22/10।2023 ते 28/10 2023
मेष
प्रवासामधून तुम्हाला फायदा होऊ शकतो. कुटुंबातील व्यक्तीची साथ मिळेल. सन्मानाचे चांगले योग आहेत. सगळ्या प्रकारचे लाभ मिळतील. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. स्थावर मालमत्तेबाबत अनुकूल काळ आहे.
-घरातून बाहेर पडताना वडिलांचा आशीर्वाद घ्या.
ऋषभ
कौटुंबिक सुख आणि धनप्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला कामी येईल. प्रवासात दुखापत होऊ शकते. नात्यांच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा सहयोग मिळेल. वैवाहिक जीवनात सुख समाधान राहील. गुप्तशत्रू राजकारण करतील.
– हिरवा चारा दान द्या.
मिथुन
आरोग्याची छोटी, मोठी तक्रार सतावू शकते. विश्वास आणि ताकद कुठेतरी कमी पडते, असे वाटेल. पैशाची आवक उत्तम राहील. लांबच्या नातेवाईकांशी महत्त्वाच्या विषयावर बोलणे होईल. प्रवास घडेल. गुंतवणुकीतून लाभाची शक्यता आहे. नोकरदारवर्गाला अनुकूल काळ आहे.
– मजुरांना सरबत दान द्या
कर्क
तब्येतीची उत्तम साथ असली तरी सुद्धा निष्काळजीपणा नको. स्वभावामध्ये उतावळेपणा येईल. पैशाची आवक मनासारखी असणार नाही. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा त्रास संभवतो. पैसा गुंतवताना खात्री करून घ्या. वैवाहिक जीवन मनासारखे असेल. छोट्या-मोठ्या अपघातापासून सावध रहावे. मित्रासोबत वेळ घालवावा.
– दुधाचे दान द्यावे
सिंह
सगळ्या प्रकारच्या लाभाकरता शुभ काळ आहे. समाजात मान-सन्मान वाढेल, पद, प्रतिष्ठा प्राप्त होईल. छोट्या गुंतवणुकीतून लाभ संभवतात. नोकरीमध्ये संधी प्राप्त होईल. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांच्या विचारात असाल तर, उत्तम काळ आहे. जवळच्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल.
– विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके द्या
कन्या
तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ताप, पोटाचे विकार, डोकेदुखी त्रास देऊ शकते. घरातील व्यक्तीचा विरोध सहन करावा लागेल. प्रवास वाहन दुरुस्तीला येऊ शकते. जुने येणे वसूल करायचा प्रयत्न करा. नोकरदाराला अनुकूल वेळ आहे.
– तांबूस रंगाच्या गायीला चपाती आणि गूळ खाऊ घाला.
तूळ
चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबरोबर भांडण होऊ शकते. धनप्राप्ती सहजतेने होणार नाही. प्रवासात त्रास होऊ शकतो. गुंतवणुकीतून लाभ होईल. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे. वैवाहिक जीवनामध्ये वादावादीचे प्रसंग येतील.
-गोमती चक्र जवळ ठेवा.
वृश्चिक
विशेष कारणाकरता साठवलेले पैसे खर्च करावे लागतील व त्यामुळे चिडचिड होऊ शकते. प्रवास करण्याकरता योग्य वेळ आहे. जमिनीचे व्यवहार सध्या नको. नोकरीमध्ये कष्टाचे फळ मिळेल. वैवाहिक जोडीदाराकडून उत्तम सुखप्राप्ती असेल. कामात यश मिळेल.
– जुने वस्त्र दान द्या
धनु
तब्येत सुधारल्यामुळे मन आनंदी असेल. जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न करा. कुठेही सही करताना सावध रहावे. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. प्रेमात धोका होण्याची शक्यता आहे. नोकरीत असमाधानी असाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मान-सन्मान मिळेल.
– बदाम दान द्या
मकर
धनप्राप्ती उत्तम असेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रवास शक्यतो टाळावा. वाहनासंबंधित तक्रार येऊ शकते. छोट्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. प्रेमसंबंध बळकट होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल. वाहन चालवताना सावध राहण्याची गरज आहे.
-हिरव्या रंगाचा रुमाल जवळ ठेवा
कुंभ
तब्येत उत्तम असेल. घरच्यांसाठी इतरांशी बोलणी कराल. कुटुंबामध्ये वादविवाद होण्याची संभावना आहे. प्रवास घडेल. भावंडांचे सुख मिळेल. घरातील डागडुजी करता खर्च कराल. मातृतुल्य व्यक्तीशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांमध्ये दुरावा संभवतो. नोकरीत यश मिळेल.
लहान मुलीला पांढरे पुष्प द्यावे.
मीन
पैसा टिकवण्यासाठी प्रयत्न करा. छोटे, मोठे प्रवास टाळण्यामध्ये शहाणपणा आहे. वाहन आणि स्थावर सुख उत्तम असेल. प्रेम प्रकरणांमध्ये अपमान होण्याची शक्यता आहे. धोकादायक गुंतवणूक करू नका. नोकरीमध्ये ताणतणावाला सामोरे जाल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.
तिळेल दान करावे
घरात सुख असावे, बरकत यावी, असे कोणाला वाटत नाही? घरातील स्त्रीवर्ग आनंदी असेल तरच घराला बरकत येते. यासाठी घरात, ज्या ठिकाणी सूर्य प्रकाश पोहोचत नाही, अशा ठिकाणी एका कुंडीत सावलीतील झाड लावावे. त्याच्या मातीत, मातीचीच गोळी करुन ती कायम ओली राहील, असे पाहावे. आनंद, समाधान आणि बरकत येईल.





