18 ते 24 ऑक्टोबर 2023
या प्रकारे जर विचार केला तर काळ किंवा वेळ ही सुद्धा सापेक्ष आहे. म्हणजे पृथ्वीवरती जी वेळ आहे ती चंद्रावरती नसेल. पृथ्वीचा एक दिवस म्हणजे गुरू ग्रहावरती एक तास असू शकतो. बरोबर ना? याचाच अर्थ इतर ब्रम्हांडांमध्ये राहणाऱ्या लोकांकरता काळाची संकल्पना वेगळी असेल. सनातन संस्कृतीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे देवांचा किंवा पितरांचा एक दिवस म्हणजे माणसाचे एक वर्ष. आणि श्राद्ध काल हा मानवी वर्षाच्या ज्या वेळेला येतो ती वेळ म्हणजे पितरांची दुपार असते आणि त्यामुळे आपण त्यांना पिंडदान किंवा जेवण कृतज्ञतापूर्वक देतो. याचा अर्थ आपण वर्षातून एकदा त्यांना जेवायला घालतो असा नाही तर त्यांच्या कालमानाप्रमाणे आपण रोज दुपारी त्यांना जेवण देतो. म्हणजे ही 2 विश्वामधली एक प्रकारची अंतरमितीय देवाणघेवाण आहे थीयरी- मार्क मेसी, संशोधक). आपल्या संस्कृतीमध्ये विविध समाजांमध्ये श्राद्धाचे विविध प्रकार असले तरी एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे आपण केवळ आपल्या पितरांनाच नाही तर आपण यापूर्वी जन्म घेतलेल्या सगळ्या योनींमध्ये जे आपले पितर होते त्यांना, आपल्या गुरूजनांना, आपल्यासंबंधी आणि मित्रांना इतकेच काय तर आपल्याकडे काम करणाऱ्या सेवकांचेदेखील स्मरण या श्राद्धात करतो. ही सुंदरता केवळ सनातन धर्मातच आहे.
महा उपाय:
नोकरीमध्ये प्रगती/ बढती होत नसेल तर खालील उपाय मनापासून करावा. शुक्ल पक्षातल्या पहिल्या सोमवारी चांदीच्या तारेमध्ये तीन गोमती चव्रे बांधून आपल्या जवळ ठेवावी. दर शुक्रवारी या गोमती चक्रांवर चंदनाचा लेप लावावा. ‘तुम उपकार सुग्रिवही किन्हा, राम मिलाये राजपद दिन्हा’ हा मंत्र कायम म्हणत राहावा.
सोपी वास्तु टिप:
घरात आपल्या पूर्वजांचा फोटो असू नये. किमान तो कुठल्याही भिंतीवर लावलेला असू नये. आणि लावायचाच असल्यास तो दक्षिण पश्चिम दिशेलाच लावावा. इतर कुठेही लावू नये.
मेष
वारसा हक्काच्या कामात काही प्रमाणात दिरंगाई होईल. तीर्थयात्रेसाठी उत्तम काळ आहे. उद्योगधंद्यामध्ये वातावरण थोडे मनाविऊद्ध असेल, तरीही व्यवसायात जास्त लक्ष देऊन तसेच कोणावर कोणत्याही प्रकारे अति विश्वास न ठेवून प्रगती कराल. आर्थिक बाबतीत काळ उत्तम आहे.
उपाय : घरातून बाहेर पडताना खडीसाखर खाऊन बाहेर पडावे.
वृषभ
रोजच्या मिळकतीमध्ये थोडेसे प्रमाण कमी होईल, तरीही आपण धैर्य गलित न होता समाधान मानावे. अचानक धनलाभ होण्याची शक्मयता आहे. धार्मिक कामात वादाचे प्रसंग येऊ शकतात. संयम पाळूनच बोलावे. मित्रांचे सहकार्य उत्तम मिळेल.
उपाय: तुळशीला रोज पाणी घाला.
मिथुन
जवळच्या व्यक्तीकडून मानहानी होऊन मनस्ताप होण्याची शक्मयता आहे. हरवलेल्या वस्तू मिळतील. वाहने जपून चालवावीत. तब्येतीच्या मनाने हा काळ ठीक असला तरी काळजी घेतलेली बरी. आर्थिक बाबतीत चढउतार असेल.
