मेष
व्यवसायाच्या नवीन संधी प्राप्त होतील. येणाऱ्या आठवड्यामध्ये लोकांशी बऱ्याच प्रमाणात बोलावे लागणार आहे. त्यांची मनधरणी करावी लागणार आहे. त्यामुळे जिभेवर साखर ठेवलेली बरी. एखादी व्यक्ती तुमचा इगो हर्ट करू शकते पण जर आपले काम होणार असेल तर तिकडे दुर्लक्ष केलेले बरे. कौटुंबिक वातावरण चांगले असेल.
कोळसे पाण्यात सोडावे
वृषभ
एखाद्या छोटेखानी सोहळ्यामध्ये किंवा समारंभामध्ये भाग घ्याल. मित्रांशी वागताना आपला इगो सांभाळा. कुटुंबामध्ये वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यामुळे घरचे वातावरण बिघडण्याची शक्मयता आहे. प्रेमींनी एकमेकाला गिफ्ट दिल्यास आनंद द्विगुणित होईल. पैसे सांभाळून खर्च करावे.
तुरटीने दात साफ करावे
मिथुन
मित्रांचा सहयोग प्राप्त होईल. संसर्गजन्य रोगांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पैशांची आवक वाढली तरी खर्चाचे प्रमाणही तितकेच वाढणार आहे त्यामुळे नियोजनबद्धरित्या काम करावे. जुन्या मित्राची भेट होऊ शकते. या आठवड्यात तुम्हाला दुसऱ्याकडून पैसे मागायची वेळ येणार नाही याची काळजी घ्या.
लाल फळ दान करा
कर्क
तब्येतीला सांभाळणे गरजेचे असेल. मन चंचल असल्याने निर्णय घेताना चार चौघांचा सल्ला घ्यावा. पैशांच्या बाबतीमध्ये हा आठवडा सर्वसाधारण असेल. तुमच्या बोलण्याने दुसऱ्याचे मन दुखावले जाऊ शकते त्यामुळे जिभेवर ताबा ठेवा. या आठवड्यात कोणालाही उधारी देण्याच्या भानगडीत पडू नका.
औषधांचे दान द्यावे
सिंह
कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही. कौटुंबिक वातावरणामध्ये सुधारणा होईल. पैशांची आवक मनासारखी असेल पण त्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. एखादी वस्तू वेळेवर न सापडल्यामुळे चिडचिड होऊ शकते. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला कामाच्या ठिकाणी उपयोगी येईल.
कच्च्या जमिनीवरती तेलाचे चार थेंब सोडावे
कन्या
मंगलकार्यामध्ये भाग घ्याल. समारंभामध्ये मानसन्मान वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी संधी तुम्हाला प्राप्त होण्याची शक्यता आहे. पण आळशीपणामुळे नुकसान होऊ शकते. बरेच दिवस टाळाटाळ केलेले काम तुम्हाला या आठवड्यात करावे लागेल. एखादी छोटी रक्कम तुम्ही पूर्वी दिली होती ती मिळेल.
सुगंधी अत्तर लावावे
तूळ
पूर्वी तुम्ही मदत केलेली माणसे तुमच्या वेळेला मदत करतीलच असे नाही. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्याकरता अनुकूल काळ आहे. या आठवड्यात नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल. या आठवड्यामध्ये इन्वेस्टमेंट जास्त होईल. भावनिक गुंतागुंतीचा काळ आहे त्यामुळे निर्णय घेताना बुद्धीने निर्णय घ्यावा.
फळ दान द्यावे
वृश्चिक
तुम्ही केलेल्या कामाचे व्रेडिट दुसऱ्याला घेता येऊ नये याची काळजी घ्या. कुठलीही जबाबदारी दुसऱ्याच्या अंगावर घालून चालणार नाही. आपल्याच लोकांशी कठोर बोलणे टाळावे. पारिवारिक सुख चांगले असेल. कागदोपत्री व्यवहार मात्र जपून करा. जे सिंगल आहेत त्यांना योग्य प्रपोजल मिळू शकते.
एखाद्या गरजू व्यक्तीला छत्री भेट द्यावी
धनु
ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे असे धोरण ठेवल्यास फायदा होईल. मनात असलेली योजना कृतीमध्ये आणा कारण नंतर कदाचित वेळ मिळणार नाही. शारीरिक तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष करू नका. प्रेमसंबंधांमध्ये जास्तीच्या अपेक्षेने ताण येईल. कौटुंबिक वातावरण चांगले ठेवण्याकरता प्रयत्न करावे लागतील.
जोड केळीचे दान द्यावे
मकर
कामाच्या ठिकाणापासून गुप्त शत्रूंपासून सावध रहा. एखादे काम नवीन पद्धतीने केल्यामुळे त्यातून फायदा होईल. कामाच्या ठिकाणी व्यर्थ वादावादी करू नका. एखाद्या सभेत किंवा सामूहिक कार्यामध्ये भाग घ्याल. वाईट स्वप्नांकडे दुर्लक्ष करा. चिकाटी सोडली नाही तर यश नक्की मिळेल.
हळदीचा टिळा लावा
कुंभ
तुमच्यासमोर गोड बोलणाऱ्यांचे खरे रूप तुम्हाला कळू शकते. घरात एखाद्या मंगल कार्याची सुऊवात होईल. मित्र परिवाराकडून सहकार्य मिळण्याची शक्मयता आहे. काही जुन्या आठवणींमध्ये रमून जाल. पैशांच्याबाबतीत कोणालाही कुठलीही कमिटमेंट देऊ नका. प्रेमा तुझा रंग कसा असा प्रŽ पडेल.
पांढरी मिठाई दान करावी.
मीन
कुटुंबातील वाद कुटुंबापुरते मर्यादित राहतील त्याकडे लक्ष द्या. एखादे अवघड काम करून दाखवाल. मित्रमंडळींमध्ये वेळ जास्त घालवल्यामुळे कौटुंबिक वातावरणात ताण तणाव घेऊ शकतो. बरेच दिवस तुम्ही जे काम होण्याची अपेक्षा करत होता ते काम होईल पण त्याला वेळ लागेल. नवीन खरेदी, शॉपिंग यामध्ये पैसा खर्च होईल.
दूध दान करावे
घरातील आजारपण जात नसेल, घरातील लोकांना नजर लागत असेल, तब्येत बिघडत असेल, कामे होत नसतील तर आरशावर हे चिन्ह काढावे. याने नजर लागत नाही. आत्मविश्वासामध्ये वाढ होते. कामे लवकर पूर्ण होतात.





