राहू’ द्या ना. . . !!! (एकतर्फी प्रेम आणि राहूचे कनेक्शन)
तू हा कर या ना कर तू हे मेरी किरन. . . शाहरुख खानचा डर सिनेमातला हा डायलॉग अनेकांना आठवत असेल. ‘तू हा कर या ना कर’ म्हणजे तुझ्या मताला काहीच किंमत नाही! तुझं अस्तित्व, तुझे विचार, तुझ्या आवडीनिवडी, तुला मी आवडतो का, या सगळ्या गोष्टींशी माझं काहीही देणंघेणं नाही. मला तू आवडतेस, विषय संपला. तू जर माझी होणार नसशील तर दुसऱ्या कोणाचीच होऊ देणार नाही.’
असली विचारसरणी आपल्याला पदोपदी जाणवते. एक गोष्ट आपण सगळ्यांनीच मान्य केली पाहिजे, आपल्या संस्कृतीची शिकवण, आपले धर्मग्रंथ, गीता, पुराण, कुराण, बायबल, गुरु ग्रंथसाहेब, सगळ्या संतांची शिकवण, संस्कार या सगळ्यांवर सहजपणे मात करून आजकालचे जे सिनेमे आहेत, टीव्ही सिरीयल्स आहेत, सेन्सारशिप नसलेल्या ओटीपीने पसरवलेली घाण आहे. ही आत्तापर्यंत सगळ्या पिढ्यांना आपल्या विळख्यात ओढत आहे. आजवर हजारो मुलींवर झालेला अॅसिड हल्ला असो, खून असो, परवा पुण्यात भरवस्तीत घडलेली घटना असो (येथे एका मुलीवर सगळ्यांसमोर कोयत्याने हल्ल्या करण्यात आला) ही विकृती कोणत्या पातळीला जाईल हे सांगता येत नाही. आजच्या लेखाचा विषय हा एकतर्फी प्रेम आणि त्यातून होणारे कॉम्प्लिकेशन्स, त्याची कारणे (ज्योतिषीय) आणि आपण काय करू शकतो यावर आहे. कुणी काहीही म्हणू दे, तारुण्याच्या उंबरठ्यावर स्त्रावणारे हार्मोन, त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, विचार आचार हे सगळे ग्रहांच्या आणि एकंदर कुंडलीच्या अनुषंगाने असतात असा माझा ठाम विश्वास आहे.(ज्यांना पटत नाही त्यांनी सोडून द्यावे). प्रेमसंबंध हे कुंडलीतील पंचम भावावरून पाहिले जातात. प्रेमसंबंधात मिळणारे यश किंवा अपयश हे पंचम भाव, पंचमेश, शुक्र यांच्या स्थितीवरून पाहिले जाते. असे म्हणतात की की प्रेमसंबंधात यश मिळण्याकरता किंवा प्रेमविवाह होण्याकरता शुक्र स्वराशीत किंवा उच्चीचा असावा, पंचम स्थान बिघडलेले नसावे, शुक्राचा संबंध पंचम भावाशी यावा, बाराव्या भावाचा शुक्राशी संबंध यावा किंवा शुक्र तिथे असावा. पण सत्य काहीतरी वेगळे आहे आपण कित्येक वेळेला पाहतो की मुलगा किंवा मुलगी आपल्या प्रेमभावना समोरच्या व्यक्तीकडे प्रकटच करू शकत नाही. राहूचा संबंध या सगळ्याशी अत्यंत जवळचा आहे. राहू म्हणजे भ्रम, राहू म्हणजे भरकटणे, राहू म्हणजे विष, राहू म्हणजे गैरमार्ग, राहू म्हणजे विकृती आणि विकृतीतून होणारी कृती, राहू म्हणजे रहस्य, राहू म्हणजे खोटेपणाचे असे रूप जे खोटे असूनसुद्धा सत्याप्रमाणे भासते. राहू खोटे बोलायला शिकवतो. लोकांना बेमालूम फसवायला शिकवतो. राहू असा लोभ आहे की जो स्वार्थाकरता दुसऱ्याचे भलेबुरे अजिबात पहात नाही. राहूनी ग्रासलेल्या व्यक्तीला स्वत:ला कळत नाही