पितृदोष-पितरांचे कोपणे-पितृशाप वगैरे वगैरे
(भाग-1)
(हा पहिला लेख उपरोधात्मक/टीकात्मक आहे, पुढचा लेख ज्योतिषिय दृष्ट्या महालय-पक्ष पंधरवडा आणि उपायांवर आहे)
समजा तुम्ही मेलात (जे एक ना एक दिवस होणारच आहे!) आणि तुमची एखादी इच्छा अपूर्ण राहिली, किंवा तुमच्या नावाने तुमच्या पुढच्या पिढीने तुमचे काहीच केले नाही… तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला शाप द्याल का? त्यांच्या लग्नामध्ये अडचणी आणाल का? त्यांना मूलबाळ होऊ देणार नाही का? नाही ना? मग आपले पूर्वज आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये त्रास का देतील? पितृदोष म्हणजे पितरांनी केलेल्या चुकांचा फटका तुम्हाला बसतो असे आहे का? म्हणजे करावे कोणी आणि भरावे कोणी.! मूल होत नसेल, अडचणी येत असतील, विवाह होत नसेल, काम धंदा व्यवस्थित चालत नसेल, घरात शांती नसेल तर काही ज्योतिषांचा हुकमाचा एक्का म्हणजे जातकाला सांगणे की ‘तुम्हाला पितृदोष आहे किंवा कालसर्प दोष आहे आणि अमुक अमुक ठिकाणी जाऊन नारायण नागबली किंवा कालसर्प शांति करा.’ प्रत्येक व्यवसायामध्ये ज्याप्रमाणे चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येतात. त्याचप्रमाणे ‘ज्योतिष’ या व्यवसायातसुद्धा येतात. आणि खास करून जिथे ज्योतिष आणि कर्मकांड हातात हात घालून चालते. काही प्रŽांची उत्तरे आणि त्यावरचे उपाय यावरती हा लेख आहे. म्हणून समजून घ्या की, आपल्या धर्मामध्ये पुनर्जन्म ही संकल्पना आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे मृत्यूच्या समयी जीव-आत्मा पाच कोषांपैकी तीन कोष घेऊन बाहेर पडतो आणि ज्याप्रमाणे एखादी अळी एका पानावरून दुसऱ्या पानावर जाताना दुसऱ्या पानावर पाय ठेवून मग मागच्या पानाला सोडते त्याप्रमाणे जीवात्मा हा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. असे असताना मग हे पितृ राहतात कुठे? त्यांचा पुनर्जन्म का होत नाही? त्यांचा जर पुनर्जन्म झाला तर मग ते आपले पितर कसे? आणि जर ते पितरच नसतील (म्हणजे नवीन शरीरामध्ये असतील)तर मग आपण तर्पण केलेले त्यांना पोहोचेल कसे? या पद्धतीने विचार करणे गरजेचे नाही का? कुंडलीमध्ये रवी, चंद्र, राहू यांच्या स्थितीप्रमाणे पितृदोष याचा विचार केला जातो आणि त्याप्रमाणे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला किंवा इतर तीर्थक्षेत्री विधी करायला सांगितले जातात. 50 लोकांना एकत्र बसवून करून घेतलेल्या त्या तीन दिवसाच्या विधीमुळे सगळे चांगले झाले असे सांगणारा एकही जातक मला गेल्या वीस वर्षात भेटलेला नाही. असो. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पितरांना पूजनाच्या पद्धती आहेत. आपल्या इथे पक्ष पंधरवडा किंवा महाळमास पाळला जातो. आफ्रिकेच्या घानामध्ये वूडूनन उत्सवामध्ये पितरांना पूजतात. मेक्सिकोमध्ये डे ऑफ डेड, रोमन पॅथलिकमध्ये वेनरेटेड सेंट, चीन ’शी’ उत्सव, (शी म्हणजे प्रेतात्मा) जपानमध्ये शिंतो राइट्स जिथे कामी म्हणजे पूर्वज यांची पूजा होते, फिलिपिन्समध्ये पगनिटो अशाप्रकारे अनेक
संस्कृतींमध्ये पूर्वजांना पूजले जाते. श्राद्ध या शब्दाचा अर्थ ‘श्र्र’ म्हणजे निष्ठा आणि ‘ध’ म्हणजे धारण करणे असे असू शकते. हेच जर नसेल तर फोटो लावा किंवा कर्मकांड करा, काय उपयोग आहे त्याचा? कबीरदास म्हणाले आहेतच. जिंदा बाप कोई न पूजे, मरे को बाद में पूजवावे, मुठ्ठी भर चावल लेकर, कव्वे को तब बाप बनावे !! माटी का एक नाग बनाके, पूजे लोग लुगाया। जिंदा नाग जब घर मे निकले, ले लाठी धमकाया।। . . (क्रमश:)
मेष
आरोग्य सुधारेल. पैशाच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कुटुंबीयांसोबत एखाद्या मंगल समारंभात भाग घ्याल. प्रवास शक्मयतो टाळावा. कागदपत्रे सांभाळण्याची गरज आहे. पत्रव्यवहार किंवा लेखी व्यवहार करत असताना योग्य शब्दाचा वापर करावा वैवाहिक जीवनात जबाबदारी वाढल्याने चिडचिड होईल.
