लगीन घाई !!! (भाग 2)
पूर्वी बालविवाह व्हायचे. (आज प्रौढ विवाहाची परिस्थिती आहे!!). शिक्षण आणि करिअरबद्दल मुला-मुलींच्या मानसिकतेमध्ये बदल झाला. अगोदरची पुरुषसत्ताक पद्धत संपुष्टात आली. मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवू लागल्या. इंडिविज्युअलिटी किंवा व्यक्ती स्वातंत्र्य याबद्दल मुले-मुली जागरूकच नाही तर आग्रही होऊ लागले. शिक्षण आणि करिअर त्याबरोबर असणारी जीवघेणी चढाओढ आणि त्यामुळे होणारा विवाहाला विलंब यामुळे आज विवाहाचे वय तिशीच्या आसपास येऊन ठेपले आहे. हा लेख सामाजिक दृष्टीने लिहिला असला तरी मूळ उद्देश हा ज्योतिषीयदृष्टीने विवाहाच्या संदर्भात असलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याचा आहे आणि त्याचबरोबर लेखमालेच्या शेवटी विवाहात येणारे अडथळे दूर व्हावेत, चांगला योग्य जीवनसाथी मिळावा याकरता करावयाचे उपाय याबद्दल सविस्तर सांगण्यात येईल. विवाहाकरता जेव्हा कुंडल्या मिळवल्या जातात तेव्हा सगळ्यात रूढ परंपरा म्हणजे पूर्वापार चालत आलेली गुण मिलन पद्धत. पूर्वीची जी गुण मिलन पद्धत होती त्याला काही कारणे होती. एकतर त्याकाळी आजच्याइतकी संपर्क व्यवस्था नव्हती, त्यामुळे वधू किंवा वराच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेबद्दल, अर्थार्जनाविषयी, समाजातील मान प्रतिष्ठा, गुणधर्म इत्यादी गोष्टींबद्दल चौकशी करणे किंवा माहिती मिळवणे हे त्यावेळेला शक्मय नव्हते. अशावेळी गुण मिलनाने बऱ्याच गोष्टी समजत होत्या. मागच्या लेखात मी म्हणालो की गुणमीलन पद्धत ही आऊट डेटेड झाली आहे. काही लोकांना हे वाक्मय खटकले असेल, राग आला असेल, पूर्वापार ऋषीमुनींनी काढलेली ही पद्धत आउट डेटेड कशी असू शकते असा प्रŽदेखील पडला असेल. गुण मिलन ही पद्धत काय आहे हे पहिल्यांदा समजून घेऊया आणि त्यानंतर मी माझे मुद्दे मांडतो, जर पटले तर स्वीकारा, नाही पटले तर जाऊ द्या. गुण म्हणजे मार्क्स! जसे परीक्षेमध्ये एखाद्या विषयाचे शंभर पैकी किती असे असतात तसे मार्क्स. शंभर पैकी 40 मिळाले तर जसा विद्यार्थी पास होतो त्याप्रमाणे 36 पैकी किमान 18 मिळाले तर वधू वरांचे गुण मिलन झाले, विवाह करायला हरकत नाही असे काही ज्योतिषी बेधडक सांगून मोकळे होतात. माझ्या दृष्टीने गुण मिलनापेक्षा कुंडली मिलान हा शब्द योग्य वाटतो. कुंडली मिलानलासुद्धा ज्या गोष्टी मला अत्यंत महत्त्वाच्या वाटतात त्या या. 1. दोघांचेही आयुर्मान किती आहे. ज्योतिषामध्ये अल्पायु, मध्यमायू आणि दीर्घायु अशा तीन वाटण्या केल्या आहेत. पण इथेही ज्योतिषाने हे ध्यानी ठेवले पाहिजे की ज्योतिष शास्त्राप्रमाणे 120 वर्षाचे आयुष्य गृहीत धरले आहे. म्हणजे 40 पर्यंत अल्पायु, 80 पर्यंत मध्यम आयु आणि त्यानंतर दीर्घायु. आजच्या काळात सत्तरी पार करणे हेच मुळात अवघड आहे. त्यानुसार 25+25+25 हे गणित पटण्यासारखे आहे. म्हणजे वधूवरांना एकमेकाशी एकमेकाची पुरेशी साथ मिळावी हे पाहणे गरजेचे नाही का? 2. दोघांचीही शारीरिक सुख देण्या-घेण्याची वृत्ती कशी आहे. मुळात विवाह संबंधांमध्ये शारीरिक सुख हा पाया आहे. एक व्यक्ती राक्षसी वृत्तीने सुख ओरबाडणारी असेल आणि दुसरी अत्यंत संवेदनशील असेल तर असा विवाह टिकेल का? 3. मानसिक अनुरूपता. दोघांचीही मानसिकता जरी पूर्ण जुळत नसली (तशी ती कुणाची जुळत नाही!) तरी किमान एकमेकाचा एकमेकाला त्रास होऊ नये, सहवासात आनंद मिळावा, हे पाहणे गरजेचे नाही का? 4. संतती-वंश वृद्धी हा विवाहाचा आणखी एक मुख्य उद्देश. दोघेही शारीरिक आणि मानसिकरित्या संततीकरता एकमेकाला अनुकूल आहेत ना हे पाहणेदेखील गरजेचे आहे.