की येणाऱ्या काही तासात तो काय घटना करून बसेल. प्रेमभावना असणे, प्रेम करणे, एखाद्या व्यक्तीकरता सर्वस्व उधळून देणे यात गैर काही नाही. प्रॉब्लेम तिथे सुरू होतो जिथे विकृतीला प्रेम समजले जाते. एकतर्फी प्रेमातून जीव देणारे आणि जीव घेणारे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. आयुष्यभर घुटणारी माणसे आहेत. कित्येक लोकांचे मानसिक स्वास्थ्य कायमचे बिघडले आहे. महत्त्वाचे हे ठरते की अशा वेळेला जवळच्या लोकांनी इतर सगळ्या उपायांबरोबर ज्योतिषीय सल्ला योग्य त्या व्यक्तीकडून घेऊन राहू, मंगळ, शनि, चंद्र आणि शुक्र यांचे जीवनशैली निगडित उपाय करून घ्यावे. कारण प्रेम करावे ही खरे आहे पण त्याहीपेक्षा ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. . . ’
मेष
भाग्योदयाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे पण प्रयत्नांमध्ये कमी पडू देऊ नका. तब्येत थोडी गरम नरम राहण्याची शक्मयता आहे. या काळात वेगवेगळ्या प्रकारचे मोह समोर येतील. आपला काहीही सहभाग नसतानासुद्धा काही बाबतीत दोष येण्याची शक्मयता नाकारता येत नाही. परदेश गमनाकरता अनुकूल काळ आहे.
उपाय : पिंपळाच्या झाडाची पश्चिमेकडची पाने जवळ ठेवा
वृषभ
स्वत:ची तब्येत सुधारावी म्हणून प्रयत्न करण्याकरता अत्यंत चांगला काळ आहे. एखादे व्यसन सोडण्याकरता किंवा व्यायामाला सुऊवात करण्याकरता यासारखा काळ शोधून सापडणार नाही. कुटुंबीयांच्या मदतीमुळे एखादे अवघड काम पूर्ण होईल. प्रवासाला जाण्यापूर्वी सगळ्या प्रकारची काळजी घ्या.
उपाय : जलचरांना कणकेचे गोळे घाला
मिथुन
कौटुंबिक कलह, लहानसहान गोष्टींवरून घरात भांडणे होणे यासारखे प्रकार घडतील पण अशा वेळेला शांतपणे यावर तोडगा काय निघेल हा विचार करणे गरजेचे असेल. प्रेमप्रसंगांमध्ये अपमान होण्याची शक्मयता आहे. कोणतीही धोकादायक गुंतवणूक नुकसानदायक ठरेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
उपाय:वासराच्या पायाखालील माती जवळ ठेवा
कर्क
अति संवेदनशीलपणा तब्येतीवर परिणाम करू शकतो. लहान सहान आजार जरी असले तरी त्यावर स्वत:हून स्वत:च्या बुद्धीने उपचार करायला जाऊ नका, योग्य ती वैद्यकीय मदत वेळेवर घेतली तर फायदा होईल. धनप्राप्तीकरता थोडा संघर्ष करावा लागू शकतो. व्यावसायिकांना समव्यावसायिकांचा थोडा त्रास होण्याची शक्मयता आहे.
उपाय : मुंग्यांना साखर घाला
सिंह
या काळात काही अप्रिय घटना घडण्याची शक्मयता आहे. विशेषत: कामाच्या ठिकाणी सांभाळून राहावे. धनप्राप्तीच्या संदर्भात तुमची काही तक्रार असणार नाही. प्रवास करावा लागू शकतो मात्र प्रवासात तब्येतीची काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराचे बोलणे मनाला लागू शकते. प्रॉपर्टीमध्ये फायदा असेल. गुंतवणुकीतून फायदा होईल.
