अनंत आमुचि ध्येयासक्ती !
भारताच्या ‘रॉकेट वूमन’…
भारताचे ‘चांद्रयान-3’ आता चंद्रावर कधी उतरते याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. या महत्त्वपूर्ण मोहिमेमागे अनेक महिलांचेही योगदान असून त्यापैकी एक म्हणजे त्याचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. रितू करिधाल श्रीवास्तव. भारताच्या ‘रॉकेट वूमन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. रितू या ‘इस्रो’च्या वरिष्ठ शास्त्रज्ञांपैकी एक अन् ‘चांद्रयान-3’च्या ‘मिशन डायरेक्टर.’ त्या मूळच्या उत्तर प्रदेशातील लखनौच्या. नेहमीच अंतराळात रस राहिलेल्या रितू करिधल या लहानपणी ‘इस्रो’ व ‘नासा’वर वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या कात्रणांचा संग्रह करायच्या. त्या ‘चांद्रयान-2’च्या ‘मिशन डायरेक्टर’, तर ‘मंगलयान’ मोहिमेच्या ‘डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर’ होत्या. भौतिकशास्त्रात पदवी, नंतर बेंगळूर येथील प्रतिष्ठित ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधून ‘एअरोस्पेस’मध्ये पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या डॉ. रितू करिधाल श्रीवास्तव या 1997 साली ‘इस्रो’मध्ये ऊजू झाल्या.
कॅनडाचे ‘वॉरेन बफे’…
‘आयआयटी’चे अनेक माजी विद्यार्थी गगनभरारी घेऊन कुठल्या कुठे पोहोचलेले असून त्यापैकी एक म्हणजे प्रेम वत्स. ‘आयआयटी मद्रास’मधून ‘केमिकल इंजिनिअरिंग’मधील पदवी मिळवल्यानंतर त्यांनी कॅनडा गाठले तेव्हा त्याच्या खिशात फक्त 8 डॉलर्स होते. आज त्यांना ‘कॅनडाचे वॉरेन बफे’ म्हणून ओळखले जाते. त्या देशात घरोघरी जाऊन भट्टी नि एअरकंडिशनर विकून त्यांनी ‘एमबीए’चे शिक्षण घेतले. त्यानंतर ‘गुंतवणूक विश्लेषक’ म्हणून काम करण्यास सुऊवात केली. लवकरच त्यांनी आपल्या माजी ‘बॉस’सोबत एक आस्थापन स्थापन केले. 1985 साली प्रेम वत्स यांनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील एक छोटी विमा कंपनी घेऊन त्याचे ‘फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स’ असे नामकरण केले आणि वॉरेन बफे यांच्या पावलांवर पावले टाकत अनेक विमा कंपन्यांचे अधिग्रहण करून मोठा डोलारा उभारला. ‘फेअरफॅक्स’चे बाजारमूल्य आता 5.35 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे, तर त्याचे अध्यक्ष आणि ‘सीईओ’ म्हणून काम पाहणाऱ्या प्रेम वत्स यांची एकूण संपत्ती 1.3 अब्ज डॉलर्सच्या घरात गेली आहे.
नव्वदीतही ‘बॉडीबिल्डिंग’….
जगातील सर्वात वयस्कर शरीरसौष्ठवपटू कोण या प्रश्नावर बोट दाखवावे लागेल ते सेवानिवृत्त ‘सेल्स प्रोफेशनल’ असलेल्या आणि पणजोबा बनलेल्या अमेरिकेच्या जिम एरिंग्टनकडे. त्यांनी 2015 मध्ये वयाच्या 83 व्या वर्षी सर्वप्रथम विक्रमांच्या पुस्तकात प्रवेश केला. आता 90 व्या वर्षीही त्यांचा उत्साह तसूभरदेखील कमी झालेला नाही अन् शरीरसौष्ठव स्पर्धात सहभागी होण्याचा, किताब जिंकण्याचा सपाटा चालू आहे. लहानपणी दम्याने ग्रासून ते वारंवार आजारी पडायचे. पण 1947 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी जिम यांनी निर्धार केला की, आता बस्स झाले. मग त्यांनी वजन उचलण्यास सुऊवात केली. सात दशके उलटली, तरी ‘वेटलिफ्टिंग’ ही त्यांची सर्वात मोठी आवड राहिलेली आहे. आठवड्यातून तीन वेळा ते जिममध्ये जातात अन् प्रत्येक सत्र दोन तास चालते.