मेष
तुमच्या मनात नसताना प्रवास करावा लागू शकतो. वायफळ खर्च होईल. कामाच्या ठिकाणी इतर लोक तुमच्या स्वभावाचा फायदा उचलू शकतात. पैशांची येणी वसूल करण्याची गरज आहे. तुम्ही ठरवले तर हातात घेतलेले काम पूर्ण कराल. विद्यार्थी वर्गाला अनुकूल काळ आहे. व्यावसायिकांनी थोडे सबुरीने काम घ्यावे.
उपाय : पिवळा रुमाल जवळ ठेवावा
वृषभ
आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला असेल.. किरकोळ घटना सोडल्यास घरातील वादावादी कमी होईल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. पैशांच्याबाबतीत सावध राहण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात संदेहाला स्थान देऊ नका. याने ताण तणाव येऊ शकतो.
उपाय : पाच काळी मिरीचे दाणे जवळ ठेवावे
मिथुन
कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. तुमच्या स्वभावामुळे कुटुंबात वाद होऊ शकतात. भविष्याच्या दृष्टीने हे फायद्याचे ठरेल. त्यावर काम करत असताना टीम वर्क महत्त्वाचे आहे हे विसरू नका. पित्ताचा त्रास होऊ शकतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटेल. प्रेमसंबंध दृढ होतील. छोट्या प्रवासाचे प्लॅनिंग कराल.
उपाय : औदुंबराला पाणी घालावे
कर्क
आळस झटकून कामाला लागण्याची गरज आहे. कामांचे नीट नियोजन केल्यास कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करून चालणार नाही. कामाच्या ठिकाणी सोबत काम करणाऱ्या बरोबर योग्य तो व्यवहार ठेवा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्याने वैवाहिक जीवनात ताणतणाव जाणू शकतो.
उपाय : हिरवे मूग दान द्यावे
सिंह
तुमचा स्वभाव आणि मूड आनंदी होईल. एकाचवेळी अनेक कामे करावी लागल्यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नम्र राहण्याचा प्रयत्न करा. अशावेळी इतरांची मदत घेण्यास काही हरकत नाही. या आठवड्यात थोडी आर्थिक तंगी जाणवेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
उपाय : लाल रंगाचा वापर टाळावा
कन्या
एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन काम हाती घेऊ शकता. नक्की कोणते काम करावे याचा निर्णय घेणे अवघड जाईल. आर्थिक बाबतीमध्ये काळजी करण्याचे कारण नाही. जवळच्या एखाद्या व्यक्तीकडून चांगला सल्ला मिळून फायदा होईल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास दाखवण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी शब्दांचा योग्य वापर करा.
उपाय : हिरवा हात रुमाल जवळ ठेवावा
तूळ
काही बाबतीमध्ये संघर्ष जाणवेल. हा संघर्ष आर्थिक किंवा भावनिक स्वरूपाचा असू शकतो. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. छोट्या-मोठ्या आजारांनी त्रस्त होण्याची शक्यता आहे. कुणाकडे पैसे अडकले असतील तर ते वसूल करण्याकरता योग्य वेळ आहे.. जितका शक्मय आहे तितका स्वत:च्या कामाशी मतलब ठेवा.
उपाय : फळांचे दान द्यावे.
वृश्चिक
तुमच्या बोलण्याचा लोक चुकीचा अर्थ काढून राग धरू शकतात. शक्मयतो इतरांवर अवलंबून राहण्याचे टाळा. आर्थिक बाबतीमध्ये हा आठवडा सर्वसामान्य असेल. एखादी परिचित व्यक्ती किंवा मित्र आर्थिक सहाय्य मागेल जे पूर्ण करणे तुम्हाला जड जाईल. लहान भावंडांची काळजी वाटेल. ज्येष्ठ व्यक्तीचे सहकार्य प्राप्त होईल.
उपाय : लाल फळ दान द्यावे
धनु
कुटुंबात एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्याकरता तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल तुमच्या स्वभावाचा आणि इतरांवर असलेल्या विश्वासाचा लोक गैरफायदा घेऊ नयेत याची काळजी घ्यावी लागेल. या आठवड्यात थोडे एखाद्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीचा सल्ला तुमच्या करिअरसाठी उपयुक्त ठरेल.
उपाय : वाहत्या पाण्यातील एक दगड घरी ठेवावा
मकर
उत्साह वाढेल अशी एखादी घटना घडेल. जवळच्या व्यक्तींच्या वागण्याचा राग येऊ शकतो. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करावे लागेल. प्रवास करत असताना सावध राहण्याची गरज आहे. कामे पूर्ण करण्याकरता इतरांची मदत घ्यावी लागली तर त्यात गैर काहीच नाही.
उपाय : गरजूला पांघरूण दान द्यावे
कुंभ
आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला असेल. किरकोळ घटना सोडल्यास घरातील वादावादी कमी होईल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. पैशांच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात संदेहाला स्थान देऊ नका याने ताण तणाव येऊ शकतो.
उपाय : पाच काळी मिरीचे दाणे जवळ ठेवावे
मीन
मित्रांचा सहवास प्राप्त होईल आणि मित्रांमुळे चांगली मदतदेखील मिळू शकते. या आठवड्यात कामे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका. नुकसान होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य आठवडा असेल. काही ठिकाणी केलेली गुंतवणूक नुकसानदायक ठरू शकते. व्यापारी वर्गाला जास्त मेहनत करावी लागेल.
उपाय : कामाला जाताना सूर्याचे दर्शन घ्यावे





