पैशांचा पाऊस ?
दि. 9.8.23 ते 15.8.23
मागे सांगितल्याप्रमाणे, सोने-नाणे-दागिने हे गुप्त ठिकाणी ठेवले जायचे. गुप्तधन कुठे आहे, किती आहे, कशामध्ये आहे, तिथे साप आहे का, तिथे कोणते प्रेत किंवा पूर्वज बसलेत याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला जातो. एकदा जागा नक्की झाली की मग तिथे पूजा विधी वगैरे सुरू करतात. यात सगळ्यात कॉमन प्रकार म्हणजे अंजन लावून बघणे. जागा निश्चित झाली की मग तिथे विशिष्ट प्रकारचे पूजा विधी केले जातात. हिंदूच नाही तर इतर धर्मातील तांत्रिक-मांत्रिक पद्धतीने सुद्धा हे गुप्तधन काढण्याचा प्रयत्न केला जातो. या सगळ्या विधीमध्ये बळी हा प्रकार कॉमन आहे. इतके सगळे करून जेव्हा जमीन खोदण्यात येते आणि तिथे काहीच सापडत नाही तेव्हा हा मांत्रिक(!) सांगतो की हे धन जमिनीतून दुसऱ्या जागी हलले आहे आणि मग पुन्हा तोच प्रकार सुरू होतो. हाती काही लागत नाही उलट लाखो ऊपये खर्च मात्र होतात. अशा प्रकारांमध्ये पोटच्या पोराचा बळी देण्याचा प्रकारही घडला आहे. हे निंदनीय तरी आहेच पण घृणास्पददेखील आहे. (2) पैशांचा पाऊस पाडणे: ‘ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा’ हे तुम्ही ऐकले असेलच !! पण इथे आपल्याकडे पैशांचा पाऊस पडणारे लोकही आहेत. आसाम, बंगाल, राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश आणि त्याला लागून असलेला महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणाहून हे लोक देशातील विविध शहरात, गावात फिरत असतात. यांची काम करण्याची पद्धत साधारण एकाच प्रकारची असते. या लोकांबरोबर काही त्यांचे शिष्य (चमचे-एजंट) असतात. गावात बस्तान बसवल्यानंतर हे त्यांचे चमचे कामाला लागतात. गरजू-लोभी लोकांना बरोबर हेरले जाते. त्यांच्याशी जवळीक वाढवल्यानंतर त्या भोंदू-तथाकथित मांत्रिकाचे व्हीडिओ दाखवले जातात. हा माणूस किती पावरफुल आहे, कसा चमत्कार करू शकतो, त्याच्याकडे किती सिद्धी आहेत, हा हवेतून वस्तू कसा काढतो (मांत्रिकाकडे जिन्न-भूत आहे, तेच हे पैसे-वस्तू हवेतून पाडते असे सांगून), त्याचे रसभरीत वर्णन हे एजंट करतात. मोठ्या लोकांबरोबरचे, नट- नट्यांबरोबरचे (खोटे) फोटो दाखवले जातात. सावजाला वाटते की आपल्याही बाबतीत याने कल्याण करावे. अशावेळी सावज स्वत: त्या मांत्रिकाला भेटण्याची गळ घालते. एकदा खात्री पटली की सावज आपल्या तावडीत आले आहे की मग त्या मांत्रिकाबरोबर त्याची भेट करून दिली जाते. ही भेटही निर्जन ठिकाणी ठरवतात. या भेटीमध्ये रस्त्यावर जादूचे खेळ दाखवणारा ज्याप्रमाणे ट्रिक दाखवतो त्याप्रमाणे एखादी