ऑगस्ट महिन्यातील लौकिक मुहूर्त आणि इतर माहिती
क्र. विशेष तारीख
1 शुभ दिवस 1 दु 2 नंतर, 2, 3, 4 दु 1 नं, 5, 7 सायं 5 नं, 8, 10 सायं 5 प, 12, 13 रात्री 8 प, 15, 17, 18, 19, 20 स 11 प, 21, 22, 23 सायं 8 प, 24 दु 3 नं, 26 स 9 नं, 27 स 11 प, 28, 29, 30 स 11 प
2 अशुभ दिवस 6, 9 14, 16, 25, 31
3 सण/ उत्सव/ विशेष तिथी 4- संकष्ट चतुर्थी चंद्रोदय रात्री 09.32, 12- कमला एकादशी, 21-नाग पंचमी, 22-मंगळागौर पूजन, 27-पुत्रदा एकादशी, 29-मंगळागौर पूजन, 30-नारळी पौर्णिमा/ रक्षाबंधन
4 अमावास्या/ पौर्णिमा अमावास्या – दि. 15-08-2023 दुपारी 12.42 ते दि. 16-08-2023 दु 03.07 पर्यंत पौर्णिमा – दि. 30-08-2023 सकाळी 10.58 ते दि. 31-08-2023 सकाळी 07.54 पर्यंत
5 साखरपुड्याचे मुहूर्त 1- दु 2 नं, 2, 5, 7- सायं 5 नं, 10- सायं 5 प, 17, 19, 22, 24- दु 3 नं, 26, 28, 29
6 बारसे (नामकरण) मुहूर्त 3, 5, 10- सायं 5 प, 19, 24- दु 3 नं, 28, 29- दु 3 प
7 जावळाचे मुहूर्त 2, 3, 20- स 11 प, 30- स 11 प
8 भूमिपूजनाचे/ पायाभरणीचे मुहूर्त नाहीत
9 गृहप्रवेशाचे मुहूर्त (व्यावहारिक मुहूर्त) 2, 3, 5 – स 10 नं, 10, 19, 21, 28- स 9 नं, 28
10 वास्तूशांतीचे मुहूर्त (व्यावहारिक) 19, 21, 23, 26, 28
11 व्यापार सुरू करण्याचे मुहूर्त 5- स 10 नं, 7- सायं 7 नं, 24- दु 3.30 नं.
12 वाहन खरेदीचे मुहूर्त 1, 24, 30, 31
13 शेत जमीन/जागा/प्रॉपर्टी/फ्लॅट खरेदीसाठीचे मुहूर्त 17, 26, 27, 31
14 शेतीच्या कामांसाठी उपयुक्त दिवस 2, 3- दु 4 प, 5- स 10 नं, 10- दु 3 प, 19, 21, 22, 23-स 8 प, 24- दु 3.30 नं, 30-स 11 प
15 डोहाळे मुहूर्त 1 – दु 4 नं, 2- दु 1 प, 20- स 11 प, 24 दु 3 नं, 29
16 पंचक दि 2-8-2023 (बुधवार) सकाळी 10.18 ते दि. 3 सप्टेंबर 2023( रविवार) सकाळी 10.39 पर्यंत
मेष
वैवाहिक आयुष्यामध्ये काहीही कारण नसताना अचानकपणे काहीसा ताण तणाव जाणवण्याची शक्मयता आहे. आईच्या तब्येतीविषयी किंवा इतर काही कारणांमुळे काळजी वाटेल. जमिनीचे वादविवाद असतील किंवा वाटाघाटी करायची वेळ आल्यास सावध पवित्रा घ्यावा. कुटुंबात काही दिवसाकरता तणाव असेल.
उपाय : सुकलेला नारळ पाण्यात सोडावा
वृषभ
नोकरदार लोकांना नोकरीविषयी काहीशी काळजी वाटू शकते. वरिष्ठांचे दडपण जाणवेल. टार्गेट पूर्ण करण्याकरता दमछाक होईल. काही लोक जाणूनबुजून तुमच्याविषयी नको त्या बातम्या पसरवू शकतात, सावध रहा. जमिनीविषयी असलेले व्यवहार तुमच्या व्यावहारिकतेमुळे सुलभतेने पार पडतील. कामांना गती मिळेल.
उपाय : 5 प्रकारची फळे दान द्या
…..
मिथुन
वैवाहिक जोडीदारामुळे किंवा व्यवसायातील पार्टनरमुळे फायदा होण्याची शक्मयता आहे. मित्रांच्या गाठीभेटी होतील, त्यांच्यामुळे आयत्यावेळी मदत मिळण्याची शक्मयता आहे. मोठ्या बंधूंचा किंवा बहिणीचा तुमच्यावरचा प्रभाव वाढेल. शेअर बाजारापासून दूर ाहा. प्रेम प्रकरणांमध्ये अपयशाची शक्मयता आहे. नोकरीत दडपण घेणे सोडा.