उपाय : काळा रंग वापरू नका
कन्या
तब्येतीमध्ये सुधारणा होईल. स्वत:च्या आरोग्याबद्दल असलेली भीती जरा कमी होण्याची शक्यता आहे. कामे मनाप्रमाणे पूर्ण होतील पण थोडासा उशीर लागू शकतो. ज्यांच्याकडे पैसे अडकलेले आहेत त्यांच्याकडून निव्वळ आश्वासनेच प्राप्त होतील. पैसा मिळण्याची शक्यता कमी आहे. नोकरदारांनी सावध पवित्रा घ्यावा.
उपाय: तांब्याचे नाणे पाण्यात सोडावे
तूळ
हा काळ थोडा मानसिक चिंतेचा असेल. काही जुन्या शारीरिक व्याधी त्रास देऊ शकतात. पण हा काळ लवकरच करत असल्याने काळजी करण्याचे कारण नाही. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीमुळे कौटुंबिक वातावरण बिघडू शकते. कागदपत्रे सांभाळून ठेवावी लागतील. जमिनीची कामे थोडी पुढे ढकलावी. गाडी चालवताना सावध राहा.
उपाय : मारुतीचा शेंदूर जवळ ठेवा
वृश्चिक
काही जुने रोग असतील तर त्यावर कायमस्वरूपी इलाज मिळण्याची शक्मयता आहे पण त्यातील पथ्य पाळणे तुम्हाला गरजेचे ठरेल. कौटुंबिक समस्यांवरती कुटुंबातील सगळ्या व्यक्ती एकत्र येऊन मार्ग काढल्यामुळे मनाला समाधान प्राप्त होईल. पैशांच्या बाबतीमध्ये काळजी करण्याचे कारण नाही. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे.
उपाय : लहान मुलांना मिठाई वाटा
धनु
आर्थिक आवक उत्तम असल्याने आत्मविश्वासात वाढ होऊन नवीन कामे करावीशी वाटतील. कामाच्या ठिकाणी बरीच कामे करावी लागल्यामुळे तब्येतीवर परिणाम होण्याची शक्मयता आहे. कुटुंबामध्ये एक लहानसे फंक्शन होऊ शकते. काही जुने मित्र भेटतील किंवा त्यांच्याशी बोलणी होतील. प्रेमसंबंध आनंददायी ठरतील.
उपाय : दिव्यामध्ये एक लवंग घालावी
मकर
विचित्र हवामानाचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो. संसर्गजन्य रोगांपासून वाचण्यासाठी शक्मय ती सगळी काळजी घ्या. प्रॉपर्टीसंबंधी व्यवहारात नशीब साथ देईल. व्यावसायिकांना थोडी चिंता वाटण्याची शक्मयता आहे. छोट्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्मयताही आहे. नोकरी करणाऱ्यांना संधी मिळतील. उपाय : आंघोळीच्या पाण्यामध्ये थेंबभर दही घाला
कुंभ
येणारा काळ हा आरोग्याला जपा असा संदेश देणारा असेल. लहानमोठे दुखणे त्रासदायक ठरू शकते. विशेषत: नसांचा त्रास होऊ शकतो. आर्थिक आवक सर्वसामान्य असेल. या काळात कोणालाही जामीन राहणे म्हणजे संकटाला आमंत्रण देणे ठरेल. नोकरदार वर्गाने सावध राहण्याची गरज आहे. आकस्मिक लाभ होऊ शकतात.
उपाय : दीपदान करा
मीन
आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने या काळात महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. चहुबाजूनी सावध राहणे मात्र गरजेचे असेल. प्रवासाला जाऊ शकता. करमणुकीकरता खर्च कराल. शेअर बाजारापासून मात्र चार हात लांब राहणे शहाणपणाचे असेल. नोकरीत राजकारणाचा त्रास होईल. वैवाहिक जोडीदाराची योग्य त्यावेळी साथ मिळेल.
उपाय : गुरुवारी केळी दान द्या