ट्रिक दाखवली जाते. सावज पूर्ण ताब्यात येते. मग पैशाचा पाऊस पाडून दाखवण्याचे आमिष दाखवले जाते. त्याकरता सामान लागेल असे सांगून लाखो ऊपयांचा खर्च वसूल केला जातो. अशीच एखादी ट्रिक दाखवून धुरामध्ये काही नोटा पाडवल्या जातात. नंतर सांगितले जाते की जर खरोखर मोठा पैशाचा पाऊस पडायचा असेल तर इतके साहित्य आणि इतके लाख ऊपये लागतील. तोपर्यंत सावज पूर्णपणे त्यांच्या अधीन झालेले असते. लोकांकडून मागून, दागिने विकून, जमीन विकून तो बिचारा पैसे गोळा करतो. कशाच्या आशेवर? तर उद्या मी करोडपती-अरबोपती होणार या आशेवर! रक्कम मिळाली की एकतर सगळी रक्कम घेऊन हे लोक दुसऱ्या गावाला पोबारा करतात, किंवा दुसरा उपाय नसेल तर सावजाचा खूनही करतात. आता तरी सावध व्हा. सरकारी यंत्रणेने अत्यंत सावधानता बाळगून छापलेल्या नोटा अशा आकाशातून पडतील का? कशा पडतील? हे शक्मय असेल तर हा स्वत: कंगाल का? असा साधा विचारसुद्धा डोक्मयात येऊ नये की निर्बुद्ध आपण आहोत का याचा विचार करा. (क्रमश:)
मेष
मन स्वकेंद्रित होण्याची शक्मयता आहे. या काळामध्ये तुमचे स्वत:कडे सगळ्यात जास्त लक्ष असेल. आपल्या आवडीनिवडी, आपल्या इच्छा यांच्याविऊद्ध कोणीही काहीही बोलले तर तुम्हाला खपणार नाही. मनात विद्रोही विचार येण्याची ही शक्मयता आहे. फुरसतीचा वेळ तुमच्या कुटुंबीयांसोबत घालवण्याचा तुमचा मानस असेल.
उपाय : शिवलिंगावर जलाभिषेक करा
वृषभ
एखाद्या व्यक्तीच्या आग्रहामुळे प्रवास करावा लागू शकतो. या प्रवासात सरकारी कामे पूर्ण होण्याची शक्मयता आहे. एखादी कॉन्ट्रॅक्ट मिळवून त्यातून फायदा होण्याचे योगही आहेत. या काळात कुटुंबीयांच्या वर्तणुकीवर जास्त लक्ष देणे गरजेचे असेल. कागदोपत्री व्यवहार करत असताना सावध राहा.
उपाय : जमिनीत निळे फूल गाडावे.
मिथुन
आर्थिकदृष्ट्या किंवा पैशांच्याबाबतीत थोडा तणाव येण्याची शक्मयता आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे हातात असलेली कामे वेळेवर पूर्ण न होणे. याकरता माणसांचे आणि वेळेचे योग्य नियोजन गरजेचे असेल. तब्येतीविषयी विशेष चिंता नको. प्रवासात थोडी हानी होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीची कामे पूर्ण होतील. उपाय : हळदीची गाठ जवळ ठेवावी
कर्क
तब्येत थोडी नाजूक असेल. जवळच्या नातलगाकडून किंवा व्यक्तीकडून एखादा उपहार मिळण्याची शक्मयता आहे. मनात असूनसुद्धा आयत्यावेळी काही काम लागल्याने प्रवासाचा बेत रद्द करावा लागू शकतो. नोकरदार वर्गाला प्रेझेंटेशनची चांगली संधी मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक होऊन फायदा संभवतो.
