6.8.23 = 12.8.23
मेष
या आठवड्यामध्ये काहीसे संमिश्र्र असे फळ मिळण्याची शक्मयता आहे. जुनी पार्टनरशिप किंवा वैवाहिक जोडीदाराशी काहीशा प्रमाणात मतभेद होऊन दुरावा येऊ शकतो. संबंधांमध्ये हवी तशी मधुरता राहण्याची शक्मयता कमी आहे. त्याचप्रमाणे ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता, ती संधी तुम्हाला प्राप्त होऊन तुम्ही कामात गुंताल.
तुळशीला गंगाजल घाला.
वृषभ
या आठवड्यात तुम्हाला एक अशी खबर मिळू शकते की, ज्यामुळे तुमच्या आश्चर्याला पारावार राहणार नाही. ही खबर तुमच्या जवळच्या व्यक्तीबद्दल किंवा आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल असू शकते. गेल्या काही दिवसांपासून ज्या अडचणींच्या विळख्यात सापडला होता, त्याच्यावर चतुराईने मात कराल.
आवळ्याच्या झाडाला पांढरा दोरा बांधा.
मिथुन
तुमच्या कल्पनक विचारसरणीमुळे येणाऱ्या अडचणींवर सहजपणे मात करण्याची क्षमता तुमच्यात आहे, याची जाणीव तुम्हाला होईल. काही घटना अशा घडतील की, ज्यामुळे अपयश आले, असे वाटू शकते. पण त्यातून अनुभव मिळेल आणि त्यातून शिकता येईल. कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात नवीन जबाबदारी पार पाडाल.
छत्री दान द्या
कर्क
आरोग्याला सांभाळले पाहिजे. वातावरणाच्या परिणामाबरोबरच अगोदरच असलेले काही रोग डोके वर काढतील. वैद्यकीय मदत घेण्याकरता मागे पुढे पाहू नका. या आठवड्यात मागील काही दिवसांत झालेल्या नुकसानाची कारणे शोधाल. त्याचबरोबर नवीन संकल्प घ्याल की, चुका पुन्हा पुन्हा घडणार नाहीत.
नारळाच्या झाडाला पाणी घाला
सिंह
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रभावाची आणि दुसऱ्यांवर असलेल्या कंट्रोलची जाणीव होईल. परिस्थितीबद्दल पुन्हा विचार केल्यास, आपला प्रभाव कसा वाढवता येईल, याची सुद्धा कल्पना येऊ शकते. नोकरीनिमित्त किंवा नवीन कामाच्या शोधामध्ये राहते ठिकाण सोडून, दुसरीकडे जाण्याचे योग सुद्धा आहेत.
41164 नंबर मनगटावर लिहा
कन्या
लवकरच तुम्हाला शुभ समाचार अर्थात, चांगली बातमी कळेल. ज्यामुळे तुमच्या काम करण्याच्या पद्धतीला आणि कामाच्या स्वरूपामध्ये बदल घडण्याची शक्यता आहे. एका विशिष्ट कालावधीमध्ये तुम्हाला अपेक्षित असलेले यश तुम्हाला प्राप्त होईल यात शंका नाही. आठवड्याच्या शेवटी मन विचलित होऊन त्रास होऊ शकतो.
दुध दान द्या
तूळ
या आठवड्यात काही घटना अशा घडू शकतात की, ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही बदल होण्याची शक्मयता आहे, या बदलाला तुम्ही कसे स्वीकारता, हे पुढील होणाऱ्या घटनांना दर्शवेल. काही प्रसंग असे येतील की, ज्यामधून मानसिक त्रास होऊ शकतो. पण हा काळ काही दिवसांचाच आहे, हे लक्षात घ्यावे.
धार्मिक ठिकाणी अन्नदान करावे.
वृश्चिक
या आठवड्यामध्ये काही घटना अशा घडतील की, ज्यामुळे तुम्ही करत असलेल्या कामांना चांगल्या प्रकारे गती मिळेल. कामाच्या ठिकाणी ओळखींमुळे कामे मिळाल्यामुळे आर्थिक फायदा होण्याची शक्मयता आहे. मनापासून केलेल्या कामांना चांगल्या प्रकारे यश मिळेल, यात शंका नाही. आत्मविश्वासात वाढ होईल.
लोखंडी वस्तू उशीखाली ठेवावी
धनु
मागच्या काही दिवसांमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे आता हातात असलेल्या कामांमध्ये यश मिळेल, नावलौकिक वाढेल. पण नवीन काही कामे हातात घेताना तुमच्या मनामध्ये चलबिचल असण्याची शक्मयता आहे. तुम्हाला जाणवेल की, तुमच्या मानसिक शक्तींमध्ये आणि आत्मविश्वासामध्ये वाढ होत आहे. स्वकियांबरोबर पार्टी आयोजित कराल.
चांदी जवळ ठेवावी
मकर
या आठवड्यामध्ये काही प्रसंगात तुमच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळेल. बौद्धिक क्षमतेमुळे अवघड परिस्थितीवर मात कराल. एखादी किमती वस्तू किंवा कागदपत्रे हरवतील की, काय अशी शंका वाटण्याची शक्मयताही आहे. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळाल्याने यशप्राप्ती सहजतेने होईल.
सफेद मिठाई दान द्यावी
कुंभ
पूर्वी घडून गेलेल्या घटनांना पुन: पुन्हा आठवून किंवा त्या अनुभवांमध्ये गुंतून काहीही साध्य होणार नाही, समोर असलेल्या भविष्याकडे पाहून नवीन योजना बनवणे तुमच्याकरता हितकारक ठरेल. तुमच्याकडून केल्या जाणाऱ्या विवेकपूर्ण आणि कठोर परिश्र्रमांना चांगले यश प्राप्त होऊ शकते. प्रयत्नांची कास सोडू नये.
आंघोळीच्या पाण्यात तीळ घालावे.
मीन
सध्याचा काळ असे दाखवत आहे की, तुमचे मन अशांत आहे आणि सगळ्यांपासून तुम्ही वेगळे पडले आहात. पण याचा अर्थ निराशेला जवळ करावे, असा मुळीच नसून पुढे येणाऱ्या चांगल्या काळाकरता तयारी करावी, असा आहे. मान-सन्मानामध्ये वृद्धी होईल. आयुष्यात सगळ्यांबरोबर संबंध चांगले होण्याची शक्मयताही आहे.
भिजवलेले हरभरे दान द्यावे
आजकाल प्रत्येकाला कामाच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणाने प्रवास करावाच लागतो. प्रवासात कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, प्रवास सुखाचा व्हावा, नुकसान होऊ नये, म्हणून एक असोला नारळ घ्यावा. त्यावर कुंकवाच्या पेस्टने ओंकार, स्वस्तिक आणि त्रिशूल काढावे. हा नारळ म्हणजे, आपल्या इष्ट देवतेचे प्रतिक समजून आपल्याबरोबर प्रवासात न्यावा. प्रवास झाल्यानंतर वाहत्या पाण्यात सोडून द्यावा.