उपाय: कामाला निघताना गोड खाऊन निघावे.
वृषभ
बुद्धीचा बळावर कठीण प्रसंगावर मात कराल. मागील काळात अनुभवलेल्या अडचणी दूर होतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आरोग्य उत्तम असलेतरी योग्य ती काळजी घ्यावी लागेल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. घराकरता खर्च होईल. शेअरबाजारापासून कटाक्षाने दूर राहा.
उपाय:चंदनाचा टिळा लावावा.
मिथुन
स्वभावामध्ये थोडीशी उदासी येण्याची शक्मयता आहे. या काळात अध्यात्माकडे रस असेल. कामानिमित्त किंवा व्यापारानिमित्त प्रवास होऊ शकतो. सगळी कामे पटापट पूर्ण व्हावी अशी तुमची इच्छा असेल. प्रेम प्रसंगांमध्ये निराशा पदरी पडेल. या काळात वैवाहिक जोडीदाराकडे विशेष लक्ष द्या.
उपाय : माऊतीला शेंदूर अर्पण करावा
कर्क
तब्येतीची उत्तम साथ असली तरीसुद्धा निष्काळजीपणा नको. स्वभावामध्ये उतावळेपणा येईल. पैशाची आवक मनासारखी असणार नाही. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा त्रास संभवतो. पैसा गुंतवताना खात्री करून घ्या. वैवाहिक जीवन मनासारखे असेल. छोट्या-मोठ्या अपघातापासून सावध रहा. मित्रासोबत वेळ घालवाल.
उपाय : मंदिरात दुधाचे दान द्यावे.
सिंह
सगळ्या प्रकारच्या लाभाकरता उत्तम काळ आहे. समाजात मानसन्मान वाढेल. पद प्रतिष्ठा प्राप्त होईल. छोट्या गुंतवणुकीतून लाभ संभवतात. नोकरीमध्ये संधी प्राप्त होईल. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांच्या विचारात असाल तर उत्तम काळ आहे. जवळच्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. खर्चाचे प्रमाण कमी करा.
उपाय: माऊतीला पंचामृताचा अभिषेक करावा.
कन्या
तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पोटाचे विकार, डोकेदुखी त्रास देऊ शकते. घरातील व्यक्तीचा विरोध सहन करावा लागेल. वाहन दुरूस्ती येऊ शकते. जुने वाद उफाळू शकतात. नोकरदाराला अनुकूल वेळ आहे वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.
उपाय : गाईला चपाती आणि गूळ खाऊ घाला.
तूळ
खाण्याच्या सवयीमुळे आरोग्य बिघडण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी भांडण होऊ शकते. धनप्राप्ती सहजतेने होणार नाही. प्रवासात त्रास होऊ शकतो. गुंतवणुकीतून लाभ होईल. नोकरदार वर्गाला उत्तम वेळ आहे. वैवाहिक जीवनामध्ये वादविवादाचे प्रसंग येतील.
उपाय:देवीला कुंकुमार्चन करा.
वृश्चिक
विशेष कारणाकरता साठवलेले पैसे खर्च करावे लागतील आणि त्यामुळे चिडचिड होऊ शकते. प्रवासा करता योग्य वेळ आहे. जमिनीचे व्यवहार सध्या टाळा. नोकरीमध्ये कष्टाचे फळ मिळेल. वैवाहिक जोडीदाराकडून उत्तम सुखप्राप्ती असेल. तीर्थयात्रा संभवते. कामात यश मिळेल.
उपाय: सूर्याला अर्ध्य द्यावे.
धनु
तब्येत सुधारल्यामुळे मन आनंदी असेल. जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न करा. कुठेही सही करताना सावध राहावे. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. प्रेमात धोका होण्याची शक्मयता आहे. नोकरीत समाधानी असाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. मान सन्मान मिळेल.
उपाय: मंदिरामध्ये बदाम दान करावे.
मकर
धनप्राप्ती उत्तम असेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रवास शक्मयतो टाळावा. घरातील दुऊस्ती करता खर्च होईल. छोट्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. प्रेम संबंध बळकट होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल. वाहन चालवताना सावध राहण्याची गरज आहे.
उपाय:काळ्या रंगाची काचेची गोटी जवळ ठेवावी.
कुंभ
तब्येत उत्तम असेल. घरच्या व्यक्ती करता इतरांशी बोलणी कराल. कुटुंबामध्ये वादविवाद होण्याची संभावना आहे. प्रवास घडेल. भावंडांचे सुख मिळेल. घरातील डागडुजी करता खर्च कराल. मातृतुल्य व्यक्तीशी वादविवाद होण्याची शक्मयता आहे. प्रेमसंबंधांमध्ये दुरावा संभवतो. नोकरीत यश मिळेल.
उपाय: लहान मुलीला पांढरे पुष्प द्यावे.
मीन
पैसा टिकण्यासाठी प्रयत्न करा. छोटे मोठे प्रवास टाळण्यामध्ये शहाणपणा आहे. वाहन सुख उत्तम असेल. प्रेमप्रकरणांमध्ये अपमान होण्याची शक्मयता आहे. धोकादायक गुंतवणूक करू नका. नोकरीमध्ये ताणतणावाला सामोरे जाल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.
उपाय: दत्त दर्शन घ्यावे.