उपाय : पिवळी मिठाई वाटावी
कर्क
प्रॉपर्टीसंबंधी असलेले वाद उफाळून येऊ शकतात. ज्यांना आपले म्हटले आहे, तेच दुष्मनीला कारणीभूत ठरण्याची शक्मयता आहे. आईच्या तब्येतीला सांभाळा. टाइमपास करण्याकडे किंवा करमणूक व्हावी, म्हणून खर्च कराल. तब्येतीची थोडी तक्रार जाणवू शकते. पुढच्या आठवड्यात लहान-सहान अपघातापासून सावध रहा.
उपाय : तुळस जवळ ठेवा
…..
सिंह
मनात विषय वासना किंवा हव्यास यासारख्या विचारांचे काहूर येऊ शकते. स्वभाव काहीसा लहरी होईल. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखीच व्हावी असा हट्ट सोडावा लागेल. तब्येतीला नीट सांभाळावे लागेल नाहीतर काही रोग उग्र रूप धारण करू शकतात. परदेशी प्रवास करण्याची इच्छा प्रबळ होईल. मंगल कार्यासाठी खर्च होईल.
उपाय : सूर्याला अर्घ्य द्यावे
……
कन्या
या ना त्या कारणाने खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्मयता आहे. काही खर्च अनपेक्षित असतील. येणाऱ्या काळामध्ये कोणालाही आर्थिक मदत करण्यापूर्वी दहादा विचार करावा. पैसे बुडू शकतात. प्रेम प्रकरण किंवा यासारख्या केसेसमुळे नाव खराब होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. कौटुंबिक वाद वाढू शकतात.
उपाय : लाजाळूची मुळी जवळ ठेवा
तूळ
मन काहीसे अस्वस्थ असेल, याला कारण तब्येतीची चिंता किंवा आजूबाजूचे वातावरण असू शकते. कुटुंबामध्ये ज्येष्ठ व्यक्तींच्या न पटणाऱ्या वागण्यामुळे त्रास होऊ शकतो. पैसे अकारण खर्च होऊ नये, याची काळजी घ्यावी. एखाद्या स्त्रीकडून फायदा होण्याची शक्मयता आहे. सरकारी कामांमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होईल.
उपाय : पूजेची सुपारी जवळ ठेवा
…..
वृश्चिक
काहीही केलेले नसताना तुमच्यावर आळ येण्याची शक्मयता आहे. अशावेळी सोडून न जाता स्वत:ची बाजू व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न करा. फायदा होईल. आशेने पैसे लावावेत आणि तिथून निराशा प्राप्त व्हावी, असे ग्रहमान आहे. वाहन संबंधित तक्रार जाणवेल. कुटुंबातील व्यक्तींशी लहान मोठ्या कारणावरून भांडण होऊ शकते.
उपाय : हनुमानाची सेवा करा
धनु
वैवाहिक जोडीदाराच्या माहेरच्या माणसांकडून फायदा होण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. मित्रांकडून फसवणूक किंवा मित्रांची वादविवाद होण्याची शक्मयता आहे. या काळात रिस्क असलेल्या ठिकाणी पैसे गुंतवण्याचा मोह होईल. पण तो कटाक्षाने टाळावा.
उपाय- गाईच्या पायाखालील माती जवळ ठेवा
…..
मकर
कुटुंबाकडे ओढ वाढेल. पैसे गुंतवण्याकडे कल असेल. एखादी इन्व्हेस्टमेंट कराल. पूर्वी एखादी केलेली गुंतवणूक वेळेवर कामे न आल्याने थोडा त्रास होईल. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे घटना घडण्याकरता जास्त प्रयत्न करावे लागतील. व्यावसायिकांना उत्तम संधी प्राप्त होतील, पण ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्यायला विसरू नका.
उपाय : उडीद दान द्यावे
कुंभ
फार पुढचा विचार करून सध्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नका. मनात नकारात्मक विचार येण्याची शक्मयता आहे. आपला प्रभाव कमी होतो आहे की काय अशी शंका वाटेल. आर्थिक फायदा करता प्रवास करावा लागू शकतो. पण प्रवासामध्ये अप्रिय घटना घडण्याची शक्मयताही नाकारता येत नाही. शत्रूंवरती विजय मिळवाल.
उपाय : विद्यार्थ्याला काळे पेन द्यावे
…..
मीन
अशी कोणतीही गोष्ट करू नका, ज्यामुळे कुटुंबातील संघर्ष किंवा वादविवाद इतर कोणत्याही व्यक्तीला कळून ती व्यक्ती त्याचा फायदा उचलेल. पुढे जरी आर्थिक यश मिळणार असले तरी सध्या काटकसरीला महत्त्व द्यावे. मनोरंजनाकडे कल वाढल्यामुळे खर्चात वाढ होईल. इतरांसारखा फायदा आपल्याला का होत नाही, याची चिंता वाटेल.
उपाय : वस्त्रदान करा.





