मेष –
या आठवड्यात कोणालाही मदत करत असताना परतफेडीची अपेक्षा करू नका. ‘नेकी कर और दर्या मे डाल’ असे धोरण जर ठेवले तर, कोणत्याही प्रकारे निराशा होणार नाही. कुटुंबातील एखादी व्यक्ती लांबच्या प्रवासाला जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी वर्दळ वाढेल. पण त्याचा पुरेपूर फायदा घेण्याकरता प्लॅनिंगची आवश्यकता आहे.
लाजाळूची पाने जवळ ठेवा.
वृषभ-
तब्येतीच्या बाबतीमध्ये अत्यंत जागरूक राहणे गरजेचे आहे. संसर्गजन्य रोगांपासून धोका संभवतो. याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्यांच्या तब्येतीकडे लक्ष देणेही गरजेचे ठरेल. कामाच्या ठिकाणी नकळत झालेली एखादी चूक महागात पडू शकते. नियोजन नीट केले तर, आर्थिक फायदा होण्याची शक्मयता आहे. जुना मित्र भेटेल.
भीमसेनी कापूर जवळ ठेवा.
मिथुन-
एखादी छोटी मोठी अडचण येईल आणि त्या अडचणीवर उपाय म्हणून सल्ला देणारे पुष्कळ लोक भेटतील. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे आपल्या कुठल्याही वैयक्तिक समस्येला जगजाहीर होऊ देऊ नका. एखाद्या माणसाला तुमची मदत करावीशी वाटेल, पण तो स्वत: अडकलेला असल्याने मदत करू शकणार नाही.
धार्मिक ठिकाणाकडचे पाणी घरी ठेवावे.
कर्क-
या आठवड्यात शारीरिक कष्टापेक्षा मानसिक क्लेश जास्त होतील, याची संभावना आहे. अति संवेदनशीलपणा कामी येणार नाही. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात अनेक संधी मिळतील. त्यातल्या काही पूर्वी येऊन गेलेल्या असतील. यावेळी त्या संधींचा फायदा उचलायला चुकू नका. वैवाहिक जीवनात थोडे बदल संभवतात.
लाल फळ दान द्यावे.
सिंह-
काही लोकांच्या स्वभावाला औषध नसते, त्याची जाणीव करून देणारा हा आठवडा असेल. छोट्यामोठ्या दुखापतीही होऊ शकतात. त्यामुळे थोडे सावध राहणे गरजेचे असेल. घरातील काही वस्तू घेण्याकरता खर्च होऊ शकतो. पण हा खर्च गरजेचा असेल. ऑफिसमध्ये इतरांच्या भानगडीमध्ये न पडणे योग्य ठरेल.
हिना अत्तर जवळ ठेवा
कन्या-
या आठवड्यात काही चुकीच्या गोष्टींचा मोह होऊ शकतो. पण मनाला वेळीच आवर घातला तर होणारे नुकसान टाळता येईल. एखाद्या मित्राच्या संबंधित व्यक्तीला अचानकपणे मदत करावी लागू शकते. ज्येष्ठ व्यक्तींच्या वागण्याचा त्रास होईल. पण कटू वचन बोलू नका. आर्थिक बाबतीत समाधानकारक स्थिती असेल.
जमिनीवर न पडलेले फुल जवळ ठेवावे
तूळ-
पूर्वी केलेल्या सत्कर्मांचा फायदा या आठवड्यात मिळण्याची शक्मयता आहे. आयुष्यात काही नवीन शोधण्याचा प्रयत्न कराल. त्याकरता काही जुन्या सवयी सोडाव्या लागू शकतात. नवीन लोकांची गाठभेट होईल, त्यातून प्रगतीचे नवे मार्ग मिळू शकतात. सध्याच्या कंटाळवाण्या ग्रुपमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
आंघोळीच्या पाण्यात कडुलिंब घालावा
वृश्चिक-
काळाबरोबर सगळे ठीक होईल, असे सध्या तुम्हाला वाटत आहे, तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील आणि त्या न्यायपूर्वक असतील, अशीही तुमची समजूत असेल. तुमच्यावर पूर्वी अन्याय केलेल्या माणसाला मिळालेली शिक्षा ही तुम्हाला न्याय मिळाल्याची भावना देऊन जाईल. भविष्याबद्दल चिंता करू नका, तुमचे भले करणाऱ्या घटना घडतील.
कुत्र्याला चपाती घालावी
धनु-
वैवाहिक जीवनातील आनंद कुठेतरी हरवला आहे असे वाटत असेल तर, काही आश्चर्यकारक घटना घडतील. जे लोक सिंगल आहेत, त्यांच्याकरता नव्या रिलेशनशिपची सुऊवात दाखवत आहे. पण निर्णय घेताना सावध राहणे गरजेचे आहे. आर्थिकबाबतीत समाधानकारक घटना घडतील. काही लोकांकडून पाठिंबा मिळू शकतो.
धार्मिक स्थळी दीपदान करावे
मकर-
कितीतरी आव्हाने केल्यानंतर मिळालेल्या यशाचा आनंद उपभोगता येईल. या आठवड्यात आंतरिक समाधान प्राप्त होण्याची शक्मयता आहे. कोणत्याही वाईट व्यसनांना किंवा वाईट सवयींना सोडण्याचा विचार असेल तर हा आठवडा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. निश्चय केल्यास सफलता प्राप्त होईल. थोडी विश्र्रांतीही गरजेची आहे.
गंगाजल जवळ ठेवा
कुंभ-
या आठवड्यात अकारण मनात भीती आणि चिंता येऊ शकते. ही चिंता करिअर संबंधी आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींची असलेल्या नातेसंबंधांविषयी असू शकते. या चिंतेचे कारण मागे काही घडलेल्या घटना असतील. पण कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. काही मोहांना दूर ठेवणे आवश्यकच असेल.
धार्मिक स्थळातील फूल जवळ ठेवा
मीन-
संघर्षाचा काळ आहे. हा संघर्ष आंतरिक आणि बाह्य या दोन्ही स्वरूपाचा असू शकतो. कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढल्याने टेन्शन येईल. सोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल अतिविश्वास ठेवणे घातक ठरेल. आपल्या मनातील हेतू आणि प्लॅन कुठेही उघड करू नका. जवळच्या माणसांच्या मदतीची अपेक्षा करायला हरकत नाही.
दूध दान द्या
काही वेळा घरातील आजारपण जाण्याचे नावच घेत नाही. घरातील एका माणसाचे आजारपण संपले की, दुसऱ्याचे सुरू होते. अशा वेळेला घरातील परिवारात जितकी माणसे आहेत, त्यापेक्षा एक जास्त अशा साखरेच्या पोळ्या तयार कराव्या आणि घराबाहेरील गाय, कुत्रे आणि कावळ्यांना महिन्यातून एकदा खायला घालाव्यात.