‘हवामान बदला’चे अभ्यासक…
‘हवामान बदल’ हा विषय किती महत्त्वाचा बनला आहे ते वेगळे सांगण्याची गरज नाही. या क्षेत्रातील जगातील सर्वात प्रभावशाली संस्थांपैकी एक असलेल्या ‘इंटरगव्हर्मेन्टल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’चे (आयपीसीसी) नेतृत्व करण्यासाठी स्कॉटिश शास्त्रज्ञ प्रा. जिम स्की यांची निवड करण्यात आली आहे. एडिनबर्ग विद्यापीठाचे भौतिकशास्त्राचे माजी विद्यार्थी असलेले स्की हे लंडनमधील इम्पेरियल कॉलेजमध्ये ‘शाश्वत ऊर्जा’ विषयाचे प्राध्यापक असून ब्रिटनच्या ‘हवामान बदला’वरील समितीचे सहसंस्थापक आहेत. त्यांनी यापूर्वी ‘आयपीसीसी’च्या सहाव्या मूल्यांकन चक्रादरम्यान हवामान बदलासंदर्भातील कार्यगटाचे सहअध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेले आहे.
– सूरज प्रभू
अंगा लावूनिया राख।डोळे झाकूनी करिती पाप
-राईस पुलर, पैशाचा पाऊस, नागमणी, गुप्तधन इत्यादीच्या मागे जो लागला, संसाराची होळी करून सर्वनाश करून बसला! इथे माणसाच्या ‘लोभाला सीमा’ नाहीत. जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी वेळेत करोडो ऊपये कमवायचे आहेत. यासाठी कोणत्याही थराला जाण्याची या लोकांची तयारी असते. या गोष्टीचा फायदा उचलून चांगल्या सुशिक्षित लोकांनासुद्धा फसवण्याचे काम काही लोक करतात, हा लेख त्यांच्याविऊद्ध ‘एल्गार’ आहे, असे समजा. हा लेख वाचून काही लोकांनी तरी या गोष्टींचा नाद सोडला तर, लेखाचे सार्थक झाले, असे मी समजेन. अनेक जणांची कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहेत, अनेकजण या भानगडीतून फरार झाले, कित्येकांनी आत्महत्या केली.
सांगलीजवळच्या एका गावात संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्यात आली, कित्येक लहान मुलांचा बळी दिला गेला, कित्येकांनी आपले कष्टाचे लाखो ऊपये गमावले आणि म्हणून याविषयी लिहिण्याचे ठरवले. काही लोकांना या लेखाचा राग येऊ शकतो, काही लोकांच्या कारवायांवरती या लेखामुळे गदा येण्याची शक्मयता आहे. पण ‘समाज कल्याण’ गरजेचे असल्यामुळे हे लिहिणे गरजेचे आहेच, असे वाटले. हा ज्योतिषीय लेख आहे का? होय आहे. कारण कित्येक ज्योतिषांना गुप्तधनाबद्दल आणि इतर काही गोष्टींबद्दल विचारले जाते. जनजागृती करणे आणि समाज मानसातून या अंधश्र्रद्धांना किंबहूना ‘समाज घातकी’ कृत्यांना हद्दपार करणे, हा या लेखाचा उद्देश आहे.
