13.8.23 ते 19.8.23
मेष
तुमच्यात जे अवगुण आहेत किंवा ज्या गोष्टी करण्याकरता तुम्हाला त्रास होतो, जमत नाही, त्याच गोष्टी इतरांनी तुम्हाला वारंवार सांगितल्याने त्रास होण्याची शक्मयता आहे. पण तुमच्या या कमी पडण्यालाच एक प्रकारे हत्यार समजून अडचणींवर मात करण्याची वेळ आहे. नातेवाईकांकडून सुखद अनुभव मिळतील. तब्येत सांभाळा.
लाल फुल जवळ ठेवावे
वृषभ
स्वत:च्या काही चुकांकडे तुम्ही जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहात, असा संदेश आहे. परिस्थितीच्या बाबतीत आणि लोकांच्या बाबतीत गैरसमज करून घेतल्यास नुकसानीची शक्मयता नाकारता येत नाही. याकरता स्वत:च्या मनात डोकावून, बदल केले पाहिजेत. आर्थिक यश मिळेल. मित्रांसोबत पार्टी कराल.
वृद्ध स्त्रीला दूध दान द्या
मिथुन
कामाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी एक प्रकारची अस्वस्थता जाणवेल. तुमच्यावर दडपशाही होत आहे, तुमच्या मताला किंमत नाही, असेही वाटण्याची शक्मयता आहे. योग्य त्या संधीची वाट पहा. यश लवकरच मिळेल. एखाद्या अवघड कार्यामध्ये यश मिळेल. उत्तेजित होऊन निर्णय घेऊ नका.
शालेय साहित्य वाटावे
कर्क
भावनात्मक गरजा भागवणारी व्यक्ती जर जवळ असेल तर, कोणत्याही अडचणीवर मात करण्यात अडचण येत नाही. पण तसे नसेल तर, एकाकीपणा वाटण्याची शक्मयता असते. असा काहीसा अनुभव या आठवड्यात येईल. शारीरिकदृष्ट्या हा आठवडा तितकासा अनुकूल नाही. तब्येतीला सांभाळावे लागेल.
आघाड्याच्या झाडाची मुळी जवळ ठेवा
सिंह
ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढल्यामुळे त्याचा परिणाम कौटुंबिक आयुष्यावर होऊ शकतो. या आठवड्यामध्ये तुमच्या मताच्या विऊद्ध तुमचे कुटुंबीय वागल्याने राग राग होण्याची शक्मयता आहे. काही कामे वेळेवर पूर्ण झाल्याने आनंद होईल. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा असेल.
पिंपळाखालील माती जवळ ठेवा
कन्या
या आठवड्यामध्ये काही महत्त्वाच्या कामाकरता तुम्ही झोकून देऊन काम कराल आणि त्याचे चांगले रिझल्ट मिळतील. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक अडचणींवर मात कराल. गुप्त शत्रूंच्या कारवाया थंड पडतील. जागा किंवा काम यामध्ये बदल करण्याचा विचार करत असला तर, ते गुप्त ठेवा.
सोनेरी कागदाचा त्रिकोण जवळ ठेवा
तूळ
तुम्ही प्रगतीपथावर आहात, याची जाणीव करून देणारा हा आठवडा असेल. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळणे नक्की आहे. फक्त आपले ध्यान विचलित होऊ देऊ नका. आत्मविश्वासात वाढ होईल. स्वत:ला झोकून देऊन काम कराल. सुखद अनुभव येतील. आर्थिक बाबतीमध्ये काही नवीन अनुभव येऊ शकतात.
मनगटावर स्वस्तिक काढावे
वृश्चिक
काही नवीन प्रोजेक्ट किंवा काही नवीन कामे हाती येण्याची शक्मयता आहे, पण ती हाती घेण्याकरता पुरेसा आत्मविश्वास नसेल किंवा ती कामे घ्यावी की, नको असा विचार मनात येऊ शकतो. अशावेळी परिस्थितीचा योग्य तो विचार करून आणि जवळच्या माणसाचा सल्ला घेऊन वागावे. कामांमध्ये गैरसमज होऊ शकतो.
वाहत्या पाण्यात कोळसे सोडा
धनु
या आठवड्यामध्ये नक्की होणारी कामे कुठेतरी अडण्याची शक्मयता आहे. आर्थिक बाबतीत सुद्धा ज्या पद्धतीने तुमची अपेक्षा असेल, त्याप्रमाणे आवक होणे जरा कठीण दिसते. चुकीचे निर्णय घेतल्यास आर्थिक नुकसानही होऊ शकते, सावध राहावे. कामाच्या ठिकाणी जाणत्या व्यक्तीचा सल्ला घेतल्यास कामांमध्ये यश मिळेल.
गरजूंना औषधे दान द्या
मकर
अवाजवी खर्च कोणत्याही परिस्थितीमध्ये टाळणे गरजेचे असेल. या आठवड्यामध्ये धनप्राप्तीपेक्षा धनाचा संचय कसा होईल, याचा विचार करा. पुढे जाऊन हेच धन कामी येईल. त्याचबरोबर तुम्ही ज्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात, ती पूर्ण झाल्यामुळे समाधानही प्राप्त होईल.
मुंग्यांना साखर घालावी
कुंभ
या आठवड्यात काही वेगळे साहस करावेसे वाटेल. नेहमीच्या चौकटीच्या बाहेर जाऊन स्वच्छंदपणे जगावेसे वाटेल. याकरता काही मित्रांना तुम्ही अप्रोच करू शकता. तुमच्या निष्पक्षपाती स्वभावामुळे मित्रांना चांगल्या प्रकारे मदत करू शकाल. या आठवड्यात एखादा प्रसंग असा येईल की, तिथे संघर्ष करावा लागेल.
गरजूला आर्थिक मदत करावी
मीन
कामाच्या ठिकाणी मान-सन्मानामध्ये वाढ होण्याची शक्मयता आहे. निरपेक्ष वृत्तीने केलेली मदत कामी येईल. ज्यांना वचन दिले आहे, त्यांना तुम्ही वचन पूर्ण केल्यामुळे समाधान प्राप्त होईल. एखाद्या बैठकीमध्ये किंवा मुलाखतीमध्ये तुम्ही तुमचे मुद्दे नीट मांडल्यामुळे यशप्राप्ती होऊ शकते. सफलता आणि समृद्धीच्या दृष्टीने उत्तम काळ आहे.
तिळेल दान द्यावे
…….
दोषपूर्ण, बाधित किंवा अशांत घराकरता उपाय:
एका लाल कापडावर आपल्या बाजूला शेंडी करून एक नारळ ठेवावा. आपल्या श्र्रद्धेनुसार त्याची पूजा करावी. गुळाचा नैवेद्य दाखवावा. हे सर्व सूर्यास्तानंतर करावे. झोपण्यापूर्वी गुळ बाहेर टाकावा आणि नारळ कापडासह छताजवळ बांधावा. असे तीन गुरुवार करावे. अगोदरचे दोन नारळ वाहत्या पाण्यात सोडावे. तिसरा नारळ वर्षभर ठेवावा.





