अधिकस्य अधिकं फलं. . .
(अधिक मास विशेष-अधिक श्रावण मास 18 जुलै ते 16 ऑगस्ट, नीज (वास्तविक) श्रावण 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर)
तुम्हाला सनातन संस्कृतीमधील बारा महिन्यांची नावे माहिती आहेत का? आजची पिढी किंवा यापुढे येणारी पिढी जिला 31 डिसेंबरला पार्टी करायची असते आणि एक जानेवारीला नवीन वर्ष चालू होते (म्हणून हँग-ओव्हर उतरवायला झोपायचे असते!!) इतकेच माहिती आहे, पुढे जाऊन कुणी तुम्हाला विचारले की अधिक मास म्हणजे काय? तर आपण काय उत्तर देणार आहोत? आपल्याला आपल्या संस्कृतीची आणि कालगणनेची माहिती असावी म्हणून हा लेख लिहीत आहे. गंमत बघा, संस्कृतमध्ये मास म्हणजे महिना, मास याचा एक अर्थ चंद्र असाही होतो. पर्शियन भाषेमध्ये महिन्याला माह असे म्हणतात, याचाही अर्थ चंद्र असा होतो. अरेबिक किंवा उर्दूमध्ये शह्र याचे दोन अर्थ आहेत एक म्हणजे प्रचलित अर्थ म्हणजे शहर जे लोक वस्ती आहे, आणि शहर या शब्दाचा अर्थ चंद्र असाही होतो. क्षेसस्तार हा पर्शियन शब्द क्षेत्र या संस्कृत शब्दावरून आलेला आहे. म्हणजे बघा की आपल्या संस्कृत भाषेतून किती भाषांमध्ये शब्द घेतले गेलेले आहेत आणि आपल्याला यातील काहीच माहीत नसते. असो. भारतीय कालगणनेमध्ये दोन पद्धती वापरल्या जातात. सूर्यावरून कालगणना केली जाते ज्याला सौर्यमान किंवा सूर्यमान असे म्हणतात. चंद्रावरून कालगणना केली जाते त्याला चंद्रमान असे म्हणतात. सूर्याभोवती पृथ्वी फिरत असताना जर पृथ्वी वर थांबून सूर्याकडे बघितले तर प्रत्येक काही दिवसांनी सूर्याची स्थिती बदललेली दिसेल. म्हणजे आकाशाचे बारा भाग केले आणि प्रत्येक भागाला एक रास (मेष ते मीन) नाव दिले तर सौर्यमानाप्रमाणे जेव्हा सूर्य मेषमध्ये प्रवेश करतो (14/15 एप्रिल) तो सौर्यमानाचा पहिला दिवस आणि चंद्र जेव्हा मेषेमध्ये अश्विनी नक्षत्रात प्रवेश करतो तो चंद्रमानाप्रमाणे पहिला दिवस. सूर्य जेव्हा राशी प्रवेश करतो आणि चंद्र जेव्हा नक्षत्रात प्रवेश करतो त्याप्रमाणे संस्कृत महिन्यांची नावे आहेत.
सूर्य मास मीन मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनुर्मास मकर कुंभ
चंद्र मास चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्र्रवण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन
चंद्र नक्षत्र चित्रा विशाखा ज्येष्ठा पूर्वाषाढा श्र्रवण पूर्वाभाद्रपदा अश्विनी कृतिका मृग पुष्य मघा पूर्वा फाल्गुनी
म्हणजे जर चंद्रमानाप्रमाणे गणित केले तर 29.5 दिवसांचा एक महिना होतो आणि सूर्याप्रमाणे गणित केले तर 30.4 दिवसांचा महिना होतो. म्हणजेच 0.9 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढायला दर अडीच तीन वर्षांनी एक महिना जास्तीचा म्हणजे अधिक धरला जातो ज्याला अधिकमास असे म्हणतात. हिंदू महिन्यांपैकी कोणत्याही महिन्याला तो अधिक येऊ शकतो, यावेळी श्रावण हा अधिक आलेला आहे. याला पुऊषोत्तम मास असेही म्हणतात. याला कारण म्हणजे बारा महिन्यात बारा वेळेला जेव्हा सूर्य संक्रांत होते त्यावेळी 12 सूर्याची नावे आहेत. तेराव्याला नाव नाही. म्हणून त्याला श्रीविष्णूचे नाव म्हणजे पुऊषोत्तम मास असे दिले गेले. याला मलमास असेही म्हणतात, याला कारण दुसरे तिसरे काही नाही तर आपल्यात असलेल्या वाईट प्रवृत्तींना आध्यात्मिक साधनांकडून नाहीसे करणे हे याचे काम आहे. या महिन्यात देवधर्माला, वेदपाठाला, यज्ञियाकाला, दान पुण्याला अत्यंत महत्त्व आहे कारण. . . अधिकस्य अधिकम फलम. . .
मेष
आरोग्याच्या बाबतीत इतर राशींपेक्षा तुम्ही भाग्यवान असाल, पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही काळजी घेऊ नये. या काळात स्वत:कडे जास्त लक्ष असेल. स्वत:च्या आवडीनिवडी जपाल. कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक असेल, पण एखादी व्यक्ती चिडचिड करत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करावे. आर्थिक व्यवहार चांगले असतील.
उपाय – तुळशीला दूधमिश्रित पाणी घालावे
वृषभ
आरोग्य सांभाळावे. काही विचित्र आजार त्रास देऊ शकतात. अंगावर न काढता, वैद्यकीय मदत घेणे गरजेचे ठरेल. धनप्राप्तीच्या बाबतीत किंवा पैशांच्या बाबतीमध्ये भाग्यवान असाल. कौटुंबिक सहकार्य प्राप्त होईल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती बोलणी होतील. प्रवासाच्या आणि स्थावर मालमत्तेच्या बाबतीत सांभाळून रहावे.
