30-7-23= 5-8-23
मेष
स्वत:च्या, आपल्या कुटुंबीयांच्या आणि आर्थिक बाबतीत प्रोटेक्टिव मोडमध्ये असाल. आर्थिक उलाढाल करत असताना एखादी समवयीन व्यक्ती मदत करू शकते. रोजच्या व्यवहारांमध्ये बुद्धिमत्तेचा चांगला उपयोग करून घ्या. प्रिय व्यक्तीशी वाद संपवतो. कुटुंबीयांसोबत पिकनिकला जाऊ शकता.
काळा रंग वापरू नका
वृषभ
येणारा आठवडा हा अनेक प्रिय व्यक्तींची भेट करून देणारा असेल. तुमच्या वागण्या बोलण्याचा इतर लोकांवरती चांगला प्रभाव पडेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणीवर मात करण्याकरता तुमचा सल्ला विचारण्यात येईल. अति उत्साहात कुठलेही काम करू नका. सोबत काम करणाऱ्यांवरती विश्वास ठेवणे गरजेचे असेल.
आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ घाला
मिथुन
कला, साहित्य किंवा सिनेमा अशा काही गोष्टींकरता पैसे खर्च करावे लागतील. या आठवड्यात तुमच्यातील आत्मविश्वास बऱ्याच प्रमाणात वाढेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते. आर्थिक नियोजन नीट केले नाही तर घराकरता किंवा बाहेरील कामांकरता पैसे उधार घ्यावे लागू शकतात.
मोरपीस जवळ ठेवावे
कर्क
या आठवड्यामध्ये तुमच्यातील भावनात्मक संघर्ष कमी होईल. आपले तेच खरे असा हट्ट चुकूनसुद्धा कुटुंबीयांसमोर करू नका, यात तुमचेच नुकसान संभवते. काही ठिकाणी निर्णय घेण्यामध्ये गोंधळ होण्याची दाट शक्मयता आहे. तब्येत चांगली राखण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. आर्थिक बाजू चांगली असेल.
वाहत्या पाण्यात हळकुंड सोडा
सिंह
तुमच्यातील व्यवहारचातुर्य आणि पुढील विचार करून पाऊल टाकण्याची वृत्ती यामुळे काही अडचणींवरती सहजपणे मात कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनातील योजना इतरांना अगोदरच कळल्यामुळे थोडी अडचण होण्याची शक्मयता आहे. मीटिंगमध्ये किंवा वरिष्ठांशी बोलताना शब्द जपून वापरा.
बेलपत्र जवळ ठेवावे
कन्या
ऐकावे जनांचे आणि करावे मनाचे अशी जरी तुमची वृत्ती असली तरीसुद्धा काही वेळेला इतरांची मदत घ्यावी लागते आणि त्यामुळे फायदा होतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पूर्वी तुम्ही केलेल्या मदतीची जाण ठेवून तुमचे एखादे काम परिचित व्यक्तीकडून होण्याची शक्मयता आहे. संततीविषयी काळजी वाटू शकते.
आपले जुने कपडे दान द्या
तुळ
आरोग्य, कुटुंब आणि धनप्राप्ती यामध्ये असलेला संघर्ष तुमच्या तोंडावरती प्रकट होईल. या आठवड्यात कुठल्या ना कुठल्या गोष्टींमध्ये तडजोड करावी लागू शकते. परिचित व्यक्तीकडून आर्थिक नुकसानीची संभावना आहे. घरातील कामांकरता किंवा काही नवीन सजावटीकरता पैसे खर्च होतील, पण समाधान मिळेल.
लाल कपडा दान द्या
वृश्चिक
अगदी क्षुल्लक करण्याकरता तब्येत बिघडू शकते. तुमच्या आजूबाजूचे लोक किंवा मित्रमंडळी यांच्यासोबत एखाद्या पिकनिकला जाण्याचा प्लॅन कराल. बाहेरील खाणे खाताना किंवा पार्टी करताना स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. घरात सहज ठेवलेली गोष्ट न सापडल्यामुळे शोधाशोधित बराच वेळ जाईल.
पक्ष्यांना दाणे घाला
धनु
तुमचा प्रत्येक मुद्दा बरोबर असला तरी कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल माहिती न करून घेता ठाम मत बनवल्यामुळे काही लोक तुमचा विरोध करतील. व्यावसायिकांना प्रत्येक पाऊल सांभाळून उचलणे गरजेचे असेल. स्पर्धेमुळे किंवा इतर काही कारणांमुळे व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. जुने नातेसंबंध कामी येतील.
रिकामे साखरेचे पोते घरी ठेवा
मकर
या आठवड्यात बऱ्याच गोष्टींकरता संघर्ष करावा लागेल. स्वत:च्या दुनियेतून बाहेर पडून वास्तव जगातील अडचणींना समोर जाताना कुटुंबीयांची साथ मिळेल. नवीन कपडे घेणे किंवा चैनीच्या वस्तूकरता खर्च होऊ शकतो. तुमच्या मित्रमंडळींपैकी एखादी व्यक्ती नको त्या गोष्टीचा आग्रह करेल ज्याला नाही म्हणणेच योग्य ठरेल.
धार्मिक ठिकाणी फळे वाटा
कुंभ
ज्याप्रमाणे आपण ठरवलेले नसताना काही गोष्टी घडतात त्याप्रमाणे या आठवड्यात मनाला धीर देणाऱ्या आणि आनंदी करणाऱ्या घटना घडू शकतात. तुमच्या सोबत असलेल्या व्यक्तींकडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य प्राप्त होईल. कुटुंबातील तुमच्या वयाच्या व्यक्तींसोबत काही प्रमाणात वाद-विवाद होऊ शकेल.
निळे फूल पाण्यात सोडा
मीन
तुम्ही व्यावसायिक असाल किंवा नोकरदार, तुमच्या सोबत काम करणाऱ्या लोकांपैकी तुमच्या वेळेला तुम्हाला मदत करणारे लोक कोणते आहेत हे ओळखणे या काळामध्ये गरजेचे असेल. कुटुंबामध्ये कामांची योग्य विभागणी केली तर होणारे वाद विवाद टाळता येतील. योग्य आणि अयोग्य यामध्ये निर्णय घेण्यापूर्वी सल्ला जरूर घ्यावा.
मनगटावर 24 नंबर लिहावा
बाळंतपणामध्ये प्रत्येक बाईला असे वाटत असते की आपल्याला सुदृढ आणि चांगल्या संततीचा लाभ व्हावा. त्याकरता गरोदर महिलांनी नववा महिना लागल्यानंतर शुद्ध चतुर्थीपासून पौर्णिमेपर्यंत रोज रात्री चंद्र दर्शन घेऊन नंतर भोजन करावे. दीर्घायुषी व निकोप प्रकृतीच्या अपत्याचा लाभ होईल. ढगांमुळे किंवा पावसामुळे चंद्र दिसला नाही तरी त्या दिशेला नमस्कार करावा.





