तुमचे ग्रह आणि तुमचाच अंदाज !!! (भाग 1)
06-09-2023
तुम्हाला तुम्ही स्वत: कसे आहत, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवरून, तुमचे तुमच्या कुटुंबीयांशी असलेल्या नातेसंबंधांवरून, तुमच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीवरून, तुमच्या मनात येणाऱ्या विचारांवरून तुमचे कुठले ग्रह चांगले आहेत आणि कुठले खराब आहेत, कुठल्या ग्रहाला कुठला उपाय करायचा, ज्याने तुम्हाला फायदा होईल, याबद्दल विस्तृत चर्चा करण्यासाठी ही लेखमाला लिहिली आहे. प्रत्येक ग्रहासंबंधी केलेली चर्चा आणि ती दिलेले उपाय हे निर्धोक आहेत आणि त्यांचा काहीही ‘साईड इफेक्ट’ होणार नाही, याची गॅरंटी माझी! तुम्ही आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये ज्योतिषांकडे गेले असाल किंवा नसाल, ज्योतिष शास्त्राला तुम्ही मानत असाल किंवा नसाल, तुम्ही ‘सश्र्रद्ध असाल किंवा अश्र्रद्ध’, हा विचार तुम्ही नक्कीच केला असेल की, माणूस ज्योतिषाकडे जातो, ते का जातो? सरळ उत्तर आहे, ज्या प्रŽांची उत्तर आपल्याला व्यवहारिक मार्गाने, सरळपणाने, सगळ्या प्रकारचे लॉजिक वापरून मिळत नाहीत आणि संकटे येतात, तेंव्हा माणूस कंटाळतो, थोडक्मयात काय तर, समस्याग्रस्त होतो तेव्हा तो ज्योतिषाकडे जातो. ज्योतिषांकडे जाणाऱ्या लोकांमध्ये ही बऱ्याच पॅटेगरीज आहेत. जसे डॉक्टरांकडे जाणाऱ्या पेशंटमध्ये पॅटेगरीज आहेत, तशाच. प्रॉब्लेम अगदी मोठा होईपर्यंत ज्योतिषाकडे न जाणारे आणि प्रॉब्लेम खूपच मोठा झाला की, इलाज नाही, म्हणून जाणारे ही एक पॅटेगिरी, दुसरी पॅटेगिरी प्रिकॉशन म्हणून, म्हणजे पुढे आपल्याला काय वाढून ठेवले आहे, त्याची कल्पना अगोदरच यावी आणि त्यानुसार उपाययोजना करता याव्यात, याकरता नियमितपणे ज्योतिषाकडे जाणारे आणि तिसरी पॅटेगरी जरा काहीतरी झाले की, लगेच उठ-सूठ ज्योतिषाकडे पळणारे!!!! कारण काहीही असो, पण प्रॉब्लेम झाल्यावरच माणूस ज्योतिषाकडे जातो, हे सत्य आहे. मग मुळात ज्योतिष सांगणाऱ्याचे कर्तव्य हे असते की, ‘जातकाला’ त्याचे प्रॉब्लेम जे होत आहेत, त्याला कोणते ग्रह जबाबदार आहेत ?(याचाच अर्थ मागची कोणती कर्मे जवाबदार आहेत) हे सांगणे. इथं एक गोष्ट अत्यंत सुज्ञपणे समजून घेण्याची ही आहे की, कोणताही ग्रह तुमच्या बाबतीमध्ये चांगला किंवा वाईट नसतो. मागे सांगितल्याप्रमाणे ग्रह हे केवळ तुम्ही पूर्वी केलेल्या कृत्यांचे किंवा ‘कर्मांचे इंडिकेटर’ आहेत. ते फक्त दर्शवतात. म्हणून शनीची पीडा आहे, राहूची पीडा आहे की, तुने काम बिघडवले आहे, असे म्हणणे म्हणजे, थर्मामीटरने ताप आणला आहे, ब्लड प्रेशरच्या