गुप्तधन: पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की, जमिनीतून मिळालेल्या प्रत्येक वस्तूवरती सरकारचा अधिकार असतो. हा कायदाच आहे. पूर्वीच्या काळात, जमवलेले धन सुवर्णाच्या किंवा इतर स्वरूपात जमिनीत पुरायची पद्धत होती. कारण त्यावेळेला बँका वगैरे नव्हत्या. आपल्या घरात एखाद्या ठिकाणी किमती वस्तू लोक गाडत होते. काही जण भिंतीमध्ये ठेवत होते. चोर-डाकू-लुटेरे कोणी आले तर, त्यांना सहजासहजी सापडू नये, यासाठी हे लोक असे करायचे. भारतात सगळीकडेच ती परिस्थिती असल्याने गुप्तधनाच्या बातम्या जवळजवळ प्रत्येक राज्यात वेळोवेळी प्रकाशित होत असतात. गुप्तधन नसतेच, असे म्हणणे नाही, पण त्या नावाखाली भोळ्या लोकांची जी फसवणूक केली जाते, ती भयानक आहे. साधारण या प्रकारात घडते असे की, एखादा माणूस आपली समस्या घेऊन ‘देववाल्या’कडे जातो. या देववाल्यांची पण गंमत असते. कोणत्याही प्रकारचे ज्ञानार्जन न करता, डोक्मयाला भंडारा, उदी, कुंकू वगैरे लावून अंगात देव आल्याचे भासवत, घुमत घुमत अनाकलनीय प्रकारचे आवाज काढत, हे लोक विचारलेल्या प्रŽांची उत्तरे देतात. ना ग्रहांचा अभ्यास, ना नक्षत्रांचा ध्यास, ना कष्ट करायची तयारी. काहीही भांडवल नसताना हे देववाले तयार होतात. यात महिलाही कुठे मागे नाहीत.
तुकाराम महाराजांनी फार सुंदररित्या अशा फसव्या साधुंबद्दल म्हटले आहे….
ऐसे कैसे झाले भोंदू ।कर्म कऊनि म्हणती साधू
अंगा लावूनिया राख।डोळे झाकूनी करिती पाप
दावुनि वैराग्याची कळा।भोगी विषयाचा सोहळा
तुका म्हणे सांगो किती।जळो तयांची संगती
हा ‘देववाला’ म्हणजे कोण तर, ज्याच्या अंगामध्ये देवाचा संचार होतो, अशी भ्रामक समजूत भाविकांमध्ये असते तो. हा देववाला काही उपाय सांगितल्यानंतर आलेल्या माणसाच्या पायात एक साप सोडतो, तो म्हणजे तुझ्या राहत्या घरात किंवा शेतात गुप्तधन आहे. हे ऐकल्याबरोबर विचारायला आलेल्या माणसाच्या मनामध्ये लोभ उत्पन्न झाला नाही तरच नवल. मग सुरू होते, ती एक न संपणारी प्रोसेस. (क्रमश:)
मेष
या काळात तुम्हाला कंट्रोल करणे किंवा एखादा सल्ला देणे कुणालाही जमणार नाही. तुमच्या मनात येईल त्याचप्रमाणे वागण्याचा तुमचा दुराग्रह किंवा हट्ट असेल. त्याचबरोबर थोडासा स्वार्थीपणा सुद्धा येऊ शकतो, पण त्यात वाईट काहीच नाही. कुटुंबीयांसोबत करमणुकीकरता बाहेर जाऊ शकता.
उपाय : तुरटीने दात घासावे
वृषभ
या काळात प्रॉपर्टीकडे, वाहनाकडे तुमचे जास्त लक्ष असेल. वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. एखादी प्रॉपर्टी विकत घ्यावी याकरता प्रयत्न चालू असेल तर त्यात यश मिळेल. सरकारी कामांमध्ये चांगल्याप्रकारे यश मिळण्याची शक्मयता आहे. वात आणि पित्त प्रकृतीच्या लोकांनी तब्येतीची काळजी घ्यावी.
उपाय : तुळशीला दूध मिश्रित पाणी घाला
मिथुन
कामानिमित्त प्रवास घडण्याची शक्मयता आहे पण त्या प्रवासामध्ये मनोरंजनाकडे जास्त लक्ष द्याल. गुंतवणूक करत असताना बुद्धीचा वापर जास्त केल्याने आणि भावनिक न होता गुंतवणूक केल्याने फायदा होण्याची शक्मयता जास्त आहे. या काळात कुटुंबात आपले वर्चस्व वाढावे आणि सगळ्यांनी आपले ऐकावे असे वाटू शकते.
उपाय : हिरवी काचेची गोटी जवळ ठेवा
कर्क
स्वभावामध्ये एक प्रकारचा राजेशाहीपणा येईल. अहंकारामुळे काही नाती दुखावली जाऊ शकतात. वैवाहिक जीवनात थोडा ताणतणाव संभवतो. नवीन सोने खरेदी करण्याकडे किंवा पैसे साठवण्याकडे तुमचा कल असेल. कुटुंबातील स्त्री वर्गामुळे फायदा होण्याची शक्मयता आहे. मित्रांकडून संधी मिळतील.