उपाय : वृद्ध व्यक्तीला दूध द्यावे
सिंह
वरून तब्येत कितीही चांगली वाटत असली तरी आतून काहीतरी बिघडले आहे असे जाणवण्याची शक्मयता आहे. अशावेळी योग्य ती तपासणी करून घेणे उचित ठरेल. पैशांच्या बाबतीमध्ये नशीबवान असाल. तुमच्या गरजेला कुठून कुठून तरी पैसे जमा होतील. घरातील व्यक्तीच्या दुराग्रहामुळे खर्च वाढू शकतो. उपाय : काळी वस्तू दान द्यावी
कन्या
मन आनंदी होईल किंवा व्यक्तिमत्त्वाला बहर येईल अशा काही घटनांचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. या काळात मूड चांगला असल्यामुळे विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची इच्छा असेल. ज्या पद्धतीने तुम्ही कष्टाचे आणि बुद्धिमत्तेचे इनपुट घालता त्या प्रमाणामध्ये पैशाचे आउटपुट न आल्याने थोडे नाराज व्हाल.
उपाय : हिरवा हात रुमाल जवळ ठेवा
तुळ
गेल्या काही दिवसांमध्ये तब्येत बिघडली असेल तर सध्या सगळ्या प्रकारची काळजी घेणे गरजेचे असेल. कामाच्या ठिकाणी शक्मय आणि अशक्मयतेचा विचार करूनच योजना करा. अवास्तव अपेक्षा निराशाजनक ठरू शकतील. नोकरदार वर्गाला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे.
उपाय : डाव्या मनगटावर 4115 लिहावे
वृश्चिक
तब्येतीमध्ये अप डाऊन झाल्यामुळे थोडा मानसिक त्रास होऊ शकतो. या काळात तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाहून पार्टीसाठी बोलावणे येण्याची शक्मयता आहे, पण तब्येत सांभाळून सगळे करावे. आर्थिक बाजू समाधानकारक असेल. नवीन प्रोजेक्ट मिळतील. नोकरदार वर्गाला कामांमध्ये नवी जबाबदारी मिळेल.
उपाय : मसूर दान द्यावे
धनु
आर्थिक बाजू भक्कम झाली की तब्येतीची बाजू बिघडते आणि तब्येत ठीक असेल तर आर्थिक बाबतीमध्ये तणाव येतो असा काहीसा विचित्र अनुभव येण्याची शक्मयता आहे. जवळच्या व्यक्तींसोबत पर्यटनाचा आनंद लुटाल. गुंतवणूक फायदेशीर असेल. प्रेमसंबंध सुधारतील. नोकरदार वर्गाला मस्त काळ आहे.
उपाय : रक्तचंदनाचा टिळा लावावा
मकर
तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. योग्यवेळी वैद्यकीय सल्ला घेतला तर पुढचा त्रास टाळता येऊ शकतो हे ध्यानी असू द्या. कौटुंबिक बाबतीत समाधान मिळेल. अपेक्षा नसताना नातलगांपैकी कोणीतरी मदतीचा हात पुढे करेल. मोठ्या व्यक्तीची ओळख कामी येईल असे वाटत नाही.
उपाय : अशोकाची तीन पाने आणि हळकुंड जवळ ठेवा
कुंभ
या काळात तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण होण्याची शक्मयता आहे, पण त्या शक्मयतेच्या कोट्यातल्या असाव्यात! सध्याच्या काळामध्ये आर्थिक फायद्याकडे न बघता कामे मिळवण्याकडे जास्त लक्ष द्यावे, पुढे जाऊन फायदा होईल. जमीन, वाहन, प्रॉपर्टी यांच्या संबंधित काही कामे अडली असतील तर ती पूर्ण करायला योग्य काळ आहे.
उपाय : काजळाची डबी जवळ ठेवा
मीन
या ना त्या कारणाने तब्येतीच्या तक्रारी असतील. विशेषत: पायांच्या तक्रारी जसे पाय दुखणे, टाच दुखणे किंवा पायाला मार लागणे असे काहीसे होऊ शकते, त्यामुळे सावध राहिलेले बरे. आर्थिक बाबतीत शुभ समाचार मिळेल. कामे मार्गी लागतील. तुमच्या कष्टांचे इतर लोकांकडून कौतुक होईल. मानसन्मान मिळेल.
उपाय : गाईला वैरण घाला