मशीनने ब्लड प्रेशर वाढवले आहे, शुगर चेक करायच्या मशीनमुळे शुगर वाढली आहे, असे म्हणण्यासारखे आहे!! याचा अर्थ असा आहे का, की, ग्रहांच्या शांत्या वगैरे विधान वगैरे जे सांगितले आहे, ते सगळे झूट आहे? नाही. ‘कर्मकांडामध्ये’ ज्या पद्धतीने एखाद्या ग्रहाची पीडा हरण करण्यासाठी ‘शांती विधान’ सांगितले आहे. त्यात मुख्यत: जप, हवन, दान या तीन तत्त्वावर ते चालते. हे कसे चालते? तर, ज्या ग्रहाच्या फ्रिक्वेन्सीमुळे तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये गडबड होत आहे, आणि जी फ्रिक्वेन्सी तुमच्या पूर्वी केलेल्या कृत्यामुळे तयार झाली आहे, त्याला फ्रिक्वेन्सी-काउंटर एŸक्ट म्हणजे, त्यासंबंधी केलेले झीज भरून काढणारे कृत्य, अशा दृष्टीने पाहता येईल. पण आपली गंमत काय आहे की, आपण एखाद्या प्रॉब्लेमच्या बाबतीत विचार करत असताना त्या प्रॉब्लेमशी रिलेटेड आपल्या आयुष्यात अगदी जवळ असलेल्या त्या ग्रहाच्या व्यक्तींकडे-वस्तूंकडे लक्ष न देता, केवळ अमुक ठिकाणी जावा, अमुक ठिकाणी शांत करा, अशा अवघड रस्त्याला जातो. मग हे सोप्या पध्धतीने कसे करायचे? पुढे सांगतोच. . . (क्रमश:)
मेष
काही ठरलेले प्लॅन्स आयत्या वेळेला रद्द होऊ शकतात. परिवारामध्ये प्रत्येकाची मर्जी सांभाळणे अवघड जाईल. पुढच्या काळाचे ‘आर्थिक नियोजन’ आत्ताच करणे गरजेचे आहे. तुमच्या आजूबाजूचे वातावरण काहीसे निगेटिव्ह असल्याने थोडा मानसिक त्रास होऊ शकतो. वीकेंडला जुन्या मित्राची भेट होईल.
उपाय- गरजूला आर्थिक मदत करावी
वृषभ
जर काही कामे तुम्ही बाजूला ठेवून नंतर करावी, असा विचार करत असाल तर, नुकसान होऊ शकते. अपेक्षा नसताना मदत मिळेल. पूर्वीच्या अनुभवामुळे खचून न जाता, ‘नव्या उमेदीने’ कामे पूर्ण करावी. फायनान्स सेक्टरमध्ये काम करतात त्यांना चांगल्या संधी मिळतील.
उपाय- सरकारी जमिनीवरील झाडांना पाणी घालावे.
मिथुन
सध्या हातातल्या कामांवर लक्ष केंद्रित करा. काही निर्णय चुकण्याची शक्मयता आहे. ज्याचे परिणाम पुढे जाऊन भोगावे लागू शकतात. त्यामुळे निर्णय घेताना सावध राहणे गरजेचे असेल. काही बाबतीत वैवाहिक जोडीदाराचा सल्ला मानावा. छोटी मोठी कामे आरामात पूर्ण होतील. काही वेळेला ‘अपेक्षा नसताना’ मदत मिळेल.
उपाय – पाच लवंगा जवळ ठेवाव्या.
कर्क
काही निर्णय बदलावे लागू शकतात. सूचक स्वप्ने पडू शकतात. नवीन लोकांचा संपर्क फायदेशीर ठरेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कामामध्ये हवा तेवढा उत्साह दाखवताना न आल्यामुळे कामे बिघडू शकतात. परिवाराकडून हवे तसे सहकार्य मिळणार नाही. स्वभावामध्ये ‘आक्रमकता’ येऊ शकते.
