मेष –
काही कारणाने तब्येतीची तक्रार असेल. विशेषत: पायांच्या टाचेचा किंवा पायाला मार लागण्याची शक्मयता आहे, तेव्हा सावधानी बाळगावी व जपून हालचाल करावी. कामे व्यवस्थित पार पडतील. शुभ समाचार येतील. लोकांकडून मान-सन्मान मिळेल.
-मंदिरामध्ये जाऊन तेल वाहावे, आर्थिक संकट दूर होईल.
वृषभ –
कामाचा दर्जा कमी होऊ नये, म्हणून सल्ला मसलत करावी लागेल. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांची मर्जी संपादन होईल, असे वर्तन ठेवावे. प्रवासात त्रास होण्याची शक्मयता आहे. वडिलांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. आपला देवावरील विश्वास जास्त वाढला असेल.
-इष्ट मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे.
मिथुन
कामाप्रमाणे मोबदला मिळणार नाही, तेव्हा जास्त अपेक्षा न ठेवता आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे आपल्या हिताचे असेल. मित्र परिवाराकडून मुबलक प्रमाणात सहकार्य लाभेल आणि त्यातूनच योग्य दिशा मिळेल. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील.
-शुक्रवारी देवीच्या मंदिरात जाऊन गजरा वाहावा.
कर्क
अधिकारात बढतीची शक्मयता असेल. मात्र गुप्त शत्रू डोके वर करून आपली कामे खराब करण्याची शक्मयता आहे. पण त्यावर आपण हुशारीने मात करून पुढील वाटचाल कराल. कोणालाही न दुखवता, गोड बोलून आपली कामे करावी.
-गणपती मंदिरामध्ये पाच बुंदीचे लाडू ठेवावेत.
सिंह
स्वभावात थोडा बदल केला तर, बरीच कामे होऊ शकतात. आर्थिक तंगी मात्र जाणवू शकते. कुटुंबामध्ये सहकार्याचे वातावरण राहील, अशी आपली वागणूक ठेवावी. सर्व व्यवहार खबरदारीने करावे. नोकरी करणाऱ्यांना थोडी मनाविऊद्ध कामे करावे लागतील. पण त्यातच आपला फायदा असेल.
-मंदिरात पिवळे गुलाबाचे फूल ठेवावे.
कन्या
तब्येतीच्या काही तक्रारी कमी झाल्या असल्यामुळे मन स्थिर होण्यास वाव मिळेल. आत्मविश्वास वाढेल. आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पण पथ्य सांभाळणे आवश्यक आहे. काही बाबतीमध्ये आजूबाजूचे लोक त्रास देऊ शकतात.
– बुधवारी मंदिरामध्ये तुळस वाहावी.
तूळ
भाग्याची पूर्ण साथ मिळेल. तीर्थक्षेत्राला भेट देण्याची इच्छा उत्पन्न होऊन ती पूर्ण होईल. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. बाहेरचे खाणे टाळावे. एखादी छोटीशी यात्रा घडेल. आपल्या भावना व्यक्त करताना अडचणी निर्माण होतील.
-सोमवारी शंकराला बेलपत्र वाहावे.
वृश्चिक
तब्येतीविषयी योग्य तो डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. निवांतपणा घेणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच आहे. व्यावसायिकांना तेजीचा अनुभव येईल. प्रवास लाभदायक होईल. कोणत्याही प्रकारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे टाळा. – चंदनाचा टिळा रोज कपाळी लावावा.
धनु
कोर्टकचेरीमधील कामात मनासारखे परिणाम दिसून येणार नाहीत. धनहानीपासून आपला कसा बचाव होईल, याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे हालचाल करावी. कोणत्याही परिस्थितीत मन विचलित होणार नाही, याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी कौटुंबिक सल्ला घेणे आवश्यक आहे.
-विठ्ठल रखुमाई मंदिरात तुळस अर्पण करावी.
मकर
आपल्या मनात आपल्या वैवाहिक जोडीदाराला काहीतरी भेटवस्तू द्यावी, अशी इच्छा उत्पन्न होऊन त्याप्रमाणे आपण निर्णय घेणार आहात. अचानक यात्रा करावी लागू शकते, त्याच्या तयारीस लागा. आर्थिक बाबीमुळे खरेदीचा विचार रहित करावा लागू शकतो.
-घरातून बाहेर निघताना दही खाऊन बाहेर पडावे.
कुंभ
नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर, सध्या तो विचार रहित करावा. त्यातच आपले भले आहे. मामा, मावशींच्या भेटीगाठी होतील. आनंद वार्ता कळेल. मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्मयता आहे. थोडाशी विश्र्रांती आवश्यक आहे, असे वाटेल. पित्ताचे प्रमाण वाढेल.
-शिव चालीसाचा पाठ नियमित करावा.
मीन
वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष देऊन त्यांना योग्य प्रकारे डॉक्टरी उपचार करावा लागेल. त्यामुळे आज आपली दगदग होईल. कामाच्या ठिकाणी मात्र चांगल्या प्रकारे यश प्राप्ती होईल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
-सार्वजनिक अन्नदानामध्ये मदत करावी.
ज्यांना अकारण भीती वाटते, त्यांनी लोखंडाचा एक तुकडा आकार नसलेल्या म्हणजे, एखाद्या पूजल्या जाणाऱ्या पाषाणाला स्पर्श करून, तो तापवून आंघोळीच्या पाण्यामध्ये बुडवावा व अंघोळ करावी. हे नियमित केल्यास, अकारण वाटणारी भीती/ तणाव नाहीसा होईल.