उपाय : गाईला चारा घाला
सिंह
स्वभाव थोडा रोमँटिक पण त्याच वेळेला डॉमिनेटिंग होऊ शकतो. तुमच्या गरजा भागवण्याकरता तुम्ही इतर कोणत्याही व्यक्तीची मदत घेण्यासाठी मागेपुढे बघणार नाही. या काळात पूर्वी वादावादी झालेल्या व्यक्तीशी पुन्हा चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात. कोणतीही रिस्क घेताना सगळ्या बाजूने विचार कराल.
उपाय : सूर्याला अर्घ्य द्यावे
कन्या
घरात पुढे घडणाऱ्या मंगल कार्याकरता आत्ताच पैशांची जुळवाजुळव करून ठेवण्याची तुमची वृत्ती असेल. तब्येतीच्या काही तक्रारींकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. लहान मोठ्या त्रासांकरता वैद्यकीय मदत घ्यावी लागू शकते. कुटुंबातील सदस्यांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो.
उपाय : वडाच्या फांदीला हिरवा कपडा बांधावा
तूळ
एक प्रकारची विरक्ती किंवा स्वत:बद्दल अनासक्ती वाटू शकते. आपण जे करत आहोत त्यामधून नक्की काय मिळणार आहे आणि आपल्याला काय साध्य होणार आहे अशा प्रकारचे विचार मनात येतील. वैवाहिक जोडीदाराकडे जास्त लक्ष द्याल. सगळ्या प्रकारच्या सरकारी किंवा निमसरकारी कामांमध्ये यश मिळेल.
उपाय :दही खाऊन कामाला जावे
वृश्चिक
सगळ्याप्रकारे भाग्य संकेत मिळत आहेत. आपल्या हातून कोणती चूक होऊन संधी हातची जाऊ नये याची मात्र काळजी घ्यावी. तीर्थयात्रा, धार्मिक ठिकाणाला भेट देणे आणि त्याकरता खर्च करणे असे काहीसे योग होत आहेत. सगळ्या प्रकारच्या मोहापासून सावध रहावे. नोकरदार वर्गाला कष्ट जास्त पडतील.
उपाय : कच्च्या जमिनीवर मोहरीचे तेल सोडा
धनु
फायनान्स किंवा मार्केटिंगच्या क्षेत्रात असाल तर काम होते होते म्हणेपर्यंत कोणीतरी तिसरी व्यक्ती बाजी मारून जाईल असे दिसते. अचानक फायदा तर अचानक तोटा असे काहीसे विचित्र ग्रहमान आहे. कोणताही निर्णय घेताना सावध राहणे शहाणपणाचे ठरेल. काही लोक मुद्दामहून तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करतील.
उपाय : हळकुंड जवळ ठेवावे
मकर
प्रवासाचे चांगले योग होत आहेत. मित्रांबरोबर चांगल्या प्रकारे वेळ घालवाल. स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष असेल. पूर्वी एखादी घडून गेलेली घटना पुन्हा घडण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांकडे ओढ असेल. बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल. जवळच्या माणसाला मदत कराल.
उपाय : वाहत्या पाण्यात नाणे सोडावे
कुंभ
वैवाहिक जोडीदाराच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. लहानसाहान कारणावरून कोणाशीही वाद घालणे टाळावे. नकारात्मक विचारांना कटाक्षाने दूर ठेवणे शहाणपणाचे ठरेल. संततीविषयी काळजी वाटू शकते. शेअर बाजारात चुकून सुद्धा पैसे गुंतवू नका. लहान बंधू किंवा शेजारी यांच्याकडून त्रास होण्याची शक्मयता आहे.
उपाय : लहान मुलीला काजळ द्या
मीन
आर्थिक बाजू चांगली असली तरी अचानकपणे थोडे नुकसान होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. कुटुंबातील लहान सहान विवादांना समर्थपणे तोंड द्याल. तुमच्या उदार मनाचा फायदा कोणी घेणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लागेल. नोकरदार वर्गाने कामाच्या ठिकाणी कोणाशीही जास्त वार्तालाप करू नये. उपाय : दिव्यांग आणि गरजू व्यक्तीला अन्न द्यावे