उपाय: शिवलीलामृताचा अकरावा अध्याय वाचावा
कर्क
विचारांमध्ये थोडी निराशा येऊ शकते. जुन्या रोगांवर औषध उपचार मिळून थोडासा दिलासा वाटेल. भागीदारीत खटके उडण्याचा संभव आहे, तेव्हा दुसऱ्याला विश्वासात घेऊन बोलावे. वैवाहिक जोडीदाराची साथ उत्तम मिळेल.
उपाय: दिव्यांगांच्या शाळेत दूध वाटप करावे
सिंह
आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि योग्य तो औषधोपचार करवून घ्यावे. अचानक मार लागणे किंवा संसर्ग होऊ शकतो. प्रतिस्पर्धी व्यक्ती तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात प्रगती करून पुढे जाण्याचा संभव आहे. पित्ताचा त्रास होईल. माने कडेल दुखणे त्रास देऊ शकते.
उपाय: सूर्यनमस्कार घालावेत
कन्या
लहान भावंडांची चिंता सतावेल. त्यांच्या आर्थिक प्रगतीवर थोडासा प्रगती परिणाम होऊन त्रास वाटेल. घराचे व वाहनांचे सुख उत्तम असेल. मुलांच्या हट्टीपणामध्ये वाढ होईल. तेव्हा त्यावर लगेचच आळा बसविणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी बोजा वाढेल.
उपाय: लहान मुलींना गोड खाऊ घालावे
तुळ
आयात निर्यातीच्या व्यवसायात मंदी येईल. त्यामुळे थोडे मन उदास असेल. फिरता व्यवसाय करत असाल तर, चांगला फायदा होऊ शकतो. मित्र परिवारांच्या सहकार्याने धार्मिक ठिकाणी प्रवास होतील. सासरवाडीकडून भांडणे होण्याची शक्मयता आहे, तेव्हा जपून वागावे.
उपाय: शुभ्र वस्त्र वापरावे
वृश्चिक
आपल्या महत्त्वाकांक्षांना आळा घालण्याचा हा काळ आहे. सर्वच गोष्टी मनासारख्या होणार नाहीत. त्यासाठी काही दिवस वाट बघणे आपल्या हिताचे आहे. कुटुंबाचा चांगल्या प्रकारे सहयोग मिळेल. बाहेरच्या खाण्याची सवय कमी करावी. भावाला पैशांची मदत कराल.
उपाय : मंगळवारी दुर्गादेवीच्या दर्शनाला जावे
धनु
कोर्टकचेरीमधील कामात यश प्राप्ती मिळेल. त्यामुळे तुमचा दिवस आनंदाचा असेल. देवीची पूर्ण कृपादृष्टी तुमच्यावर असेल. कुटुंबात वाद होण्याचा संभव आहे. तेव्हा सर्वांना समजून घेणे आपल्या हिताचे आहे व त्यामुळे पुढे होणारे नुकसानही टळू शकते.
उपाय: कुटुंबाबरोबर तीर्थक्षेत्री जा.
मकर
वैवाहिक जोडीदारासाठी वेळ काढून तिच्या आवडीची वस्तू खरेदी करून द्याव्या लागतील. कामाचा दर्जा उंचावलेला असेल. अचानक कामासाठी लांबच्या यात्रा होतील. त्याच्या तयारीसाठी आपली धडपड वाढणार आहे पण यश मात्र तुमचेच आहे.
उपाय : नवग्रह स्तोत्राचे वाचन करावे
कुंभ
नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर सध्या तो विचार बाजूला ठेवून, आहे त्या नोकरीमध्ये लक्ष देऊन पुढील वाटचाल करावी. आनंद वार्ता समजेल. वडीलधाऱ्यांकडून चांगल्या प्रकारचे सहकार्य प्राप्त होईल. निद्रा नाशाचा त्रास होण्याची शक्मयता आहे.
उपाय : रात्री झोपताना हनुमान चालीसाचा पाठ करावा
मीन
वडिलांच्या तब्येतीला जपावे लागेल. उपचारासाठी दुसऱ्या गावाला जावे लागू शकते. त्यासाठी धावपळ होण्याची शक्मयता आहे. तेव्हा लगेच निर्णय घेऊन त्यावर योग्य ती अंमलबजावणी करावी. कोणत्याही प्रकारची उसनवारी करू नये.
उपाय: गुरूवारी नवनाथांचा पाठ करावा





