16.7.23 ते 22.7.23
मेष
आपल्या व्यवहारावरती नियंत्रण ठेवल्यास आणि योग्य तो निर्णय योग्य त्यावेळी घेतल्यास प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त होण्याची शक्मयता आहे. कामाच्या व्यापात स्वत:करता आणि आपल्या कुटुंबीयांकरता वेळ काढणे अत्यंत गरजेचे ठरेल. या आठवड्यामध्ये आर्थिक, कौटुंबिक किंवा कामाच्या बाबतीमध्ये काही निर्णय अचूक घ्याल.
धार्मिक स्थळी लाल वस्त्र दान द्या
वृषभ
टॅरोच्या गणिताप्रमाणे या आठवड्यामध्ये स्वत:मध्ये बदल घडवण्यामध्ये आणि काही नवे निर्णय घेण्यामध्ये तुम्ही व्यस्त असाल. या आठवड्यात प्रगतीच्या नवीन वाटा कशा सापडतील याकडे तुमचे लक्ष असेल. कौटुंबिक समस्यांमधून बाहेर येण्याचा प्रयत्न कराल. नवीन ओळखीतून फायदा होण्याची शक्मयता आहे.
उगवत्या सूर्याला जल द्यावे
मिथुन
या ना त्या कारणाने खर्चाचे प्रमाण वाढल्यामुळे काहीशी चिडचिड होण्याची शक्मयता आहे. पण यामध्ये पैशांच्या बाबतीमध्ये मिस मॅनेजमेंट किंवा अनुशासन रहित खर्च हे कारण असेल. स्वभावामध्ये अचानकपणे उघडता येण्याचीही शक्मयता आहे. त्याचा परिणाम कामाच्या ठिकाणी होऊ नये याची काळजी घ्यावी.
पाच रुपयाच्या नाण्याला हळद लावून खिशात ठेवावे
कर्क
आपल्या हातून कोणत्याही प्रकारचा मर्यादाभंग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक ठरेल. मग ही मर्यादा कौटुंबिक सदस्यांबद्दल असू शकेल किंवा कामाच्या ठिकाणी इतरांशी व्यवहार करत असताना असू शकेल. आठवड्याच्या मध्याला तुमच्या अनुभवाला समृद्ध करणारी घटना घडेल. तब्येतीला जपणे गरजेचे आहे.
कष्टकऱ्यांना आर्थिक मदत करावी
सिंह
या आठवड्यात तुमचे लक्ष स्वत:च्या तब्येतीकडे आणि कामाच्या स्वरूपाकडे दोन्हीकडे सारख्या पद्धतीने असेल. कौटुंबिक सदस्यांच्या सहकार्यामुळे आनंदाचे क्षण येतील. या आठवड्यामध्ये अनाठाई खर्च होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असेल. वैवाहिक जोडीदाराच्या भावनांकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
एखाद्या धार्मिक स्थळाला अनवाणी जाऊन यावे.
कन्या
टॅरोच्या म्हणण्यानुसार या आठवड्यामध्ये तुमच्या एकंदर व्यक्तिमत्त्वामध्ये आकर्षणाचा आविष्कार होईल. लोक तुमचा सल्ला गांभीर्याने ऐकतील. प्रभावीत होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन विचारसरणीमुळे बरीचशी कामे सहजतेने होतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल. एकंदर लाभाचा आठवडा आहे.
अन्नदान द्यावे.
तूळ
या आठवड्यात प्रवासाला जाण्याचा प्लॅन कराल पण त्यात काही अडचणी संभवतात. सध्याला तुमचे जे कॉन्टॅक्ट आहेत किंवा तुम्ही जे काम करत आहात त्यातून भविष्यातील काही योजना प्रत्यक्षात येण्याची शक्मयता आहे. भागिदारीमध्ये जर काही काम करत असाल तर त्यात यश मिळेल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे.
पांढरा रुमाल जवळ ठेवा
वृश्चिक
कुटुंबीयांसोबत किंवा जवळच्या मित्रांसोबत कुठल्यातरी सहलीला जाण्याचा प्लॅन कराल त्याचदरम्यान एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्यायची इच्छा असेल. बाहेर जाणार असाल तर आपल्या घराच्या सुरक्षेबद्दल शक्मय तितकी काळजी घ्या. कुटुंबात थोडे वादविवाद संभवतात. आर्थिक आवक समाधानकारक असेल.
वाहत्या पाण्यात पणती सोडा
धनु
टॅरोच्या पॅल्क्मयुलेशनप्रमाणे येणारा आठवडा हा सौम्य असेल आणि नवीन अनुभव देणारा असेल. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात नवीन ज्ञान प्राप्त होण्याची शक्मयता आहे. येणाऱ्या काळामध्ये भावनेला महत्त्व देण्यापेक्षा व्यावहारिकतेला महत्त्व देणे गरजेचे असेल. रिलेशनशिपमध्ये रोमँटिक अनुभव येतील.
प्रिय व्यक्तीला सुगंधी फुले भेट द्या
मकर
कामे पूर्ण करण्याकडे तुमचा कल असेल. अपूर्ण राहिलेल्या कामांना पूर्ण करण्याकरता इतरांची मदत घ्यावी लागू शकते. कामाच्या ठिकाणी कर्तबगारी दाखवण्याची संधी मिळेल. लोकांच्या पॉझिटिव्ह एटीट्यूडमुळे तुमच्या उत्साहात वाढ होईल. घरातील छोट्या मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करा.
पिवळी मिठाई दान द्या
कुंभ
आर्थिकदृष्ट्या हा येणारा आठवडा महत्त्वाचा असेल. काही जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न करण्यास हरकत नाही. नवीन संधी प्राप्त होतील. शुक्रवार शनिवारी तुमच्या आकांक्षा वाढतील. पण अति हाव करू नका. नवीन खरेदी करण्याकरता हा येणारा आठवडा चांगला असेल. नवीन संबंध प्रस्थापित होतील त्यातून लाभाची शक्मयता आहे.
छाया दान करा
मीन
तुमचा व्यवहार या आठवड्यामध्ये काहीसा आक्रमक होण्याची शक्मयता आहे, जे तुमच्या स्वभावाच्या विऊद्ध असेल. काही घटना अशा घडतील की त्यामुळे राग अनावर होऊ शकतो. शक्मयतो शांत राहण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जीवनामध्ये कडू गोड अनुभव येण्याची शक्मयता आहे. गुरुवारपासून संधी, विरोध आणि पाठिंबा एकत्र मिळेल.
लोखंडाची वस्तू दान द्यावी
तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितले असेल की एका काचेच्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये लिंबू घालून ठेवतात. यातील रहस्य आज तुम्हाला सांगतो. घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी असेल तर याने ते कळते. एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून त्यात पिवळा धमक बेदाग लिंबू घालावा. लिंबू जर तरंगला तर तिथे निगेटिव्ह एनर्जी आहे. जर तो तळाशी गेला तर तिथे निगेटिव्ह एनर्जी नाही.
.





