23.7.2023 ते 29.7.23
मेष
बाहेरच्या शत्रूंपेक्षा किंवा विरोधकांपेक्षा आपल्या घरातील विरोधक त्रास देत असल्यामुळे थोडा मनस्ताप होण्याची शक्मयता आहे. या आठवड्यात महत्त्वाची कामे पूर्वार्धात उरकून घ्या. नंतर काही नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडल्यामुळे वेळ मिळेल की, नाही हे सांगता येत नाही. जवळच्या एखाद्या मित्राचे काम करावे लागेल.
चंदनाचा टिळा माथी लावावा.
वृषभ
इतर आठवड्यांच्या तुलनेमध्ये हा आठवडा काहीसा दिलासा देणारा असेल. आर्थिक अडचण दूर झाल्यासारखे वाटेल. इतरांना दिलेल्या आश्वासनांना पूर्ण करण्याकरता काही विशेष प्रयत्न करावे लागतील. पोटाच्या तक्रारी त्रास देऊ शकतात. एखाद्या जवळच्या मित्रासंबंधी किंवा नातलगासंबंधी काही महत्त्वाची माहिती कळेल.
जोड केळी दान द्या.
मिथुन
आधी हे काम करावे की पूर्वी राहिलेले काम पूर्ण करावे, याबद्दल संभ्रम निर्माण होण्याची शक्मयता आहे. कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढल्यामुळे आपण कुठे कमी पडतो की काय, असे वाटू शकते. आपल्याच मनोराज्यात गुरफटून जाऊ नका, वास्तवतेचे भान असणे गरजेचे असेल. स्त्री वर्गाकडून फायदा होऊ शकतो.
पांढरे आणि काळे तीळ दान द्या
कर्क
तुम्ही जितके भावनिक व्हाल, तितकाच लोक फायदा उठवतील, हे लक्षात ठेवा. नात्यांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आपला फायदा उचलू देऊ नका. काही लोक तुमच्या स्वभावाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक बाबतीत खास चिंता करण्याची गरज नाही. तब्येतीविषयी जागरूक रहा.
विहिरीच्या पाण्यात चमचाभर दूध टाका
सिंह
‘दिसते तसे नसते, म्हणूनच जग फसते’, याचा अनुभव तुम्हाला या आठवड्यात येईल. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमचे समर्थक आहेत, असे भासवून तुमच्याविऊद्ध कारवाया करू शकतात. एखादे अवघड काम हाती येण्याची शक्मयता आहे, ज्यात इतर लोकांची मदत घ्यावी लागू शकते. व्यावसायिकांना या आठवड्यात फायदा होईल.
अन्नदान करा
कन्या
घरात आणि मित्रांमध्ये काही लोकात दुटप्पीपणा जाणवेल. मित्रांची अतिसंगत धोकादायक ठरू शकते. विद्यार्थ्यांना कष्टाचे फळ मिळेल, पण पुढील वाटचालीकरता कष्टाचे प्रमाण वाढवावे लागेल. या आठवड्यात आपल्यातील कलागुणांना वाव देण्याकरता विशेष प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक होऊ शकते.
मजुरांना ताक द्या
तूळ
तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवण्याची शक्मयता आहे. अशावेळी कुठलीही माहिती कुणालाही सांगताना सावध पवित्रा घेणे आवश्यक असते. लहानमोठ्या अपघातापासून स्वत:ला वाचवणे गरजेचे असेल. पित्त वाढल्यामुळे शारीरिक त्रास होऊ शकतो. समाजामध्ये मानसन्मान प्राप्त होईल. काळी वस्तू दान द्या
वृश्चिक
आपण काय करतो आणि कुठल्या दिशेने चाललो आहोत, यातून नक्की आपल्याला मिळणार काय आहे, अशा प्रकारच्या भावना मनात येऊ शकतात. हा आठवडा काहीसा कन्फ्युजिंग असेल. हाती घेतलेल्या कामांना पूर्ण करण्यात आणि कौटुंबिक जबाबदारी निभावण्यामध्ये स्वत:करता वेळ मिळणे अवघड दिसते.
अशोकाची तीन पाने जवळ ठेवावी
धनु
कामाच्या ठिकाणी काही चुकीची समजूत तयार झाल्यामुळे वादविवादाचे प्रसंग येऊ शकतात किंवा मनाविऊद्ध काम करावे लागू शकते. व्यावसायिकांना नवीन नियोजनाकरता हा आठवडा योग्य आहे. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात महत्त्वाच्या घडामोडी घडतील. वेळेचे नियोजन करणे तुमच्याकरता अवघड जाईल.
मनगटावर 11 आकडा लिहा
मकर
योजनेच्या कामांमध्ये वेगळ्याच पद्धतीने काही अडचणी आल्यामुळे किंवा इतर लोकांच्या हस्तक्षेपामुळे तुम्हाला हवे तसे रिझल्ट मिळणे कठीण जाऊ शकते. विद्यार्थ्यांना कष्टाचे प्रमाण वाढवावे लागेल. गृहिणींना या आठवड्यात बाहेरकडून चांगली बातमी कळू शकते. व्यावसायिकांना लाभाच्या संधी मिळतील.
पिंपळाचे उत्तरेकडील पान जवळ ठेवा
कुंभ
तुमच्या विऊद्ध कट कारस्थाने करणारे किंवा तुमच्या प्रगतीला जळणारे नतमस्तक होतील. त्यांच्या कारवाया बंद पडतील. तुम्ही तुमच्या कष्टाने मिळवलेल्या अचिव्हमेंट इतरांपुढे जास्त प्रदर्शित करायला जाऊ नका. तब्येतीचा पाया चांगला असेल. आर्थिक आवक मनासारखी होईल. समाजातील एखाद्या व्यक्तीमुळे त्रास होईल.
दूध दान करा
मीन
कामाच्या ठिकाणी ‘आपण बरे आणि आपले काम बरे’ असा पवित्रा ठेवला तर, इतरांना तुमच्या विरूद्ध बोलण्याकरता काही उरणार नाही. तुम्ही केलेल्या कामामुळे तुमच्या वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या येणारा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. नवीन संधी प्राप्त होतील, त्याचा फायदा करून घ्या.
मुंग्यांना साखर घाला.
खूप कष्ट करूनही पैसा टिकत नाही आणि यश मिळत नाही, याकरता हा तोडगा करा. मधाच्या पोळ्याचा एक तुकडा, वारूळाची थोडी माती, सात दाणे नागकेशर लाल कपड्यात बांधून पितळी डबीत ठेवावे. या डबीची पौर्णिमेला रात्री पूजा करावी