उपाय- वस्त्रदान करा
सिंह
वैवाहिक जीवन समाधानकारक असेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना हा काळ ‘अत्यंत अनुकूल’ आहे. कौटुंबिक वादांना वेळीच आवर घालणे गरजेचे असेल. या आठवड्यात काही नवीन बदल होऊ शकतात, जे कामासंबंधी असू शकतील किंवा लोकांशी तुमच्याशी असलेल्या व्यवहाराशी असू शकतील.
उपाय- पक्षांकराता पाण्याची सोय करा.
कन्या
काही बाबतींबद्दल ‘भ्रमनिरास’ होईल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यताही आहे. घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होऊन मनस्ताप होईल. या आठवड्यामध्ये तुमच्या कामाची पद्धत तुम्हाला बदलावी लागेल. अडचणींवर तुम्ही मात कराल. विद्यार्थ्यांना ‘मनाप्रमाणे’ घटना घडल्याने आनंद वाटेल.
उपाय- लाल फूल जवळ ठेवा
तूळ
नात्यांमध्ये ‘ऊसवा-फुगवा’ येऊ शकतो. व्यवसायिक संबंधांमध्ये भावनेला मध्ये येऊ देऊ नका. वेळेचे नियोजन करणे आवश्यक असेल. जवळच्या व्यक्तीला आर्थिक मदत करावी लागू शकते. कामासाठी दुसऱ्या ठिकाणी प्रवास घडेल. पैशांची आवक सर्वसामान्य असेल. एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो.
उपाय- दूधाचे दान द्यावे
वृश्चिक
काम धंद्याच्या ठिकाणी थोडे नुकसान संभवते. गेल्या काही काळामध्ये ज्या ‘अडचणींचा सामना’ तुम्ही केला आहे. त्यामुळे तुम्हाला एकाकीपणा वाटू शकते. ज्यांना पैसे उधार दिले आहेत, त्यांच्याकडून परत मागताना सगळ्या प्रकारे प्रयत्न करण्याची गरज आहे. मानसिक शांतता लाभावी, असेही तुम्हाला वाटेल.
उपाय- 1 कवडी जवळ ठेवावी
धनु
शक्मयतो कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा. जामीन राहणे महागात पडू शकते. काही बदल ‘अपरिहार्य’ असतील. पूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. कुटुंब सुख चांगले मिळेल.
उपाय- निळ्या रंगाची फुले जमिनीत गाडावीत
मकर
व्यवसायामध्ये प्रगतीच्या नव्या संधी प्राप्त होऊ शकतात. व्यवसाय वाढवण्याच्या विचारात असाल तर, हा आठवडा योग्य आहे. संतती करता खर्च करावा लागू शकतो. आयत्यावेळी कोणीतरी मदतीला धावून येईल. जोडीदाराशी ‘सुसंवाद’ साधल्याने बऱ्याच अडचणी दूर होतील.
उपाय- धार्मिक स्थळी दुधाचे दान द्यावे
कुंभ
या आठवड्यामध्ये अनपेक्षितरित्या आलेल्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नको त्या व्यक्तींचा सहवास लाभल्याने चिडचिड होऊ शकते. ‘हलगर्जीपणा आणि आळस’ हा टाळायलाच पाहिजे. क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने अतिरिक्त ताण येऊन तब्येतीवर परिणाम होऊ शकतो.
उपाय- अशोकाचे पान जवळ ठेवा
मीन
या आठवड्यामध्ये ध्येय प्राप्तीकरता विशेष प्रयत्न कराल आणि त्यात यशही मिळेल. छोटी मोठी कामे आरामात पूर्ण होतील. काही वेळेला ज्या ठिकाणी काम नक्की होईल, असे वाटेल तिथे ‘अनपेक्षित अडचण’ येऊ शकते. घरच्या नातेवाईकांसोबत काही काळ आनंदात घालवाल. वैवाहिक जोडीदाराच्या मतांचा आदर करा.
उपाय- तुरटीने दात स़ाफ करावे





