होऊ देऊ नये. वैवाहिक सुख उत्तम असेल.
उपाय ः हनुमानाला विडा अर्पण करावा
धनु
येणाऱया काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान वाटेल. पैशांची आवक उत्तम असल्यामुळे बरेचसे प्रश्न सुटतील. तब्येतीला जपावे लागेल. प्रवासात धनहानी संभवते. कागदपत्रे गहाळ होण्याचे योग आहेत. गुंतवणुकीच्या नावाखाली एखादा माणूस तुम्हाला फसवू शकतो. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे. वैवाहिक सुख सुंदर असेल. अपघातापासून सावध रहा.
उपाय ः गणेश उपासना करावी.
मकर
नैराश्य दूर होईल. मनासारखी कामे होतील. तब्येतीची साथ मिळेल. डोळय़ांचे विकार होऊ शकतात. धन प्राप्तीकरता प्रवास संभवतो. कुटुंबात थोडेबहुत क्लेश कलह होऊ शकतात. छोटय़ा गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. प्रेम प्रसंगांमध्ये मधुरता येईल. नोकरदार वर्गाला चांगला मोबदला मिळेल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. हितशत्रूपासून सावध रहा.
उपाय ः पाण्यात काळे तीळ घालून शंकराला अभिषेक करावा.
कुंभ
घरातील वाद-विवादामुळे डिस्टर्ब होऊ शकता. पैशांची आवक मनासारखी न झाल्याने चिडचिड होऊ शकते. संवाद साधताना योग्य त्या शब्दांचा उपयोग करा अन्यथा हाती आलेले काम जाऊ शकते. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरी करणाऱयांनी वरि÷ांची मर्जी संपादन करावी. छोटय़ाशा गोष्टींवरून वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात.
उपाय ः लाजाळूचे मूळ जवळ ठेवावे
मीन
हातापायाची दुखणी किंवा टाच दुखी यासारखे आजार त्रास देऊ शकतात. कुटुंबातील व्यक्तींची योग्य वेळेला साथ न मिळाल्यामुळे मन उदास होऊ शकते. प्रवासातून फायदा होईल. कागदोपत्री व्यवहारात यश मिळेल. जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रेमात यश मिळेल. नोकरदार वर्गाला सावध राहण्याची गरज आहे. जोडीदाराशी वाद-विवाद संभवतात.
उपाय ः लाल विटेचा एक तुकडा जवळ ठेवावा