उपाय- औदुंबराचे पान जवळ ठेवावे
मिथुन
पूर्वी घडून गेलेल्या घटनांबद्दल पश्चाताप करण्यापेक्षा समोर असलेल्या संधींकडे जास्त लक्ष द्या. आरोग्याच्याबाबतीत विशेष काळजी करण्यासारखे काही नाही. सहज मिळणारे पैसे अडकल्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. कौटुंबिक वाद विवादामध्ये मानसिक तणाव येऊ शकतो. स्थावर मालमत्तेसंबंधी व्यवहाराला गती मिळेल.
उपाय- दक्षिणमुखी हनुमानाचे दर्शन घ्यावे
कर्क
गेले काही दिवस तब्येतीची तक्रार चालू आहे, ती पूर्णपणे बरी व्हायला अजून वेळ लागणार आहे, हे ध्यानात ठेवा. हरतऱ्हेने तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या मनाप्रमाणे धनप्राप्ती न झाल्याने मन थोडे निराश होऊ शकते. त्यात कुटुंबातील एखादी व्यक्ती परत परत तोच विषय काढून मनस्ताप देऊ शकते.
उपाय- शेतात गंगाजलाची बाटली गाडा
सिंह
तुम्हाला वाटते की, तुमची प्रकृती घट्ट नाही, हे समजून घ्या. संसर्गजन्य आजाराचा त्रास होऊ शकतो. विशेषत: पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. पैशांच्या बाबतीमध्ये भाग्यवान असाल. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबातील सदस्यांबद्दल एखादी चांगली बातमी कळेल. प्रवास कोणत्याही परिस्थितीत टाळावा.
उपाय- चंदनाचा टिळा लावावा
कन्या
प्रकृती सुधारल्यामुळे आत्मविश्वास आणि उत्साह यामध्ये वाढ होईल. नवीन कामे करण्याची ऊर्जा प्राप्त होईल. पैशांच्या बाबतीत असमाधानी असाल. कुटुंबात एखाद्या विषयाबद्दल वादविवाद होऊ शकतो. शक्मयतो साठवलेले पैसे (जसे की, एफडी) खर्च करायच्या भानगडीत पडू नका. प्रवास घडेल. नोकरदारांना चांगले दिवस आहेत.
उपाय- औषधे दान द्या
तूळ
तब्येतीची काळजी करणे अत्यंत गरजेचे आहे, हे नीट समजून घ्या. पोटातील अंतर्गत अवयवांचे विकार किंवा संसर्गजन्य रोग यांच्यापासून बचाव करून घेणे तुमच्याकरता आवश्यक असेल. मित्र-मैत्रिणींकडून चांगल्या लाभाची शक्मयता आहे. ज्या कामात हात घालाल, त्या कामात यश मिळेल. थोडे मानसिक टेन्शन संभवते.
उपाय- घरात गोमूत्र शिंपडावे
वृश्चिक
कामासंबंधी किंवा कामाच्या ठिकाणी एखाद्या महिलेच्या सहकार्याने चांगला फायदा होऊ शकतो. समाजात मान-सन्मानामध्ये वाढ होईल. नवीन कामासाठी आवश्यक ती रिस्क घेण्याची तयारी दाखवाल. गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो. मानसिक त्रास करून घेतल्यास तब्येतीवर परिणाम होईल. नको त्या ठिकाणी पैसे खर्च कराल. उपाय -माऊतीच्या देवळात दिवा लावावा
धनु
वैवाहिक जोडीदाराच्या अरेरावीचा किंवा अहमपणाचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये थोडे कटु अनुभव येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी काही अशा घटना घडतील की, ज्यामुळे अनावश्यक ताण किंवा टेन्शन येऊ शकते. अचानकपणे काही नवीन कामे मिळण्याची शक्मयता आहे. भावंडांच्या दृष्टीने थोडा त्रास होईल.
उपाय- बतासे दान द्यावे
मकर
आरोग्याचा पाया मजबूत ठेवण्याकरता शारीरिक कष्ट घेणे आवश्यक ठरेल. कंटाळा करून काहीही फायदा होणार नाही, हे लक्षात घ्या. धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबातील वातावरण समाधानकारक असेल. प्रवासाचे योग आहेत. स्थावर मालमत्तेच्या कामात यश मिळेल. शेअर बाजारापासून चार हात दूर राहणे फायद्याचे असेल.
उपाय- मोहरीचे तेल दान द्यावे
कुंभ
आरोग्याची नीट काळजी घेतल्याने बऱ्याचशा गुंतागुंतीपासून वाचाल. तब्येत चांगली ठेवण्याचे महत्त्व तुम्हाला आता कळेल. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रवासातून फायदा होईल. लेखी व्यवहार यशस्वी ठरतील. स्थावर मालमत्तेसंबंधी काही प्रŽात कॉम्प्लिकेशन्स संभवतात. नोकरदार वर्गाला कामांमध्ये सगळ्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक असेल.
उपाय- दीपदान करा
मागच्या काही दिवसांपेक्षा या आठवड्यामध्ये तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. वैद्यकीय सल्ला उपयोगी पडेल. महत्त्वाच्या कामाकरता खर्च होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांची चांगली साथ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. धनप्राप्ती उत्तम असेल. इन्व्हेस्टमेंट म्हणून फायदा होईल. वैवाहिक जीवनामध्ये चांगल्या घटना घडतील.
उपाय -अष्टगंधाचा टिळा लावावा





